राष्ट्रभक्तीपर गीते लिहिली म्हणून कोणी "राष्ट्रवीर" होत नाही. १९०४साली "सारे जहांसे अच्छा हिंदोस्ता हमारा ... "हे गीत लिहिणारे अल्लामा इकबाल नंतर इस्लामच्या शिकवणीनुसार सुराज्य असणारl पाकिस्तान निर्माण करण्याच्या कल्पनेने भारावले. आज ते तिकडे पाकिस्तानचे आध्यात्मिक पिता म्हणून ओळखल्या जातात.
मंगळवार, १७ डिसेंबर, २०१९
रविवार, ८ डिसेंबर, २०१९
बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९
भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी चीनसारखे कडक कायदे हवेत म्हणणाऱ्यांसाठी एक सूचना.
कडक कायदे किंवा कडक हुकूमशहा हवा, हे सगळ तत्वज्ञान दुसर्यांसाठी आहे. आम्हाला
कडक कायदे हवे आहेत ते इतरांना शिस्त लावण्यासाठी. मी किंवा माझ्या एखादा
नातेवाईकाने कायदा तोडला तर आमचे ऑर्ग्युमेंट वेगळे असते. तो गुन्हा कडक
शिक्षा करण्याइतका गंभीर नसतो. आमचे अनेक नातेवाईक
भ्रष्टाचारी आहेत. त्यांना शिक्षा व्हावी असे आम्ही उघड बोलून दाखवत नाही
कारण आम्हाला नातेवाईकांशी संबंध खराब करून घ्यायचे नाहीत. आमच्या
नातेवाईकांना ते करत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल जाब न विचारणे म्हणजे
त्यांच्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणे होय. आमची
ईच्छा अशीच असते की कुणितरी कडक हुकुमशहा यावा व त्याने भ्रष्टाचारयांना
जबर शिक्षा करावी. आम्हाला पाहूण्याच्या हातून साप मारून घ्यायचा आहे.
चीनच्या प्रेमात पडण्यापूर्वी चीनमधील सामाजिक/राजकीय परिस्थितीबद्दल
संपूर्ण माहिती घ्यावी हे ठीक राहील.
शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१९
शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१९
एव्हढे सारे अनर्थ केवळ अतिरेकी राष्ट्रवादामुळे ओढवले,
हिटलरने लोकांना भुरळ पाडली होती. तो प्रचंड बहुमताने निवडून आला होता. तो स्वतःला आर्य वंशाचा म्हणवून घ्यायचा. त्याच्या पक्षाचे चिन्ह स्वस्तिक होते. त्याने शेजारील देश ताब्यात घेणे सुरु केले. पण काही दिवसांतचं दोस्त राष्ट्रांच्या सैन्याने जर्मन सैन्याचा पराभव केला. हिटलरने आत्महत्या केली. हिटलरच्या पराभूत जर्मनीचे विजेत्या दोस्त राष्ट्रांनी दोन तुकडे केले. बर्लीन शहराचे पण दोन तुकडे केले. अर्ध्या बर्लीनभोवती, की जे पश्चिम जर्मनीला द्यायचे होते (पण जे पूर्व जर्मनीच्या हद्दीत होते), कॉंक्रीटची भिंत बांधूनत्यावर काटेरी तार लावण्यात आली. वॉच टॉवर उभारण्यात आले. संगीनधारी सैनिक डोळ्यात तेल घालून पहारा देऊ लागले.
एकाच शहरांत राहाणाऱ्यांना इकडून तिकडे जायला पासपोर्ट/व्हिसा लागू लागला. हे सर्व १९९१ पर्यंत सुरु होते. एव्हढे अनर्थ एका अतिरेकी राष्ट्रीवाद्यामुळे झाले.
--------------------------------------------------
शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१९
सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९
मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१९
मंगळवार, ५ मार्च, २०१९
काळ असा सूड उगवतो. आपकी अदालत मध्ये मोदीजींनी दहशतवादी हल्ल्यानंतर प्रणव मुखर्जी कसे रडत रडत ओबामांकडे जातात व आम्हाला वाचावा असा टाहो फोडतात, याची नक्कल करून दाखविली होती. या प्रसंगाचा व्हिडीओ सार्वत्रिक झाला होता. तेच प्रणव मुखर्जी नंतर मात्र देशाचे राष्ट्रपती झाले. एव्हढेच नव्हे तर यावर्षी ते भारत रत्नही झाले. काळ एखाद्यावर असाही सूड उगवतो.
शुक्रवार, १ मार्च, २०१९
सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१९
गेल्या सत्तर वर्षांत पाकिस्तानसोबत चार युद्धे झाली. पण चार युद्धपट सुद्धा निर्माण झाले नाहीत. १९६५ साली भारतीय फौजांनी लाहोरला वेढा घातला होता, १९७१ मध्ये तर पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेशची निर्मिती केली, पाकिस्तानकडून लेखी शरणागती घेतली आणि ९३००० पाक सैनिक युद्धकैदी म्हणून ताब्यात घेतले. याएकाच युद्धावर डझनभर युद्धपट येऊ शकले असते. आता मात्र गेल्या बऱ्याच वर्षांपासून उल्लेखनीय असे युद्ध झाले नसूनही युद्धपटांची लाट आली आहे.याचे काय कारण असावे?