मंगळवार, १९ जानेवारी, २०१६

'शेळीला सिंह बनवले'

काल आय बी एन लोकमतवर चर्चा ऐकली. सावरकर भारतरत्न पुरस्कारासाठी पात्र आहेत काय ?
'द विक' साप्ताहिकात निरंजन टकले यानी 'शेळीला सिंह बनवले' हा लेख लिहिला.
तेही चर्चेत सहभागी होते. त्यांचे म्हणणे असे की मी तेवीस हजार कागदपत्रे अभ्यासून हा लेख लिहिला. मात्र अतुल भातखळकर काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हते.
भरीसभर म्हणजे हिंदू महासभेचे जोशी यांनी नवीनच आरोप केला.
ते म्हणाले गोळवलकरांनी नेहरूंशी हातमिळवणी केली होती.
आय बी एन लोकमतच्या संकेतस्थळावर कदाचित व्हिडीओही उपलब्ध होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा