गुजरात याही बाबतीत पुढे गुजरातमध्ये ५३९५ कोटी रुपयांचा हवाला घोटाळा उघड
अहमदाबाद । अमलबजावणी महासंचलनालयाने (ईडी) गुजरातमध्ये हवालामार्फत होणार्या जवळपास 5 हजार 395 कोटी रुपयांच्या देवाण - घेवाणीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी 79 आरोपींविरोधात आरोपपत्र जारी करण्यात आले आहे. देशातील आजवरचा हा सर्वात मोठा हवाला घोटाळा असल्याचा दावा अधिकार्यांनी केला आहे. हवालाच्या माध्यमातून सोने आणि मालमत्ता देवाण - घेवाणीचे काम करण्यात येत होते. गेल्यावर्षी डिसेंबर व जानेवारी, फेब्रुवारीमध्ये सुरतच्या आयसीआयसीआय बँकेच्या दोन शाखांचा वापर करण्यात आला होता. अहमदाबादच ईडीच्या अधिकार्यांनी सांगितले की बँकेने सुरतमध्ये दाखल केलेल्या एफआयआरनुसार या प्रकरणाचा तपास केला जात असून पोलिसांनी तीन आरोपींपैकी दोघांना अटक केली आहे. तर एकजण फरार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा