कर्नाटकमध्ये आता प्रेम करायचीही भीती वाटते ! ………
देशातील सर्वात युवा साहित्यिक मुद्दू तीर्थहळ्ळी हिची खंत;
राज्यात दादागिरी वाढतेय
लेखक,कलावंतांना धमक्या मिळणं कर्नाटकात नित्याचंच आहे. त्यातूनच नवा इतिहास मांडू पाहणाऱ्या एम. एम. कलबुर्गी यांचा खून झाला. आमच्या राज्यात सांस्कृतिक संघटनांची दादागिरी इतकी वाढलीय की, िमत्र िनवडताना तो परधर्मीय नाही ना, याचा हजारदा िवचार करावा लागतो. एकेकाळच्या सहिष्णू आणि पुरोगामी असणाऱ्या कर्नाटकात आता प्रेम करायचीही भीती वाटत अाहे, अशी खंत साहित्य अकादमी पुरस्कार परत करणारी देशातील सर्वात अल्पवयीन साहित्यिक मुद्दू तीर्थहळ्ली हिने 'दिव्य मराठी'कडे व्यक्त केली.
गुजरातमधील
नवसारीजवळच्या दांडी येथे शनिवारी शेकडो लेखक, कलावंत जमले होते. देशातील
वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात त्यांनी 'निर्भय बनो' रॅली काढली.
त्यामध्ये सहभागी होण्यासाठी १७ वर्षीय मुद्दू येथे आली होती. 'कलबुर्गी
माझे मार्गदर्शक होते. धारवाडला त्यांना अनेकदा भेटले होते. त्यांची हत्या
झाल्यानंतर मला धक्का बसला. हत्येचा निषेध करायला पाहिजे असं वाटलं. त्याचा
एकमेव मार्ग पुरस्कार वापसी हा होता. त्यामुळेच साहित्य अकादमी पुरस्कार
परत केल्याचं तिनं सांगितलं.राज्यात दादागिरी वाढतेय
लेखक,कलावंतांना धमक्या मिळणं कर्नाटकात नित्याचंच आहे. त्यातूनच नवा इतिहास मांडू पाहणाऱ्या एम. एम. कलबुर्गी यांचा खून झाला. आमच्या राज्यात सांस्कृतिक संघटनांची दादागिरी इतकी वाढलीय की, िमत्र िनवडताना तो परधर्मीय नाही ना, याचा हजारदा िवचार करावा लागतो. एकेकाळच्या सहिष्णू आणि पुरोगामी असणाऱ्या कर्नाटकात आता प्रेम करायचीही भीती वाटत अाहे, अशी खंत साहित्य अकादमी पुरस्कार परत करणारी देशातील सर्वात अल्पवयीन साहित्यिक मुद्दू तीर्थहळ्ली हिने 'दिव्य मराठी'कडे व्यक्त केली.
बारावीत शिकणाऱ्या मुद्दूच्या दोन कादंबऱ्या, दोन कवितासंग्रह आणि ललित लेखाचं एक अशा पाच कलाकृती प्रकाशित झाल्या आहेत. बारा वर्षांची असताना मुद्दू साहित्य अकादमी पुरस्काराची मानकरी ठरली. तिच्या ललित लेखसंग्रहास २०११ मध्ये कर्नाटक साहित्य अकादमीचा 'युवा पुरस्कार' मिळाला. कन्नड लेखक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या झाली, तेव्हा मुद्दूने आपला पुरस्कार परत केला. पुरस्कार वापसीच्या चळवळीतील सर्वात अल्पवयीन म्हणून मुद्दू त्यावेळी चर्चेत आली होती.
'जंगलाच्या वाटेवरचे फूल' या तिच्या कादंबरीवर चित्रपट आला आहे. शिमोगातील सह्याद्री हायस्कूलमध्ये बारावीत ती शिकते आहे. तिला कन्नड साहित्यात पीएच. डी. करायची आहे. म्हणूनच दहावीला ८० टक्के गुण िमळूनही तिने कला शाखा निवडली. शाळकरी वयात कादंबरीकार झालेल्या मुद्दुच्या कुटुंबात लेखनकलेचा वारसा नव्हता. आई गृहिणी तर वडील मरीन इंजिनिअर आहे.
मुद्दू म्हणाली-
'कर्नाटकात आज सहलीच्या बसमध्ये परधर्मीय विद्यार्थ्यांबरोबर जाता येत नाही.
काय खावं, काय नेसावं या बाबी संघटना ठरवू लागल्यात. मोठेपणी काय बनायचं, हेसुद्धा आम्ही ठरवायचं नाही. मग प्रेम वगैरे तर सोडूनच द्या, इतका कर्नाटक बदलला आहे.'
कर्नाटकात याआधी भाजपचं सरकार होतं. आता काँग्रेसचं आहे. सरकार बदलूनही मुस्कटदाबी कायम आहे. सरकार कोणत्याही पक्षाचं असले तरी खरा प्रश्न अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा आहे, असं तिचं म्हणणं आहे.
(अशोक अडसूळ | दांडी (गुजरात)दिव्य मराठी)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा