यापूर्वी १९६३ ते १९७४ सतत अकरा वर्षे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बिगर मराठा होता ………
त्याविरुद्ध एका मराठा मर्दाने आवाज उठवला होता. तो म्हणजे तो नसून त्या होत्या. त्या म्हणजे शालिनीताई पाटील. त्यांनी ठणकावून सांगितले होते की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठाच हवा. त्यांच्या मुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलल्या गेला हे खरे. पण ज्यांना करायला पाहिजे होते त्या वसंतदादा पाटलांना न करता शंकरराव चव्हाण यांना करण्यात आले होते. तत्पूर्वी एक दीड वर्षे वसंतदादा मुख्यमंत्री होते, तेंव्हा कॉंग्रेस दोन गटात विभागल्या गेली होती. मात्र 'साहेब' उर्फ 'जाणते राजे' यांनी बंडाचे निशाण फडकावून जनसंघ (आताचा भाजप), समाजवादी यांच्या मदतीने औट घटकेचे मुख्यमंत्रीपद मिळवले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा