अमेरिकी कोर्टाने मागवले मोदी यांचे व्हिसा रेकॉर्ड
|
|
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या व्हिसासंबंधी सर्व दस्तऐवज फेब्रुवारी
२०१६ पर्यंत सादर करण्याचे आदेश एका अमेरिकी कोर्टाने तेथील परराष्ट्र
खात्याला दिले अाहेत. यात मोदींवरील अमेरिका प्रवेशबंदी उठवण्याच्या ओबामा
प्रशासनाच्या निर्णयाच्या रेकॉर्डचाही समावेश आहे. सिख्स फॉर जस्टिस
संस्थेच्या तक्रारीवरून कोर्टाने हा आदेश दिला. सदर्न डिस्ट्रिक्ट आॅफ
न्यूयॉर्कचे जज जाॅन जी. कोएल्टी यांनी डिसेंबरच्या निकालात हे रेकाॅर्ड
मागवले आहे. ते म्हणाले, विभागाने प्राथमिक दस्तऐवज जानेवारी २०१६ चा
पंधरवडा आणि पूर्ण माहिती फेब्रुवारी २०१६ पर्यंत द्यावी. पीएमझाल्यानंतर सूट मोदींना आधी अमेरिकेचा पर्यटन व्हिसा दिला होता. २००५ मध्ये तो परत घेण्यात आला. मे २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान बनल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ओबामांनी तत्काळ त्यांचे अभिनंदनच नव्हे तर त्यांना अमेरिका दौऱ्याचेही निमंत्रण दिले होते. अमेरिकी धार्मिक स्वातंत्र्याच्या कायद्यान्वये व्हिसा बंदी असलेले मोदी हे एकमेव व्यक्ती होते. ते पंतप्रधान बनताच त्यांना या कायद्यातून सूट देण्यात आली. (दिव्यमराठी) |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा