शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६

मोदीजी,
आपण परवा एक बिनतोड  सवाल केलात.
व्हाटसअप वापरता मग कॅशलेस व्यवहार का करत नाही?

तर त्याचे असे आहे मोदीजी,
व्हाटसप हा एक निरुपद्रवी प्रकार आहे.
व्हाटसप वापरतो म्हणजे काय तर आमच्यापैकी बहुतांश मंडळी इकडून आलेला संदेश तिकडे पाठविणे, आलेल्या संदेशावर उपलब्ध असलेल्या चित्रांपैकी एखादे चित्र प्रतिक्रिया म्हणून डकवणे इतपतच त्यांची मजल असते.
बऱ्याच मंडळींच्या फेसबुक अकाउंटवर प्रोफाइलशिवाय दुसरे काहीही नसते. व वाचलेल्या पोस्टवर लाईक करण्यापेक्षा जास्त त्यांचा तेथेही सहभाग नसतो.
स्वतंत्र संदेश तयार करून तो इतरांना पाठवणे वगैरे ज्यांना जमते अशी मंडळी फार थोडी आहे.

कॅशलेस व्यवहाराचे तसे नाही.
सायबर गुन्हे वाढले आहेत.
आजकाल कॉम्प्युटर/ स्मार्ट फोन हॅक होणे नित्याची बाब झाली आहे.
स्मार्ट फोन वरून ऑनलाईन व्यवहार केला तर तुमचे पासवर्ड, अकाउंटची माहिती, तुमच्या फोनचे तपशील वगैरे सहज चोरले जाऊ शकतात.
तुमची एव्हढी ५६ इंचाची छाती असूनही तुमच्या सरकारच्या वेब साईट्स अनेकदा हॅक झाल्या आहेत.

परवा तर म्हणे ट्विटरचा जनक असलेल्या व्यक्तीचेच ट्विटर अकाउंट हॅक झाले होते. आणि आम्ही तर फार किरकोळ आहोत.
आता साधी गोष्ट घ्या ना. कुणी तरी आम्हाला फोन करून सांगतो कि
'तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे तुमचा पासवर्ड सांगा.
आम्ही भीतीने घाबरून जाऊन धडाधड माहिती सांगून मोकळे होतो आणि आमचं बँक अकाउंट रिकामं होतं.

आजकाल स्माटफोन बरयाच लोकांकडे असतो. ज्यांना वापरता येत नाही त्यांच्याकडेही असतो. (माझ्याकडेही आहे), कारण तो स्टेटस सिम्बॉल (प्रतिष्ठेचे लक्षण) सिम्बॉल झालेला आहे. नोकरीला लागलेली मुलं आपल्या पालकांना स्मार्ट फोन घेऊन देतात. जेष्ठ नागरिकांचा वेळ त्यात जातो. ते काही टेक्नोसॅव्ही नसतात. त्यातील पूर्ण फंक्शन्स/फीचर्स सुद्धा ते वापरू शकत नाहीत.

मजूर वर्गाकडेपण स्मार्ट फोन आहेत. त्यांनाही त्याच्या वापराचे ज्ञान मर्यादित असते. सायबर धोक्याची त्यांना कल्पनाही नसते.
हे सर्व स्व. राजीव गांधींनी आणलेल्या कॉम्प्युटर क्रान्तीमुळे शक्य झाले आहे.
एक  झाले युपीए सरकारने आणलेल्या आधार कार्डाच्या योजनेमुळे आता फसवणुकीला मोठया प्रमाणात आला बसणार आहे व बायोमेट्रिक ओळख घेणे सुरु केली तर व्यवहार अजून सुरक्षित होतील.

तेंव्हा तोपर्यंत  ......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा