मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०१५

नथुरामायण ………
भा रताची फाळणी, त्यानंतर उसळलेली हिंदू-मुस्लिम दंगल, हिंदू निर्वासितांचा झालेला छळ आणि नवजात पाकिस्तानला भारताने दिलेले ५५ कोटी रुपये या सर्व घटनांना केवळ मोहनदास करमचंद गांधीच जबाबदार आहेत, असा नथुराम गोडसेचा ठाम गैरसमज होता. गोडसेच्या दृष्टीने गांधी देशाचे शत्रू होते. त्याची शिक्षा देण्यासाठी म्हणून त्याने गांधींना संपवले. हा कुविचार करणारा गोडसे तेव्हाही एकटा नव्हता. आजही त्याचा विचार जिवंत ठेवणाऱ्यांची संख्या कमी नाही. खेदाची गोष्ट म्हणजे खुनी नथुरामला 'संत' ठरवण्याचेच पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. गोडसे कुटुंबीयांनी नथुरामाची आठवण ठेवणे एकवेळ समजून घेता येईल. नथुरामला फाशी दिल्यापासून दरवर्षी त्याचे कुटुंबीय त्याचा स्मृतिदिन पुण्यात पाळतातसुद्धा. 
मात्र मर्यादित असलेल्या या कार्यक्रमाला सार्वजनिक रूप देण्याचा प्रयत्न देशात सुरू झाला आहे. यंदाच्या स्मृतिदिनी 'नथुराम-अ-मर्टियर सेंट' या शीर्षकाचे इंग्रजी पुस्तकच पुण्यात प्रसिद्ध करण्यात आले. 
नथुरामावर कीर्तन सादर झाले. गांधी यांचे विचार आणि कार्यपद्धतीबद्दल अनेकांचे मतभेद होते. गांधींच्या हयातीमध्येच डॉ. आंबेडकर यांनी अनेकदा त्यांच्यावर टोकाची टीका केली. गांधींच्या लाडक्या 'जवाहर' पासून ते जिना, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंत अनेकांना गांधींचे सर्वकाही, सदा पटले नाही; परंतु गांधींच्या हेतूंबद्दल कोणाला शंका नव्हती. 
म्हणूनच क्षुद्र बुद्धीच्या गोडसे या मारेकऱ्याचे होणारे उदात्तीकरण समाजासाठी धोकादायक आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे बरे नव्हे. नथुरामी वृत्तीचे समर्थन म्हणजे येथील लोकशाही व्यवस्थेला, राज्यघटनेला विरोध. आपल्याला जे पटत नाही, रुचत नाही ते संपवून टाकायचे. नष्ट करायचे, ही तालिबानी प्रवृत्ती आणि नथुराम यांच्यात फरक करता येत नाही. म्हणूनच नथुरामाचे गोडवे गाणाऱ्यांचा समाजातून निषेध व्हायला हवा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही नथुरामच्या विरोधात जाहीर आक्षेप नोंदवला हे चांगले झाले. नथुरामी वृत्तीचा संसर्ग रोखणे हीच आजच्या अखंड भारताची गरज आहे.
 

सोमवार, १६ नोव्हेंबर, २०१५

"बुडत्याला काडीचा आधार एक्सप्रेस" 

बारामती-अहमदाबाद अशी  "बुडत्याला काडीचा आधार एक्सप्रेस" सुरु होणार होती. पण बिहार विधानसभेच्या निकालामुळे व्यवस्थापनाने तूर्तास ही गाडी सुरु न करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी अहमदाबाद, दिल्ली व मुंबईचे तंत्रज्ञ बारामती मार्गाची तपासणी करून गेले होते. मात्र गाडीला प्रवासी मिळतील की नाही अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. 'डरांव डरांव सेना एक्स्प्रेस'च्या फेऱ्या वाढवल्या जाण्याची शक्यता आहे. 

रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५

तीन बातम्या ………

१) भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी वैचारिक मतभेद असले तरी त्यांच्या लोककल्याण व राष्ट्रनिर्माणाच्या कार्यावर कुणीही शंका घेऊ शकत नाही.- केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह

२) नेहरू पुण्यतिथीनिमित्य आयोजित शांतीवनातील कार्यक्रमाला भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांची अनुपस्थिती मात्र नजरेत भरणारी होती.(लोकसत्ता १५/११/१५)

३) गांधीजींचा  मारेकरी नथुराम गोडसे याची पुण्यतिथी (१५ नोव्हे) शौर्यादिन म्हणून पनवेल मध्ये साजरी. (२००८ पासून हे सुरु झाले.)

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

हिटलर स्वत:ला आर्य वंशाचा म्हणवून घ्यायचा. त्याच्या पक्षाच्या ध्वजावर स्वस्तिकचे चिन्ह होते. हिटलरमुळे संपूर्ण युरोप युद्धाच्या खाईत लोटला गेला. युरोपात आता स्वस्तिक चिन्हाचा द्वेष करतात. एका इमारतीवर लावले गेलेले स्वस्तिक चिन्ह काही लोकांनी आंदोलन करून काढावयास लावले. कट्टरतेमुळे एकप्रकारे हिंदू धर्माचे नुकसानच  झाले. पुन्हा असे काही होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. 
गांव(पार्टी) जल रहा हैं,

और हनुमान बाहर(विदेशमे)

शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०१५

आताच ब्रिटन दौरा करण्यामागचे रहस्य उलगडले!

आज १४ नोव्हेंबर.
आधुनिक  भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती. त्यांना आदरांजली वाहायची पाळी येऊ नये म्हणून मोदींनी भारतातून पलायन केले. इंदिराजींच्या जयंतीच्या दिवशी सुद्धा मोदी भारतात नसतात. आणि कर्तबगार पंतप्रधान इंदिराजींच्या पुण्यतिथीच्या दिवसाला कलाटणी देण्यासाठी आता सरदार पटेलांना पुढे करण्यात आले आहे. इंदिराजींच्या पुण्यतिथीच्या दिवशीच पटेलांची जयंती असते. त्याचा सोहळा मोदी सरकारकडून साजरा केला जातो. नेहरूजी/इंदिराजी यांना विसरावे असे मोदींना वाटत आहे हे नक्की. आणि हो, २६ मे २०१४ ला शपथविधी घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नेहरुजींची पुण्यतिथी होती मात्र मोदींनी  शांतीवनाकडे ढुंकूनही पाहिले नाही. मोदींच्या परदेश दौऱ्याच्या तारखा अशाच असतात की त्या काळात नेहरुंजी किंवा इंदिराजींची जयंती किंवा पुण्यतिथी येते. नेहरूजी/इंदिराजींच्या बाबतीत मोदींना कमीतकमी तारखांची कसरत तरी करावी लागते. राजीव गांधींना तर मोदींनी अदखलपात्र व्यक्ती ठरविले आहे.

औषध कंपन्यांच्या "आरोग्यासाठी" जेनेरिकचा देशभर तुडवडा

ब्रॅन्डेडअाैषधांच्या नावाने रुग्णांची माेठ्या प्रमाणात हाेणारी अार्थिक लूट थांबवण्यासाठी माेदी सरकारने 'जेनेरिक अाैषधी' लाेकांपर्यंत पाेहोचवण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ प्रसिद्धीपुरता मर्यादित राहिला अाहे. प्रारंभी सहज मिळणाऱ्या अाैषधींचे खासगी कंपन्यांना फायदा पाेहोचवण्यासाठी सरकारने गेल्या चार महिन्यांपासून वितरण थांबवले अाहे. यात काेट्यवधी रुपयांचे 'डिल' झाल्याची शक्यता वर्तवली जात अाहे.
डाॅक्टरांकडून रुग्णांना ज्या ब्रॅन्डेड अाैषधी लिहून िदल्या जातात त्यात त्या डाॅक्टरांचे 'हित' असते. अाैषधनिर्मितीच्या दाेनशे ते चारशे पट िकमतीने अाैषधी िवकून लाेकांचे िखसे खाली केल्या जातात. माेदी सरकार सत्तेत अाल्यानंतर ज्या-ज्या गाेष्टी जनसामान्यांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या अाहेत त्यात जेनेरिक अाैषधीसुद्धा हाेत्या. पुढच्या चार वर्षांत प्रत्येक गावागावांत जेनेरिक अाैषधे पाेहोचवू, अशी घाेषणा केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली हाेती. काँग्रेसच्या काळात खासगी कंपन्यांना लाभ िमळावा म्हणून जेनेरिक अाैषधांची दुकाने उघडल्या गेली नाहीत आणि जे बाेटावर माेजण्याइतके अाहेत त्यात केवळ १०२ अाैषधीच उपलब्ध करण्यात अाल्याचे ना. अहीर वारंवार सांगून अाम्ही िकती चांगले म्हणून पाठ थाेपटवून घेत हाेते. अहीरांच्या मते माेदी सरकार सत्तेत अाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांत जेनेरिक अाैषधींचा अाकडा ५०४ वर नेण्यात अाला. वर्षाअखेर एक हजारांवर जेनेरिक अाैषधी उपलब्ध करण्यात येतील त्यात कर्कराेग, क्षयराेग अादी राेगांवरील अाैषधी ८० ते ९० टक्के कमी िकमतीमध्ये उपलब्ध हाेणार असल्याचे सांगण्यात अाले हाेते. एक हजार उर्वरित.पान १२

अाैषधांचाअाकडा दूरच राहिला. सहा महिन्यांपूर्वी सरकारकडून ५०४ अाैषधांचा सांगण्यात अालेला अाकडाही िदशाभूल करणारा अाहे. सध्या जेनेरिक अाैषधांच्या दुकानांमध्ये १५० ते १९० प्रकारच्या अाैषधीच उपलब्ध हाेत अाहेत. डाॅ. मनमाेहन िसंग यांच्या सरकारमध्ये असलेली िस्थती अाजही कायम अाहे; त्यात जराही बदल झालेला नाही. ना. अहीर अाणि इंडियन मेडिकल असाेसिएशन(अायएमए)ने जून २०१५ राेजी िदल्लीत जेनेरिक अाैषधीचे दुकान सुरू करताना १५ अाॅगस्ट २०१५ पर्यंत देशभरातील १४०० अायएमएच्या शाखांमध्ये जेनेरिक अाैषधांचे दुकान सुरू हाेईल, अशी घाेषणा केली हाेती. परंतु, िदल्ली वगळता एकाही ठिकाणी हा उपक्रम सुरू झालेला नाही. अहीर यांनीही याबाबत पाठपुरावा केला नाही.
माेदी सरकार जेनेरिक अाैषधी िकती स्वस्त उपलब्ध करून देत अाहे याबाबत ना. अहीरांनी काही उदाहरणे िदलीत; त्यानुसार एम्लाेिडपाइन १० गाेळ्या २० रुपयांना िमळतात. त्या जेनेरिकमध्ये केवळ अडीच रुपयांमध्ये िमळत अाहेत. वेदनाशामक गाेळ्या ३० रुपयांहून रुपयांवर, रक्तदाबावरील गाेळ्या ९४ रुपयांहून १० रुपये, तापावरील गाेळ्या ४२ रुपयांहून साडेतीन रुपये, साखरेच्या अाजारावरील गाेळ्या ६६ रुपयांहून केवळ तीन रुपयांवर, प्रतिजैविक १५० रुपयांहून ४१ रुपयांमध्ये उपलब्ध हाेत अाहे. यासंदर्भात ना. अहीर यांना िवचारले असता, अाम्हीच अाैषधीनिर्मिती करू तेव्हा सगळे सुरळीत हाेईल, असे सांगून त्यांनी सध्याच्या िस्थतीवर भाष्य करण्याचे टाळले. जनअाैषधी िवभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. डी. श्रीकुमार यांनी दिव्य मराठीसाेबत बाेलताना सांगितले, तुटवडा नाही, दुकानदारांकडून अाैषधींची मागणीच हाेत नाही. दुकानदारांनी मात्र सरकारची खासगी कंपन्यांशी हातमिळवणी असल्याचा अाराेप केला अाहे.
५०४ नव्हे, केवळ १५० अाैषधी
सरकारच्यामुबलक प्रसिद्धीबाजी नंतर रुग्ण जेनेरिक अाैषधांच्या दुकानात जायला लागला प्रारंभी त्यांना अाैषधी िमळायला लागल्यात. त्यामुळे खासगी कंपन्यांचे माेठे नुकसान व्हायला लागले. दरम्यानच्या काळात या कंपन्यांचे सरकारच्या दाेस्तीचे गुपित उलगडले नाही. परंतु, ५०४ अाैषधींवरून केवळ १५० अाैषधींचा पुरवठा करून सरकारने खासगी कंपन्यांना 'मदतीचा हात' िदला अाहे. गेले तीन महिने कॅल्शियम, अायर्न अादी अाैषधी उपलब्ध नाहीत, सात्याने पाठपुरावा करूनही सरकारकडून उपलब्ध हाेत नसल्याचे िदल्लीतील दुकानांमधून माहिती िमळाली.
देशभर केवळ १०७ दुकाने
पंतप्रधाननरेंद्र माेदी हे १४ अाॅगस्ट २०१५ राेजी जेनेरिक अाैषधी अभियानाचा शुभारंभ करणार हाेते. या िदवशी देशभरात तीन हजार अाैषधींची दुकाने सुरू करण्यात येणार हाेती. परंतु, शुभारंभही झाला नाही तीन दुकानेही हे सरकार त्या िदवशी सुरू करू शकले नाही. अाज देशभर जेनेरिक अाैषधांची अधिकृत दुकाने केवळ १०७ अाहेत. ना. अहीर यांनी २०१९ पर्यंत ५० हजार जेनेरिक अाैषधांची दुकाने उघडण्याच्या अाणि प्रत्येक दुकानाला लाख रुपयांची माेफत अाैषधे देण्याची घाेषणा केली अाहे; वर्ष उलटले. मात्र, यात जराही प्रगती नाही.
अाैषध कंपन्यांच्या 'आरोग्या'साठी जेनेरिकचा देशभर तुटवडा
आनंदी राहायचंय? मग 'फेसबुक' बंद करा
हॅपीनेस रिसर्च इन्स्टिट्यूटने अभ्यासानंतर म्हटले- फेसबुकचा वापर केल्यास व्यक्ती राहतो खुश
वृत्तसेवा कोपनहेगन
सोशलनेटवर्किंग साइट फेसबुकचा जास्त वापर करूनही तुम्ही आनंदी नसाल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. एका संशोधनानुसार असे लक्षात आले आहे की, तुम्ही एक आठवडा फेसबुकचा वापर करणे टाळले, तर जास्त आनंदी बनाल. हॅपीनेस रिसर्च इन्स्टिट्यूटने हे नवे संशोधन डेन्मार्कमध्ये केले आहे.
या संशोधनात १,०९५ लोक सहभागी झाले होते. या लोकांची दोन गटांत विभागणी केली होती. पहिल्या गटात अशा लोकांना सहभागी केले होते, ज्यांनी फेसबुकचा वापर सुरूच ठेवला आहे, तर दुसऱ्या गटात अशा लोकांना सहभागी करून घेण्यात आले की, ज्यांनी फेसबुकचा वापर बंद केला आहे. इन्स्टिट्यूटचे चीफ एक्झिक्युटिव्ह एम. वाइकिंगने म्हटले आहे की, आम्ही फेसबुकवर यासाठी फोकस केले याचे कारण असे की, सर्व वयोगटातील लोक या साइटचा सर्वात जास्त वापर करतात. ज्या लोकांनी फेसबुकचा वापर बंद केला त्यांपैकी ८८ टक्के लोकांनी आठवड्यानंतर सांगितले की, आम्ही आमच्या जीवनात बेहद खुश आहोत. या तुलनेत दुसऱ्या गटातील ८१ टक्के लोकांनी खुश नसल्याचे नमूद केले. पहिल्या गटातील जवळपास ८४ टक्के लोकांनी म्हटले की, त्यांचे जीवन आनंदी झाले आहे, तर दुसऱ्या गटात असे मानणाऱ्या लोकांची टक्केवारी ७५ टक्के आहे.
दुसऱ्या गटातील लोकांनी खुश नसल्याचे नमूद केले.
लोकांचे
जीवन आनंदी झाले आहे.
लोकांनी म्हटले की, त्यांचे जीवन आनंदी झाले.
लोक जीवनात बेहद खुश आहेत
आनंदी जीवनाचा फाॅर्म्युला
याप्रयोगाच्या शेवटी असा निष्कर्ष निघाला की, फेसबुकचा वापर करणारे लोक सामाजिक जीवनात आनंदी आहेत. त्यांना लक्ष्य केंद्रित करण्यासाठी कमी अडचणींना सामोरे जावे लागले. त्या तुलनेत दुसऱ्या गटातील लोकांच्या सामाजिक जीवनात कोणताही बदल झाल्याचे दिसून आले. अभ्यास करणाऱ्या पथकाच्या म्हणण्यानुसार, आमची आवश्यकता काय आहे हे लक्षात घेता, आम्ही दुसऱ्याकडे काय आहे याकडे लक्ष देत आहोत. त्यामुळे अडचणी उभ्या राहतात. अभ्यासाद्वारे या निष्कर्षापर्यंत पोहोचता येते की, फेसबुक वापरणाऱ्यांच्या तुलनेत फेसबुकचा कमी वापर करणारे ३९ टक्के लोक आनंदी आहेत.




 




मंगळवार, १० नोव्हेंबर, २०१५

बिहार विधानसभेचा निकाल एका ओळीत, …
"तेरा जादू ढल गया"
अच्छे दिन आ गये,

 लेकिन सिर्फ  बिहारके. ......
धर्मेंद्र और आशा पारेख की एक पुरानी हिट फिल्म थी,
"आये दिन बहारके".
अब शायद फिल्म बनेगी,
"आये दिन बिहारके"

रविवार, ८ नोव्हेंबर, २०१५

Romila Thapar, a noted historian refused 'Padam Bhushan' award Twice. ....................................
 In January 2005, she declined the Padma Bhushan awarded by the Indian Government. In a letter to Presidbent A P J Abdul Kalam, she said she was "astonished to see her name in the list of awardees because three months ago when I was contacted by the HRD ministry and asked if I would accept an award, I made my position very clear and explained my reason for declining it". .................
 Thapar had declined the Padma Bhushan on an earlier occasion, in 1992. To the President, she explained the reason for turning down the award thus: ...... "I only accept awards from academic institutions or those associated with my professional work, and not state awards".[10]

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५

गुजरातमध्ये दलितांसाठी वेगळ्या आंगणवाड्या

गुजरातमधील पाटण जिल्ह्य़ात दलित आणि उच्चवर्गीयांसाठी जातीवर आधारित स्वतंत्र अंगणवाडय़ा असल्याची बाब समोर आली आहे. पाटण जिल्ह्य़ातील हाजीपूर जिल्ह्य़ात १५९ आणि १६० क्रमांकाच्या अंगणवाडय़ा आहेत. या दोन अंगणवाडय़ांमध्ये केवळ एक संख्येचाच फरक असला तरी त्यामागील विभागणी चिंताजनक आहे.तीन महिन्यांपूर्वी मानवी चामर ही तीन वर्षांची चिमुरडी १६० क्रमांकाच्या अंगणवाडीत गेली आणि तिचे सुहानी पटेल या चार वर्षांच्या मैत्रिणीशी संभाषणच खुंटले. चामरला १६० क्रमांकाच्या अंगणवाडीवर रोखण्यात आले आणि १५९ क्रमांकाच्या अंगणवाडीत जाण्यास सांगण्यात आले.
अंगणवाडी क्रमांक १५९ दलितांसाठी आहे, त्यामुळे तू अन्यत्र जा, असे तिला सांगण्यात आले. त्यानंतर ती घरी आली आणि विचारले की, मी मैत्रिणीसमवेत १६० क्रमांकाच्या अंगणवाडीत का जाऊ शकत नाही? तिच्या या प्रश्नाला माझ्याकडे उत्तरच नव्हते, असे तिची आई पिंकी चमार हिने सांगितले. अहमदाबादपासून १३० कि.मी. अंतरावर हाजीपूर हे दोन हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात ७० टक्केपटेल समाज आहे. या गावातील दलितांची ४० घरे दोन मोहल्ल्यांत विभागली गेली आहेत. हाजीपूरच्या दोन अंगणवाडय़ांमध्ये ‘अस्पृश्यता’ हा आयुष्यातील पहिला धडा अजूनही शिकवला जात आहे.
अंगणवाडी क्रमांक १५९ ची स्थापना १९९७ मध्ये करण्यात आली. त्यानंतर तीन वर्षांनी पटेल आणि ब्राह्मणांनी स्वत:साठी स्वतंत्र अंगणवाडीची मागणी केली. त्यानंतर नवी अंगणवाडी क्र. १६० स्थापन करण्यात आली. या अंगणवाडीचे प्रवेशद्वार शाळेसोबतच असून शाळेच्या कुंपणाने या दोन अंगणवाडय़ा स्वतंत्र केल्या आहेत.
अंगणवाडय़ांबाबतचा हा दुजाभाव राज्याच्या बालहक्क संरक्षण आयोगाच्या निदर्शनास आला. सदस्यांनी या अंगणवाडय़ांचा दौरा करून आपला अहवाल सादर केला. आपल्या पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी अहवालावर कोणतीही कारवाई केली नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे नव्या अध्यक्ष भारतीबेन गढवी यांनी सांगितले. मात्र आपण याबाबत जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहून याबाबत दहा दिवसांत अहवाल मागविला आहे, असे गढवी म्हणाल्या.(आजच्या लोकसत्ता

लाळघोटे (चापलूस) कधीच पुरस्कार परत करत नसतात. 

त्यांच्या निष्ठा कुठल्याही तत्वाला वाहिलेल्या नसतात. तर खुर्चीला वाहिलेल्या असतात.
 'भये कोई नृप(राजा) हमे क्या हानी' असे त्यांचे धोरण असते.
एखाद्या तत्वाचा ठामपणे पाठपुरावा करायला एखाद्या सैनिका एव्हढीच हिम्मत लागते. भलेही त्यांच्यासाठी एखादा शौर्य पुरस्कार ठेवला नसेल तरिही.
रोमिला थापर यांनी आणीबाणीला विरोध केला होता व त्या सध्याच्या सरकारच्या विरोधातही बोलत आहेत. सरकार कुठल्याही पक्षाचे असो रामबिलास पासवान मंत्रिमंडळात असतातच. याला म्हणतात तत्वनिष्ठहीन लाळघोटेपणा.

गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०१५

आपला प्रयत्न असावा - मराठी काका श्री. अनिल गोरे, पशुपक्षी चिकित्सालय, ५९५, बुधवार पेठ, पुणे.