पोलादी महिलेची आणखी एक दखलपात्र कामगिरी.
१९७१ साली इंदिराजींनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून पाकिस्तानकडून लेखी शरणागती घेतली होती, शिवाय पाकिस्तानचे ९३,००० सैनिक ताब्यात घेतले होते. आज १६ मे. आजच्या दिवशीच १९७५ साली सिक्कीम हे भारताचे २२ वे राज्य बनले. तत्पूर्वी सिक्कीम हा भारताच्या संरक्षणाखाली एक स्वतंत्र देश होता. केवळ संरक्षण, परराष्ट्र व्यवहार व परराष्ट्र धोरण ह्या बाबी भारताने बघायच्या होत्या. तेथे १९५३ मध्ये सिक्कीम मध्ये मंत्रिमंडळही गठीत करण्यात आले होते. मात्र सिक्कीमच्या राजाबद्दल लोकांचा असंतोष वाढू लागला. १९७५ मध्ये सिक्कीमच्या पंतप्रधानांनी भारतीय संसदेला विनंती करून सिक्कीमला भारतात सामील करून घेण्याची विनंती केली. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ताबडतोब सिक्कीममध्ये सैन्य पाठवून चोग्यालच्या राजवाड्यावरील सैनिकांना नि:शास्त्र केले. पुढे घटना दुरुस्ती करून सिक्कीमला भारतात रीतसर सामील करून घेण्यात आले. इंदिराजी असा ढग होत्या जो गर्जत नव्हता पण समरसून बरसायचा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा