भारताने बलुच आंदोलनाच्या नादी लागू नये.
मोदींनी आवेशात येऊन पाकिस्तानला बलोच आंदोलनावरून डीवचले. मात्र आपण हे विसरता कामा नये की, भारतातसुद्धा निरनिराळया प्रांतांत फुटीरतावादी आंदोलने नेहमी सुरु असतात. पजांबमध्ये दहा वर्षे आपण अराजकतेचा कालखंड पाहिलेला आहे. अनेक निरपराध जीवांचा त्यात बळी गेलेला आहे. या आंदोलनाला पाकिस्तानची फूस व मदत होती. पंजाब प्रांत पाकिस्तानच्या सीमेलगत आहे. पाकिस्तानातील 44 % लोकं पंजाबी भाषा बोलतात.अजूनही खलिस्तानच्या (स्वतंत्र पंजाब) मागणीला समर्थन असणाऱ्यांची संख्या कमी नाही. खलिस्तान आंदोलनांचा ऑपेरेशन ब्ल्यु स्टार मोहिमेद्वारे बिमोड करणाऱ्यl इंदिराजी व तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल अरुण वैद्य यांचा खलिस्तानवादी अतिरेक्यांनी खून केला. त्या मारेकरयांच्या नातेवाईकांचl दरवर्षी सत्कार केल्या जातो.उद्या जर पाकिस्तानने या आंदोलनाला पुन्हा बळ द्यायचे ठरविले आणि खलिस्तानवाद्यांना मदत पोहोचवून त्यांना स्वतंत्र पंजाब निर्माण करण्याचे स्वप्न दाखविले. तर ती भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरेल.तिकडे ईशान्य भारतही अशांत आहे आणि अरुणाचल व अन्य भूभागावर चीन टपून आहे. अरुणाचलमधील नागरिकांना स्टेपल व्हिसा देण्याचा आगाउपणा चीन करत असतो. भारत-पाक वादात आपण पाकच्या बाजूने उभे राहू असे चीनने जाहीर केले आहे. ईशान्य भारतातील जनता स्वतःला भारतीय समजण्यास तयार नाही.अशा परिस्थीतीत भारताने बलुच आंदोलनास बळ द्यायची चूक केल्यास एकीकडे पाकिस्तान व दुसरीकडून चीन भारताला पोखरण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. समोरासमोरील युद्धापेक्षा असे छुपे युद्ध भारताची जास्त दमछाक करू शकते. शिवाय फुटीरतावादयांचे मनोरथ पूर्ण होण्याची शक्यताही नाकारता येतं नाही. तेंव्हा भारताने बलुच आंदोलनापासून दूर रहावे हे उत्तम.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा