गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५

मोदीभक्तांना सीमेपलीकडून आलेला आहेर  ………

बातमी ---
"दबावामुळेच मोदी लाहाेरमध्ये
पाकचे एनएसए अजीज यांची संसदेत माहिती
वृत्तसंस्था | इस्लामाबाद
आंतरराष्ट्रीय दबावामुळेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पाकिस्तानला भेट दिली होती. दोन्ही देशांत चर्चा सुरू व्हावी, असे अवघ्या जगाचे मत होते, अशी माहिती पाकिस्तानचे परराष्ट्र सल्लागार सरताज अजीज यांनी तेथील संसदेला दिली.
 
पाक संसदेच्या सिनेट या वरिष्ठ सभागृहात खासदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. खास याच मुद्द्यावर ही बैठक बोलावली होती. संसदेत अजीज म्हणाले, मोदींच्या या भेटीचे जास्त अर्थ काढले जाऊ नयेत. मात्र ती २०१३ मध्ये बंद पडलेल्या चर्चेला चालना आणि सर्व मुद्द्यांची सोडवणूक करण्यास सहायक ठरेल.
विमानतळावर व्हिसा
अजीजम्हणाले, मोदींसोबत सुमारे १०० जणांचे शिष्टमंडळ व्हिसाविना लाहेरच्या विमानतळावर उतरले होते. विमानतळावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या खासगी कर्मचारी टीममधील ११ सदस्यांसाठी ७२ तासांचा व्हिसा जारी करण्यात आला होता." (दिव्य मराठी)
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा