सोमवार, १९ जानेवारी, २०१५

काहीही उपयोग नाही. 

महामहिमांनी मोदी सरकारला सारखे वटहुकूम न काढण्याचा सल्ला दिला आहे मात्र त्याचा काहिही उपयोग होणार नाही हे निश्चित. कारण भाजप व मोदी यांना मुळी घटनात्मक संस्था बद्दल फारसा आदर नाही. ह्या संस्था म्हणजे विकासाच्या मार्गात खोळंबा घालणाऱ्या आहेत असेच त्यांना वाटते. न्यायालयीन नेमणुका सरकारने आपल्या हातात घेतल्या. मुख्यमंत्री असतांना मोदींचे गुजरातच्या राज्यपालांशी सतत खटके उडत होते. विरोधीपक्षात असतांना भाजपच्या खासदारांचे शिष्टमंडळ एक दिवसाआड त्यांना निवेदन द्यायला जात होते. असे करून त्यांनी राष्ट्रपतीभवनाला तहसीदार कार्यायाचे स्वरूप आणले होते. इतक्यांदा तर शाळकरी मुलेसुद्धा वर्गाशिक्षकाकडे तक्रार करत नाही. महाराष्ट्राच्या भाजप आमदारांनीही तोच कित्ता  गिरविला होता. मतदान केंद्रातच पक्ष्याचे चिन्ह पत्रकारांना दाखवून व तेथेच पत्रकारांना संबोधित करून निवडणूक आयोगाची सुद्धा आपण पत्रास ठेवत नाही हे मोदींनी दाखवून दिले. आठ महिन्यात दहा वटहुकूम काढून आपण संसदेचा उपहास करतो आहोत हे न समजण्याइतके मोदी दुधखुळे  नाहीत. संसदेत बहुमत आहेच, त्यामुळे पुढे भारतीय जनतेसमोर काय वाढून ठेवले आहे हे पाहू या.
राजेंद्र कडू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा