सोमवार, २० ऑक्टोबर, २०१४

हे लोकसभा निवडणुकी आधी सांगायला पाहिजे होते ना.

स्विस बँकेत जमा पैशांचा पाठलाग करणे व्यर्थ

प्रत्येकजण काळ्या पैशाबाबत जाणून घेण्यास उत्सुक आहे. मात्र सरकारने गेल्या शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की िवदेशात काळा पैसा ठेवणाऱ्यांची नावे जाहीर करता येणार नाहीत. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले. ज्या मोदी सरकारने िनवडणूक प्रचारात काळा पैसा आणि घोटाळ्यांचा मुद्दा उचलून धरला होता, तेच सरकार आता यूपीए सरकारप्रमाणे नावे जाहीर करण्याचा पवित्रा कसा घेऊ शकते, हा वादाचा मुद्दा राहिला.
मात्र ज्या लोकांनी स्विस बँकेत खाती उगडली आहेत, त्यांची नावे घेण्यात मोठा फायदा असा काहीच नाही, असे या प्रश्नाचे उत्तर आहे. पहिली गोष्ट यातील काही खाती खरी असतील. दुसरी गोष्ट म्हणजे, ही खाती अवैध असली तरी या खात्यांत पैसे असतील का नाही याची काहीच खात्री नाही. गेल्या काही वर्षांपासून या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण बरेच तापले आहे. अशा िस्थतीत िस्वस बँकेतील खात्यात काळा पैसा ठेवण्याइतके हे खातेधारक मूर्ख नाहीत. त्यामुळे या खात्यातील जमा पैशांचा पाठलाग करणे म्हणजे वेळेचा दुरुपयोग ठरणार आहे, हे अगदी सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.
काळा पैसा बाहेर जमा आहे आणि सरकार तेथे जाऊन तो परत आणण्यासाठी प्रतीक्षा करत आहे, अशी धारणा असणे ही काळ्या पैशांबाबत होणाऱ्या चर्चेबाबतची समस्या आहे. मात्र हे िदसते तेवढे सोपे नसते. भारतात जर नेटबँकिंगच्या माध्यमातून बँकेत पैसे जमा करता येत असतील तर िस्वस बँकेत नगदी पैसा जमा होत असेल हा समज िकतपत खरा आहे. माऊसच्या एका िक्लकवर पैसा सातासमुद्रापार जात असतानाच्या काळात हे शक्य आहे का.
काळा पैसा नेमका िकती आहे. याबाबतही संभ्रम आहे. जी संपत्ती िकंवा उत्पन्न कर अधिकाऱ्यांसमक्ष जाहीर केलेली नसेल िकंवा वास्तविक मूल्यापेक्षा कमी जाहीर केली असेल अशी संपत्ती किंवा उत्पन्न काळा पैसा गणन्यात येते. िस्वत्झर्लंड, कॅमेन आयलंडसारखे टॅक्स हेवन देश त्यांच्याकडे पैसे जमा करण्याने भारतात कर भरला आहे की नाही याकडे हे देश फारसे लक्ष देत नाहीत. याचा अर्थ असा आहे की असा पैसा परत आणण्यासाटी एकतर कर कायद्यात दुरुस्ती करावी लागेल िकंवा माफी योजना जाहीर करावी लागेल. तसेच एकदा काळा पैसा जाहीर झालेली रक्कम िकंवा संपत्ती नेहमीच काळा राहतो हे येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. दहा वर्षांपूर्वी डॉलर िवदेशात पाठवता येत नव्हता. आज हजारो डॉलर पाठवता येतात. पूर्वी असे केले तर तो काळा पैसा होता आज हा काळा पैसा मानला जात नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे काळा पैसा नेहमीच काळा राहील असे नव्हे. यातील काही भाग खर्च केला तर तो पांढरा होतो. उदाहरणार्थ, ज्या जमिनीचा कर पूर्वीच भरला आहे अशी एखादी जमीन खरेदी करण्यासाठी केलेला खर्च पांढरा पैसा मानला जातो. मात्र ही रक्कम जाहीर नाही केली तर ती काळा पैसा गणली जाईल. मात्र हाच पैसा मॉलमध्ये खरेदीसाठी वापरला मॉलने त्यावर प्राप्तिकर भरला तर तो व्हाइट गणला जाइल. मॉलने असे केले नाही तर ही रक्कम काळा पैसा मानली जाईल.ितसरी गोष्ट अशी की िवदेशात काळा पैसा दोन प्रकारे िनर्माण होतो. एकतर िनर्यातीचे अंडरइन्व्हॉसिंग िकंवा आयातीचे अंडरइन्व्हॉसिंग केले तर आणि गुप्तरीत्या कमावलेली रक्कम विदेशात ठेवली तर, आणि दुसरा प्रकार म्हणजे देशातील काळा पैसा अवैधरीत्या हवालाच्या माध्यमातून रुपयांत िवदेशी पाठवला ताे तेथे डॉलरच्या रूपात ठेवला जाऊ शकताे.
चौथी बाब, ज्या क्षेत्रात वास्तविक िकंवा कृत्रिम रूपात टंचाईची िस्थती आहे. उदाहरणार्थ िरअल इस्टेट िकंवा स्पेक्ट्रम. अशी टंचाई िनर्माण होणार नाही, अशी व्यवस्था िनर्माण करणे हा यावरचा उपाय आहे.
थोडक्यात काळा पैसा िनर्माण होणे थांबवण्यासाठी सुलभ धोरणे बनवण्यातच यावीत. तसेच असा पैसा परत आणण्यासाठी धोरण असावे. माफी योजनेअंतर्गत लोकांची ओळख गुप्त राखून त्यांचा पैसा परत आणण्यासाठी परवानगी द्यावी. धोरणे चांगली बनवली तरच त्याचे परिणाम चांगले िमळतील. काळ्या पैशांचा पाठलाग करता तो परत आणण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. (दिव्य मराठी)
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा