मंगळवार, १४ जून, २०१६

चीनच्या विकासाच्या प्रेमात पडलेल्यांसाठी ……

चीन जगातील सर्वाक जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. त्यांची लोकसंख्या जवळपास 1 अब्ज 35 कोटी आहे. चीनचे काही रहस्य असे आहेत, जे जगात क्वचितच लोकांना ठाऊक असतील. चीनच्या लोकांना वाटते, की याविषयी जगातील कुणालाच काही माहिती होऊ नये. आज आम्ही तुम्हाला चीनच्या रहस्यांविषयी माहिती सांगत आहोत...
सरळ गोळ्या घालतात...
सर्व देशांनी शिक्षा देण्याच्या प्रक्रियेत थोडी सुट दिली आहे. परंतु चीन जून्याच कायद्याचे पालन करते. येथे गुन्हेगारांना फाशी किंवा केमिकल अटॅक न देता सरळ गोळी मारून ठार केले जाते. 2005मध्ये जगभरात जितक्या लोकांना मृत्यूची शिक्षा देण्यात आली, त्यात एकमेव चीनची संख्या चारपट जास्त होती. 
रिकामे आहेत मॉल...

चीन गर्वाने सांगते, की त्यांच्या देशात मोठ-मोठे मॉल आहेत. त्यांचे नाव न्यू साऊथ चाइना मॉल आहे. त्यात 2350 दुकाने आणि 70 लाख स्क्वेअर फुट जागा भाड्याने देता येऊ शकते. परंतु हा मॉल सुरु झाल्यानंतर 7 वर्षांनी 99 टक्के जागा रिकामी आहे. याच्या प्रवेशव्दाराजवळ काही फास्ट फुडची दुकाने आहेत.
 
वायु प्रदुषण

चीनचे काही शहरे इतके दुषित आहेत, की लोकांना श्वास घेणेदेखील कठिण होऊन बसते. बिजींग आणि चीनच्या इतर क्षेत्रात नद्यांमध्ये फॅक्ट्री, कंपन्यांमधून निघणारे मटेरिअल, कचरा, घरातून बाहेर पडणारा कचरा टाकला जातो. त्यामुळे येथील वातावरण दुषित होते. येथील पाणी पिणे म्हणजे, मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. ही समस्या केवळ चीनपर्यंत मर्यादीत नाहीये, ही हवा उत्तर कॅलिफोर्नियापर्यंत जाते. 
लोक पितात दूषित पाणी...

संपूर्ण देशात दूषित पाण्याची मोठी समस्या आहे. दररोज 70 कोटी लोक अस्वच्छ पाणी पितात. केवळ 10 टक्के सीव्हेजचे रीयूज केले जाते. इतर अस्वच्छ पाणी नदी, तलाव आणि झ-यांमध्ये सोडले जाते. हा पाणीपुरवठा घरा-घरांत केला जातो. 
पुनर्जन्मावर बंदी...

एका हस्यास्पद दावा आहे, की चीन सरकारने बौद्ध भिक्षुंच्या पुनर्जन्मावर बंदी घातली आहे . तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कसे शक्य आहे? असे म्हटले जाते, की येथे पुन्हा जन्म घेण्यासाठी चीन सरकारची परवानगी घ्यावी लागते. वास्तवात, अशा हस्यास्पद प्रयत्नांमागे दलाई लामा यांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न आहे.
गोबी वाळवंटात सामावला जातोय चीन...

गोबी वाळवंट चीनचे सर्वात मोठे वाळवंट आहे. 500,000 स्क्वेअर मैलमध्ये पसरलेला आहे. हा पेरूच्या आकारमाना इतका आहे. हे वाळवंट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दरवर्षी यात 1400 स्क्वेअर मैल अंतर सामावले जात आहे. सतत होणारी जंगलतोड, पाण्याच्या कमतरतेने असे होत आहे.
10 of 10
 
 

  • चीन या गोष्टी जगापासून ठेवतो लपून, वाचा कोणत्या आहेत त्या?
    पुनर्जन्मावर बंदी...

    एका हस्यास्पद दावा आहे, की चीन सरकारने बौद्ध भिक्षुंच्या पुनर्जन्मावर बंदी घातली आहे . तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कसे शक्य आहे? असे म्हटले जाते, की येथे पुन्हा जन्म घेण्यासाठी चीन सरकारची परवानगी घ्यावी लागते. वास्तवात, अशा हस्यास्पद प्रयत्नांमागे दलाई लामा यांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न आहे.
  • चीन या गोष्टी जगापासून ठेवतो लपून, वाचा कोणत्या आहेत त्या?
    गोबी वाळवंटात सामावला जातोय चीन...

    गोबी वाळवंट चीनचे सर्वात मोठे वाळवंट आहे. 500,000 स्क्वेअर मैलमध्ये पसरलेला आहे. हा पेरूच्या आकारमाना इतका आहे. हे वाळवंट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दरवर्षी यात 1400 स्क्वेअर मैल अंतर सामावले जात आहे. सतत होणारी जंगलतोड, पाण्याच्या कमतरतेने असे होत आहे.
8 of 10
 





सोमवार, १३ जून, २०१६

जेथे जातो तेथे …… लाचलुचपत खात्याचे प्रमुख असतांना प्रवीण दीक्षित यांनी प्रशासनातल्या बड्या भ्रष्टाचारी धेंडांची चांगलीच कोंडी केली होती. मात्र मुख्यमंत्री त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीला धाऊन आले व त्यांनी दीक्षितांची पोलिस महासंचालकपदी नेमणूक केली. कारण मुख्य कोणीही असला तरी मोक्याच्या जागेवर कोण आहे हे महत्वाचे असते. पोलिस आयुकातापेक्षा ठाणेदार तुम्हाला जास्त मदत(?) करू शकतो. केवळ याच कारणामुळे काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की १५० वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी (RFO) सहायक वन संरक्षक पदी (ACF) मिळणारी बढती नाकारली होती. कारण RFO च्या पदावर काम करण्यात जी मजा (?) आहे ती ACF पदांवर कुठे?

मात्र पोलिस महासंचालक पदावर जाउन सुद्धा दीक्षितांनी आपला "सद् रक्षणाय" हा बाणा कायम ठेवला आहे. त्यांनी आदेश काढला की तक्रारकर्त्याला FIR ची कॉपी त्याच्या whatsapp वर पाठविण्यात यावी. बरेचदा ठाणे कर्मचारी त्यासाठी अळंमटळंम करतात किंवा चिरीमिरीची मागणी केली जाते.
म्हणजे मोठी माणसे हेथे जातील तेथे ……

गुरुवार, २ जून, २०१६

बॉबीबद्दल गैरसमज नको. 

'बॉबी' हा गाजलेला सिनेमा (डिम्पल कपाडिया) बहुतेक सर्वांनी पाहिला आहे. त्यानंतर "बॉबी जासूस' नावाचाही एक चित्रपट (विद्या बालन) येउन गेला. या दोन्ही चित्रपटात बॉबी हे  स्त्री पात्राचे नांव होते. मात्र इंग्रजीतील बॉबी हे नाव/शब्द  ब्रिटनमधून आलेले आहे. तेथे रॉबर्ट या नावाचे लघुरूप बॉबी असे करतात.  आणि रॉबर्ट हे पुरुषाचे नाव आहे. म्हणजे तेथे फक्त पुरुषच 'बॉबी' असू शकतात. महिला नव्हे. दुसरे असे की लंडनमध्ये पोलिसाला बॉबी म्हणण्याचा फार जुना प्रघात आहे. जुना म्हणजे जेंव्हा महिलांची पोलिसात भरती होत नव्हती तेंव्हापासून म्हणजे येथेही बॉबी हे नाव पुरुषांसाठीच आहे. आता अर्थात पुरुष पोलिस असो किंवा महिला पोलिस दोघंही बॉबीच असतील बहुधा.

आज ३ जून. बत्तीस वर्षांपूर्वीची ती घटना ………

दहा वर्षे खलिस्तानी दहशतवाद्यांनी पंजाब मध्ये अनेक निरपराध नागरिकांची हत्या केली. समझोत्याचे सर्वप्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर शेवटी ३ जून १९८४ ला (म्हणजे आजच्याच दिवशी)  इंदिराजींनी 'ऑपरेशन ब्लू स्टार' या मोहिमेअंतर्गत लष्करी कारवाई करून दहशतवाद्यांचा निपा:त केला. शिखांचा स्वयंघोषित मसिहा  म्हणवून घेणाऱ्या व अमृतसरच्या सुवर्णमंदिरात  मांडून बसलेल्या भिंद्रानवाले हा या मोहिमेत मारल्या गेला. या घटनेचा खलिस्तानी दशहतवादी बदला घेतील याची सर्वांना कल्पना होती. इंदिराजींच्या निवासस्थानी असलेल्या सुरक्षा कर्मचारयांमध्ये काही शीख कर्मचारी होते. त्यांना तेथून हटवावे अशी अधिकाऱ्यांनी इंदिराजींना सुचना केली. मात्र इंदिराजींनी ही सुचना फेटाळून लावली. शेवटी व्हायचे तेच झाले. सुरक्षा कर्मचारयांनीच इंदिराजींची हत्या केली.
या मोहिमेच्या वेळेस लष्कर प्रमुख असलेले व निवृत्तीनंतर पुण्यात स्थाईक झालेले जनरल अरुण वैद्य यांची पुण्यात भरदिवसा हत्या करण्यात आली अशा प्रकारे खलिस्तानी दहशतवाद्यांचा दुष्ट मनसुबा प्रत्यक्षात आला.
कॉंग्रेसला स्युडो सेक्युलर (छद्म धर्मनिरपेक्ष) असे म्हटले जाते.  स्वत:च्या जीवाची भीती असूनसुद्धा शीख सुरक्षा कर्मचारयांना न हटविणाऱ्या इंदिराजींना स्युडो सेक्युलर म्हणावे काय?
इंदिराजींचा खून करणाऱ्या दहशतवाद्यांचा पंजाबमधील काही संघटना 'शहीद' म्हणून दरवर्षी त्यांचे 'पुण्य' स्मरण करतात. त्यांच्या नातेवाईकांचा सत्कार केल्या जातो.. तेथील अकाली दल सरकारच्या मनातही या खुन्यांबद्दल सहानुभूती आहे.
महात्माजींच्या खुन्याचेही आजकाल 'पुण्य'स्मरण केल्या जाते.
तिकडे तामिळनाडूतही राजीवगांधींच्या खुनातील शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना केंव्हा सोडतो याची 'अम्मा' सरकारला घाई झाली आहे. कोर्टाने आडकाठी घातल्यामुळे ते लांबणीवर पडले आहे.
राजीवजींच्या खुनातील आरोपींची प्रियांका गांधी यांनी तुरुंगात भेट घेऊन आपण खरे गांधीवादी आहोत हे दाखवून दिले आहे. असा हा इतिहास आहे.