मुंबई पोलिस नेहमी न. १
पोस्टाने तक्रार, पोलिसांकडून लगेच दखल, पैसेही मिळाले
| ||
शहरातील स्वस्तिकनगरात राहणारे दिलीप बसवंतराव देशमुख यांनाच आलेला हा पोलिसांचा सुखद अनुभव. त्यांनी हा अनुभव 'दिव्य मराठी'ला सांगितला. दिलीप देशमुख सेवानिवृत्त बँक व्यवस्थापक आहेत. त्यांच्या कुटुंबासह दुबईला जाण्यासाठी जानेवारीला ते मुंबईत गेले. त्यांनी दादर पश्चिमवरून विमानतळावर जाण्यासाठी टॅक्सी ठरवली. टॅक्सीत बसल्याबरोबर या टॅक्सीजवळ एक व्यक्ती आला. हा व्यक्ती आणि टॅक्सीचालक यांच्यात आर्थिक देवाणघेवाणीवरून वाद सुरू होता. दरम्यान, त्या व्यक्तीने देशमुख यांना हजार रुपयांची चिल्लर आहे का? असे विचारले. त्या वेळी देशमुख यांनी दोन पाचशे रुपयांच्या उर्वरित.पान १२ नोटात्यांना दिल्या. काहीवेळातच तो व्यक्ती देशमुख यांना म्हणाला, तुम्ही मला १०० रुपयांच्याच नोटा दिल्या. रात्रीची वेळ असल्यामुळे अंधारात होऊ शकते आपली चूक असे समजून त्यांनी पुन्हा त्याला पाचशे रुपयांच्या दोन नोटा दिल्या. त्यानंतर चालक तो व्यक्ती सोबतच होता. देशमुख यांना टॅक्सीने विमानतळावर सोडून दिले, त्या वेळी तब्बल ९९० रुपये बिल झाले असे सांगून तेसुद्धा पैसे घेतले. हा सर्व प्रकार देशमुख यांच्या लक्षात आला, ज्या ठिकाणी २०० ते २५० रुपये मीटरप्रमाणे बिल यायला पाहिजे होते, त्या ठिकाणी जास्त रक्कम घेतली. मात्र, त्याच्याशी बोलण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता. कारण दुबईला जाणारे विमान होते. दरम्यान, देशमुख यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी या टॅक्सीचा क्रमांक घेतला आणि दुबईला निघून गेले. दरम्यान, १२ जानेवारीला ते अमरावतीत परत आले. त्यांनी १३ जानेवारीला पोलिसांकडे मुंबईत डाकेद्वारे या प्रकरणात तक्रार केली. तक्रार केल्यानंतर याबाबत दखल घेईल किंवा नाही, हा नंतरचा प्रश्न होता. पण आश्चर्यच, मुंबई पोलिसांकडून देशमुख यांना २८ जानेवारीला फोन आला की, तुमची फसवणूक करणाऱ्या दोघांना आम्ही पकडले असून, तुमचे हजार ६०० रुपयेसुद्धा जप्त केले आहे. ही रक्कम तुम्हाला परत करायची आहे, यासाठी तुमचा खातेक्रमांक द्या, त्यामुळे देशमुख यांनी खातेक्रमांक पाठवला. नंतर देशमुख यांना दुसरा सुखद धक्का बसला तो १५ फेब्रुवारीला ही रक्कम पोलिसांनीच त्यांच्याच बँक खात्यात जमा केली होती. एखादे यापेक्षाही लहान प्रकरण झाल्यास पोलिस ठाण्यात जा, तक्रार नोंदवा, पायपीट करा, असे अनेक अनुभव पोलिसांचे सर्वसामान्यांना आले आहे. मात्र, देशमुख यांचा अनुभव लक्षात घेता. पोलिस अनेकदा सर्वसामान्यांची कशाप्रकारे दखल घेतात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात, हे या प्रसंगावरून दिसून येते. विश्वासच बसत नाही ^मंुबईतएकाटॅक्सीचालक त्याच्या सहकाऱ्याने हजार ६०० रुपयांनी आम्हाला फसवले. याप्रकरणी डाकेने तक्रार केली. या तक्रारीची नोंद घेऊन पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन आमची रक्कमसुद्धा जप्त केली. तसेच खात्यात परतसुद्धा टाकली. हा प्रकार आमच्यासाठी आश्चर्यकारक आहे. आमचा यावर विश्वासच बसत नाही आहे. महाराष्ट्र मुंबई पोलिसांचे आम्ही आभार मानतो. दिलीप देशमुख, सेवानिवृत्तबँक व्यवस्थापक, अमरावती. |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा