शनिवार, २३ जानेवारी, २०१६

एखाद्या गोष्टीचा इतका उदोउदो केल्या जातो की,


सत्य इतके काळवंडते की ते खोटे वाटायला लागते. माझ्याकडे परवा एक उच्चविद्याविभूषित, मोठ्या पदावरून १५/२० वर्षांपूर्वी निवृत्त झालेली अति जेष्ठ व्यक्ती आली होती. मी त्यांना निरंजन टकले यांनी सरकारी कागदपत्रांच्या घेतलेल्या शोधाबद्दल सांगितले, तेंव्हा ते आश्चर्य चकित झाले. त्यांची अशी समजूत होती की सावरकर भारत स्वतंत्र झाल्यावरच अंदमानच्या तुरुंगातून सुटले.
दुसरा धक्का त्यांना बसला जेंव्हा मी त्यांना सांगितले की सावरकरांनी माफीसाठी सात अर्ज केले होते व पहिला अर्ज तुरुंगात दाखल झाल्यावर दोनच महिन्यांनी केला होता. काही केल्या त्यांना ही गोष्ट पटत नव्हती. मला मात्र ही गोष्ट २५ वर्षांपूर्वीच कळली होती.
मला शेजारपाजारच्या शालेय विध्यार्थ्यांची शालेय पुस्तके मागून वाचायची खोड आहे. तेंव्हाच्या दुसरी/तिसरीच्या  बालभारतीच्या पुस्तकात सावरकरांच्या 'माझी जन्मठेप' या पुस्तकातील एक प्रकरण धडा म्हणून अभ्यासाला होते. या धड्याची सुरवातच सुटकेची सूचना दर्शविणाऱ्या एका  वाक्याने होती. ते वाक्य असे, सावरकरांना तुरुंगात निरोप मिळतो "बातमी चांगली आहे". तेंव्हा पासून माझ्या डोक्यात हा किडा वळवळत होता. व लवकरच सत्यही समझले.
चार /पाच वर्षांपूर्वी एक पुस्तिका मिळाली. तिचे शीर्षक होते 'माफीवीर सावरकर'. त्यातून बरीच माहिती मिळाली. ९९ टक्के लोकांना हेही माहित नाही कि गांधीजींच्या हत्येप्रकरणी सावरकर हेही एक आरोपी होते पण कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. एरव्ही आपण म्हणतो धुर दिसतो म्हणजे आग लागली असावी. पण म्हटले जाऊ द्या.काही लोकांना ते आवडत असतील तर आवडू द्या. आपल्या काय बापाचे जाते.
पण गोष्ठ जेंव्हा संसदेत तैलचित्र लावणे किंवा भारत रत्न देण्यापर्यंत येते तेंव्हा स्वस्थ बसणे म्हणजे ……….

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा