शुक्रवार, १६ जानेवारी, २०१५

व्ही के सिंगांएवढा पोरकट लष्कर प्रमुख स्वतंत्र भारताच्या इतिहासात झाला नसेल. एखाद्या कारकुनासारखे सरकारविरुध्द कोर्टात जाणे तेही स्वताची चूक असतांना , नोकरीच्या कालावधीत दहा प्रमोशन्स घेतांना या
नरपुंगवाला आपली जन्मतारीख चुकली आहे हे लक्षात आले नाही. हा सर्व प्रकार म्हणजे स्पेनमधल्या बुलफाईट मध्ये जसे  जेरीस आलेल्या बैलावर प्रमुख मारेकरी शेवटचा घाव घालतो तसे होते. कोर्टानेच शेवटी त्यांचे कान टोचले व त्यांची याचिका फेटाळली. आपला कनिष्ठ पुढे लष्कर प्रमुख होऊ नये म्हणून त्याचा सीआर खराब करणे, कनिष्ठ अधिकाऱ्याला खोट्या प्रकरणात गोवणे वगैरे गोष्टीही त्यांच्या नावावर जमा आहेत. सिंग मंत्री पदावर आरूढ झाल्यावर मोदी सरकारने कोर्टात शपथपत्र केले  की सिंग लष्कर प्रमुख असतांना आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांशी आकस बुद्धीने वागले. आपल्याच मंत्र्याविरुद्ध एखाद्या सरकारने कोर्टात शपथपत्र करणे हेही भारतात प्रथमच घडले. मोदींनी सिंगांच्या पार्श्वभागावर लाथ मारून मंत्रीमंडळातून काढून टाकायला पाहिजे होते. बेदीबाईंनीही कायम सरकारशी पंगाच घेतला व आपण खूप स्मार्ट आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न केला. निवृत्तीनंतर मात्र स्वस्थ बसल्या अण्णांचा उदय होईपर्यंत,आपल्या नाशिकच्या विजय पांढरेसारख्या. पणन संचालक मानेही आता घरी स्वस्थ बसतील. सुपारी घेणारे असे नंतर स्वस्थच बसतात. मोदींमुळे सुपारीबाजांना चांगले दिवस आले आहेत. एक वर्षापूर्वी बेदिबाईचे मोदीन्बाबतचे मत व आजचे मत म्हणजे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी मोदिंपुढे लोटांगण आहे. आता रामलीला मैदानावर केलेल्या गर्जना त्यांना पाण्याशिवायच गिळावया लागतील मोदींसारख्या. सारखे सारखे युटर्न घेऊन पुन्हा पुन्हा ठरल्या जागेवरच यावे लागेल घाण्याच्या बैलासारखे.
राहिता राहिले मणिशंकर अय्यर. अतिरेकी हल्ल्याबद्दल सर्वच विचारवंतांचे हेच मत आहेकी व्यंग  साप्ताहिकाने संयमाने मत प्रदर्शितत करायला पाहिजे होते. " पाहू या तुम्ही काय करता ? " ही भावना नको. नको. दैनिक लोकसत्तामधून या बाबतीत फार समतोल विवेच प्रसिध्द झाले आहे. त्यातुनही असाच सूर निघतो. अय्यर याबाबतीत एकटे नाहीत  ? शेवटी कोण जास्त पोरकट हे ठरवणेही आता कठीण झाले आहे. सिंग, काटजू , की ममता ?
आपण म्हणता थरूर वादात असतात. आजकाल कोण वादात नाही ? मोदी , राजनाथ सिंग ,गिरिराज सिंग (मंत्री). नावे असंख्य आहेत. पण मिडिया काही लोकांच्या बाबतीत सौम्य आहे. भाजापवाल्यांची बातमी येउन वाळूत पाण्याचा थेंब पडावा तशी लगेच जिरते. अखिलेश यादव , नितीशकुमार, वाड्रा, यांची बातमी इलेक्ट्रोनिक मिडीयात आठवडाभर चघळली जाते. हमाममे सब नंगे हैं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा