भाजप सत्तेत आलयानंतर रॉबर्ट वढ्रा यांचे प्रकरण उकरून काढणारे सनदी अधिकारी अशोक खेमका यांची बदली पुरातत्व खात्यात करण्यात आली. आणि आता तर त्यांचे प्रमोशन होऊन सुध्दा त्यांना पोस्टिंग दिल्या जात नाही कारण ते सत्ताधार्याँना अडचणीत आणू शकतात. अमरावतीचे कर्तव्यकठोर पालिका आयुक्त हे बिल्डर लॉबिला नको होते. त्यांची बदली पालक मंत्री पोटे यांनी केली की माजी राज्य मंत्री व विद्यमान आमदार सुनील देशमुख यांच्यामुळे झाली यावर काथ्याकूट होत आहे पण ही बदली भाजप सरकारने केली आहे. कारण हे सरकार बिल्डर धार्जिणे आहे. सर्वच बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याचा आदेश सरकारने काढला. पण कोर्टाने त्यावर मनाई हूकूम बजावला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा