शनिवार, २४ जानेवारी, २०१५

असा हा आमचा " आमचा महानायक " " कामापुरता मामा ताकापुरती आजी बिग बीनी दोस्ती निभावली नाही?
प्रकाश मेहरा- अमिताभयांना सुपरस्टार बनवण्यात प्रकाश मेहरांचा मोठा वाटा होता; परंतु अखेरच्या काळात अमिताभ यांनी त्यांच्याशी संबंध तोडले होते.
सुनीलदत्त - सुनीलदत्त यांनी "रेश्मा और शेराalt39मध्ये अमिताभ यांना महत्त्वाची भूमिका दिली. परंतु ते दोघे कधी मित्र बनू शकले नाहीत.
विनोदखन्ना - अमिताभविनोद खन्ना यांनी अनेक चित्रपटांत मित्र भावाच्या भूमिका केल्या; परंतु विनोद अमिताभवर एडिटिंगमध्ये त्यांचे पात्र कमी केल्याचा आरोप करत अाले आहेत.
चंद्रकांत शिंदे | मुंबई
शत्रुघ्नसिन्हा यांचा मुलगा कुशच्या विवाह सोहळ्यात सहकुटुंब उपस्थित राहून बिग बी अमिताभ बच्चन यांनी शत्रुघ्न सिन्हांसोबतची मैत्री कायम असल्याचे सिद्ध केले. अमिताभ यांनी २००७ मध्ये अभिषेकच्या विवाहाप्रीत्यर्थ सर्वांना मिठाई पाठवली होती. त्यात शत्रुघ्न यांचाही समावेश होता. त्या वेळी शत्रुघ्न यांनी विवाहाला बोलावले नाही तर मग मिठाई कशाला पाठवली, असा शॉटगन प्रश्न करून मिठाई परत केली होती. त्यानंतर दोघे थेट कुशच्या विवाहातच एकत्र दिसले. अमिताभसोबत काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी म्हटले आहे की, ते कोणत्याही सहकलावंताचे मित्र बनू शकत नाहीत. अमिताभ यांनी रुपेरी पडद्यावर अनेक कलावंतांसमवेत चांगली जोडी जमवली. परंतु कुणासोबतच गाढ मैत्री केली नाही. विनोद खन्ना, शशी कपूर, शत्रुघ्न सिन्हा असो वा धर्मेंद्र. अमजद खान यांनी तर उघडपणे म्हटले होते की, अमिताभ कधीच चांगले मित्र बनले नाहीत. ज्या मेहमूदने अमिताभ यांना संधी दिली त्यांनीही म्हटले होते की, अमिताभने माझ्यासोबत जे केले ते इतर कुणासोबत करू नये. याउलट अमिताभ यांनी एका मुलाखतीत कठीण प्रसंगात माझे सर्व मित्र बदलले होते, असा आरोप केला होता. एके रात्री असा विचार करत राहिलो, मी कोण आहे? उत्तर मिळाले, एक अभिनेता. त्या दिवशी सकाळी ला फोन करून त्यांनी यश चोप्रांकडे काम मागितले. अमिताभ यांचे निकटवर्तीय राहिलेल्या अमरसिंह यांनीही अमिताभवर मैत्री निभावल्याचा आरोप केला होता. मात्र, अमिताभ यांनी एका मुलाखतीत त्यांची स्तुती केली. मृत्युदाता चित्रपट अपयशी ठरल्यावर अमिताभ निराश होते. त्यांची एबीसीएल कंपनी दिवाळखोर झाली होती. इन्कम टॅक्सवाले हात धुऊन त्यांच्या मागे लागले होते. अशा स्थितीत अमर सिंह यांनी बच्चन यांना कर्जातून बाहेर काढले. त्याउपरही आज त्यांच्या मैत्रीत दरी निर्माण झाली आहे.
कुश यांच्या विवाह सोहळ्यात अमिताभ शत्रुघ्न.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा