बुधवार, २९ जुलै, २०२०

१९६५ आणि १९७१ मध्ये काय फरक आहे?  मोदी सरकारने १९६५च्या युद्धाला पन्नास वर्षे झाली म्हणून २०१५ मध्ये  एक आठवड्याचा जंगी समरणसोहळा साजरा केला कारण १९६५ साली गांधी आडनावाची व्यक्ती पंतप्रधानपदावर नव्हती. यावर्षी १६ डिसेम्बरपासून बंग्लायुद्धाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरु होत आहे पण जर तोपर्यंत मोदी/भाजप  सत्तेवर असलेच तर त्याचा कुठलाही समरणसोहळा साजरा होणार नाही याबद्दल मला खात्री आहे कारण १९७१ साली गांधी आडनावाची व्यक्ती पंतप्रधानपदावर होती. आणि त्यांना गांधी आडनावाची ऍलर्जी आहे. यावर्षी १६ डिसेंबरपासून बांगलायुद्धाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरु होणार आहे. इंदिराजींनी फक्त १५ दिवसात पाकचा निर्णायक पराभव करून बांगलादेशाची निर्मिती केली. इंदिराजींनी १९७१ साली जगाचा फक्त इतिहासच नव्हे तर भूगोलही बदलला. १९७१ साली पाककडून फक्त लेखी शरणागतीचा नव्हे तर ९३,००० सैनिक ताब्यात घेतले. इंदिराजींच्या खेळीमुळे पाकमधील लष्करी राजवट संपून लोकशाही सरकार सत्तेवर आले. १९७१ साली 
१९६५ साली पाकने अमेरिकेकडून सॅबरजेट विमाने घेतली होती व त्यांचा पराभव झाला होता. आपल्या  देशी बनावटीच्या नॅट विमानांनी अमेरिकेच्या सॅबरजेट विमानांचा धुव्वा उडवला होता, आपल्या देशी बनावटीच्या रणगाड्यांनी अमेरिकेच्या पॅटर्न टॅंक ना गारद  केले होते . शास्त्रीजी पंतप्रधान असतांना भारतीय सैन्याने लाहोर शहराला वेढा घातला होता. 

रविवार, २६ जुलै, २०२०

भारताने पहिला अणुस्फोट १८ मे १९७४साली इंदिराजी पंतप्रधान असतांना केला होता 

शनिवार, २५ जुलै, २०२०

अशी खिलाडूवृत्ती भारतातातील काही लोकांनी सुद्धा दाखविली नव्हती.... मनमोहनसिंग पंतप्रधान झाले तेंव्हा त्यांच्या पाकिस्तानातील जन्मगावी पेढे वाटल्या गेले होते. पण पाक सरकारने तेथील गावकऱ्यांना 'देशद्रोही' म्हणून जाहीर केले नव्हते. सोनियाजी पंतप्रधान होणार म्हणून सुषमा स्वराज मुंडन करणार होत्या.
रत्नाकर महाजन सवाल करताहेत, "राष्ट्रपतींनी आपल्या  भाषणात नेहरूंचा उल्लेख न करता ज्या दीनदयाल यांचा उल्लेख केला ते कोण आहेत. स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे योगदान काय?"
गांधीजींवर चित्रपट बनवावा असं एकाही भारतीय चित्रपट निर्मात्याला   वाटले  नाही शेवटी  एका गोऱ्या माणसाने गांधीजींवर चित्रपट बनवला. इंग्रजांनी भारतावर राज्य केले एका इंग्रजाने गांधींवर चित्रपट बनवला. काँग्रेसचा संस्थापक अध्यक्ष (१९८४) हा एक निवृत्त इंग्रज सनदी अधिकारी होता. काही इंग्रजांना भारत स्वतंत्र व्हावा हे वाटत होते तर काही भारतीय दुरुन गम्मत पाहत होते. 

शुक्रवार, १७ जुलै, २०२०

पेशवाईतील कलंकीत अध्याय 
"... माधवराव पेशवा बनाया गया इस कारण से रघुनाथ राव और माधवराव की लड़ाई छिड़ गई । रघुनाथ राव को जेल में कैद कर लिया। हालांकि माधवराव पेशवा की मृत्यु के बाद उनके छोटे भाई नारायण राव ने रघुनाथ राव को जेल से बाहर कर लिया जिस कारण से रघुनाथ राव ने गर्दी सैनिकों द्वारा जो कि अंगरक्षक थे उन्होंने रघुनाथ राव के भतीजे नारायणराव को गणेश चतुर्थी के दिन 1773 में रघुनाथ राव ने अपने सैनिकों द्वारा मरवा दिया। नारायण राव की उम्र 18 वर्ष थी। नारायणराव लगातार अपने चाचा रघुनाथ राव से मदद मांगता रहा परंतु रघुनाथ राव ने उसकी कोई भी मदद नहीं की वह भागता भागता रघुनाथराव के कमरे में पहुंचा परंतु रघुनाथ राव ने उसकी मदद करने से इंकार कर दिया जिसके बाद नारायणराव का वध कर दिया गया और उसके शरीर के टुकड़े करके नदी में फेंक दिया गया। नारायण राव की किसी ने मदद नहीं की यह रघुनाथ राव के सिर पर सबसे बड़ा कलंक है। परंतु उसके बाद रघुनाथराव पेशवा फिर नहीं बनने दिया गया इस बार नारायण राव के 1 वर्षीय पुत्र माधवराव पेशवा जिन्हें माधवराव द्वितीय के नाम से भी जाना जाता है उनको मात्र 1 वर्ष भी कमाल की उम्र में पेशवा चुन लिया गया। कई सारे मंत्रियों ने जिन्हें 12 भाई समिति का निर्माण किया और उन्होंने माधवराव पेशवा बनाया और उसके बाद रघुनाथराव शनिवारवाड़ा छोड़कर भाग गए और अंग्रेजों से जा मिले जिसके कारण प्रथम आंग्ल मराठा युद्ध छिड़ गया जिसमें मराठों की जीत हुई और अंग्रेज और रघुनाथ राव हार गए। 1783 में पेशवा पद से पूर्ण रुप से रघुनाथ राव छिन गया और राव की मृत्यु हो गई।..."  https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5

बुधवार, १५ जुलै, २०२०

बोस इन नाझी जर्मनी’
 भारतीय जनमानसाला बऱ्यापैकी अज्ञात असलेले बोस या पुस्तकात उजागर होतात. ‘भारतातील प्राचीन सामाजिक रीतीरिवाज आणि परंपरा योग्यप्रकारे राबवण्यासाठी हुकुमशाहीच हवी’ असे बोस यांना वाटत होते. थोडक्यात मनुस्मृती आधारित व्यवस्था बोसांना अपेक्षित असणार. भारतीय समाज लक्षात घेता, फॅसिझम आणि कम्युनिझम भारतातच प्रथम अवतरेल अशी त्यांची ठाम धारणा होती. बोस यांना एकपक्षीय आक्रमकता आणि प्रसार याचं वावडं नव्हतं, तर गांधी आणि नेहरू यांना भारतासाठी ब्रिटिश साम्राज्यवादाइतकाच धोका नाझीझम आणि फॅसिझमचा वाटत होता. बोस इन नाझी जर्मनी’ : पडद्याआडचे बोस https://divya-m.in/MVSaYJgf27

रविवार, १२ जुलै, २०२०

शॉर्टकट फायदेशीर नसतो. दुर्दैव दोनदा आड आले.
नजमा हेपतूल्ला 44 वर्षे कॉंग्रेसमध्ये होत्या.
24 वर्षे कॉंग्रेस खासदार होत्या.
त्यापैकी सोळा वर्षे राज्यसभेच्या उपसभापति होत्या.
मात्र 2004 मध्ये एनडीएच्या 'शाइनिँग इंडिया' आणि 'फील गुड' ला भाळल्या आणि भाजपत गेल्या. आणि त्यांना 10 वर्षांचा वनवास भोगावा लागला.
2004 मध्ये युपीएचे सरकार आले. 2014 मध्ये वनवास सम्पला. मंत्री झाल्या.
पण हाय रे दैवा!
वय आडवे आले. 75 च्या पुढे गेल्यामुळे मंत्रीमंडळातून बाहेर पडावे लागले.
कॉंग्रेसमध्येच राहिल्या असत्या तर कदाचित प्रतिभाताई ऐवजी त्या राष्ट्रपति झाल्या असत्या.

तात्पर्य शॉर्टकट फायदेशीर नसतो.
तुर्कस्तानचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे तुर्कस्तानचे १९२३ ते १९३८ राष्ट्राध्यक्ष असलेले फिल्ड मार्शल अतातुर्क केमाल पाशा यांनी या मशिदीचे रूपांतर संग्रहालयात केले होते. तुर्कस्तानचे १९२३ ते १९३८ राष्ट्राध्यक्ष असलेले फिल्ड मार्शल अतातुर्क केमाल पाशा यांनी शंभर वर्षांपूर्वी स्त्रियांना बुरखा घालण्यावर कायद्याने बंदी घातली होती. पुरुषांनीसुद्धा आधुनिक पोशाख घालावा असे त्यांनी आवाहन केले होते. ते स्वतः व त्यांच्या पत्नीने पारंपरिक पोशाखाचा त्याग ला होता. 

रविवार, ५ जुलै, २०२०

इतिहास विसरता येत नाही नोबल पुरस्कार विजेते अलबर्ट आईन्स्टाईन हे जन्माने ज्यू होते. हिटलरचे रागरंग त्यांनी १९२२ सालीचा ओळखले होते. म्हणून त्यांनी जर्मनीच्याबाहेर नोकरी केली व १९३३ साली हिटलर सत्तेवर येताच जर्मनीचे नागरिकत्व सोडून दिले.