कन्या सासुराशी जाये…… सोनियाजी इटलीची कन्या. तर सानिया पाकिस्तानची सून. " मराठीत कन्या सासुराशी जाये, मागे परतून पाहे " अशी एक ओवी आहे. लग्न झाले तरी माहेरची ओढ कायम असते. सानिया म्हणते माझेपुर्वज शंभर वर्षांपासून भारतात आहेत. एक वृत्त वाहिनीने माहिती दिली की दोन माजी पंतप्रधान मनमोहनसिंग व इंद्रकुमार गुजराल सध्याच्या पाकिस्तानात जन्मलेले आहेत तर माजी गृहमंत्री लाल कृष्ण अडवानी हे सुद्धा पाकिस्तानातून भारतात आलेले आहेत. अशीही माहिती दिल्या गेली की अडवानी पाकिस्तान दौऱ्यावर गेले असतांना कराची शहरात असलेले त्यांचे वडिलोपार्जित घर पाहायला गेले होते मात्र तेथे आठ मजली अपार्टमेंट उभे झालेले पाहून त्यांना खूप वाईट वाटले होते. मनमोहन सिंग पंतप्रधान झाले तेंव्हा त्यांच्या पाकिस्तानातील जन्म गावी पेढे वाटल्या गेले होते. तरिही पाकिस्तान सरकारने तेथील गावकऱ्यांना गद्दार म्हणून घोषित केले नव्हते.
काही वर्षांपूर्वी भारतीय परराष्ट्र व्यवहार खात्यातील अधिकाऱ्यांना विदेशी महिला किंवा पुरुषाशी विवाह करण्यास मनाई होती. नंतर ही अट काढून टाकण्यात आली. माजी राष्ट्रपती पूर्वी परराष्ट्र खात्यात नोकरीस होते. त्यांच्या सुविद्य पत्नी ह्या ब्रम्हदेशच्या नागरिक होत्या. सोनियाजी लग्न होऊन भारतात रहायला आल्या. सानिया कुठे राहते याची मला माहिती नाही. ती जर अजूनही भारतात राहत असेल तर ती अजून सासूच्या राशीला ? गेली नाही असेच म्हणावे लागेल. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची मानलेली मुलगी सुद्धा नवऱ्याला घेऊन पंतप्रधानांच्या निवासस्थानीच राहत असे असे सांगतात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा