शुक्रवार, १ जानेवारी, २०१६










 

  

ये श्रीपाल सबनीस कीस झाड की पत्ती हैं ? ………. 

२००२ साली मोदी फक्त गुजरात दंगलीबद्दल ज्यांना माहिती आहे अश्याच मंडळींना माहित होते किंवा ज्यांचे सामान्य ज्ञान (GK ) बऱ्यापैकी आहे अश्यांना. गुजरात दंगलीनंतर लगेच (की जेंव्हा मोदी आतासारखे सर्वांना माहित नव्हते) सुप्रसिद्ध नाटककार विजय तेंडूलकर यांनी मोदीबद्दल फारच जहाल/कडवट प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्यासमोर श्रीपाल सबनीस म्हणजे कीस झाडकी पत्ती. तेंव्हा मोदी एव्हढे प्रसिद्ध झाले नव्हते. त्यामुळे एका ठराविक वर्तुळातच त्याचे प्रतिसाद उमटले होते. आता मात्र मोदींबद्दल काही बोलल्या गेले तरी त्याचे भरपूर साद/पडसाद उमटतात (किमान सोशल मिडीयावर तरी. अर्थात सबनीसांची प्रतिक्रिया सर्वच मर्यादा ओलांडून गेलेली आहे. ज़िज्ञासुंनी तेंडुलकरांची ती प्रतिक्रिया काय होती याची अवश्य माहिती घ्यावी. त्यासाठी तेंव्हाची वर्तमानपत्रे धुंडाळावी लागतील. किंवा वाहिन्यांचे फुटेज उपलब्ध असल्यास ते पहावे लागेल. किंवा मग विकीपेडिया आहेच. पण मुद्रित माध्यमे जास्त विश्वसनीय समजावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा