इकडे असहिष्णुता तर तिकडे सहिष्णुता ……
पाकिस्तानात होळी, दिवाळीचीही सुटी !
| |
|
पाकिस्तानात अल्पसंख्य असलेल्या हिंदू समुदायासाठी प्रथमच होळी दिवाळीची
सुटी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय ईस्टर सार्वजनिक सुटी असेल.
पाकिस्तानी संसदेने मंगळवारी या सुट्यांना मंजुरी दिली. पीएमएल-एनचे हिंदू खासदार रमेश कुमार वांकवानी यांनी संसदेत प्रस्तावात म्हटले होते की, सरकारने होळी, दिवाळी आणि ईस्टरसाठी अधिकृत सुटी जाहीर करावी. त्यावर मंत्री पीर अमीनुल हसनत शाह यांनी या सुटीबाबत गृहमंत्रालयाने सरकारी कार्यालयांना यापूर्वीच आदेश दिले असल्याचे सांगितले. |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा