शेतकऱ्यांसारखे लहान मासे जाळ्यात,
सूटबूटवाल्यांसाठी समुद्र मोकळा.
मोठ्या डिफाॅल्टरकडे बँकांचे ६४,३०० कोटी बाकी : सिन्हा
|
वृत्तसंस्था | नवीदिल्ली
|
|
मोठ्या डिफॉल्टरकडे सरकारी बँकांचे ६४,३०० कोटी रुपये येणे बाकी आहेत, तर
११५ अशी प्रकरणे समोर आली आहेत ज्यामध्ये बँक अधिकाऱ्यांनी कर्जधारकांना
फायदा मिळवून देण्यासाठी नियमांकडे दुर्लक्ष केले आहे. अर्थ राज्यमंत्री
जयंत सिन्हा यांनी लोकसभेत शुक्रवारी ही माहिती दिली. शेड्युल्ड व्यावसायिक
बँँकांच्या अडकलेल्या कर्जाचा आकडादेखील वाढून ३.४७ लाख कोटी रुपयांपर्यंत
पोहोचला असल्याची माहिती सिन्हा यांनी दिली. सिन्हा यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात सांगितले की, विलफुल डिफॉल्टरांनी (मुद्दाम कर्ज बुडवणारे) विविध बँकांकडून २५ लाख रुपयांपेक्षा जास्तीचे कर्ज घेतले आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत अशा डिफॉल्टरची संख्या ७,२६५ होती. यांच्याकडे एकूण ६४,३३९.५९ कोटी रुपये बाकी आहेत. यातील १,६२४ प्रकरणांत एफआयआर दाखल करण्यात आली आहे, ज्यांच्याकडे १६,६०१.९० कोटी रुपये बाकी आहेत.(दिव्य मराठी) |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा