रविवार, १३ मार्च, २०१६

 पंतप्रधानांच्याच आईची नाेकरी गेली.


पीएमच्या कॉस्ट कटिंगमुळे आई बेरोजगार   
मुलगा देशाचा पंतप्रधान असूनही त्यांची आई एका बालकल्याण केंद्रात (चिल्ड्रन सेंटर) नोकरी करत आहे. देशात महागाई वाढली आणि मंदीचे संकेत दिसताच मुलाने सरकारी परिषदांना मिळणाऱ्या निधीत कपात केली. यामुळे बालकल्याण केंद्र बंद झाले आणि पंतप्रधानांच्याच आईची नाेकरी गेली.  
हा किस्सा आहे ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून व  त्यांची ७२ वर्षीय आई मेरी कॅमेरून यांचा. महागाई व मंदीमुळे सरकारने खर्चांत कपातीचे धोरण अवलंबले आहे. यामुळे सरकारने सर्व काैन्सिल्सना (परिषदा) दिल्या जाणाऱ्या मदत निधीत २०२० पर्यंत २४% कपातीचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक परिषदा बंद झाल्या आहेत. कॅमेरून यांच्या आईचे सेंटरही या कारणाने बंद झाले.  ७२ वर्षांच्या मेरी ऑक्सफोर्टशायरमध्ये  सेंटर २४ मार्चला अधिकृतरीत्या बंद केले जाईल. तोवर मेरी तेथेच काम करत राहतील. 
याबाबतीत मुलाशी चर्चा केली आहे का, या प्रश्नावर मेरी म्हणाल्या, मी डेव्हिडशी बोललेले नाही. मला त्याच्या कामात हस्तक्षेप करायचा नाही.(सविस्तर बातमी दिव्यमराठीच्या १३/०३/२०१६ च्या अंकात पान ३ वर )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा