१) समोरच्याने अमुक एक भाषाच बोलावी असा माझाही आग्रह नसतो. पण त्यानेही " माफ किजिये मुझे मराठी नही समजती कृपया हिंदीमे बात किजिये." असे म्हणू नये अशी माफक अपेक्षा ठेवतो. २) प्रश्न अपमानाचा नाही, उपेक्षेचा आहे. मराठीत उदघोषणा, संचलन नाही केले तरी चालते, मराठीत पाट्या नसल्या तरी चालतात असे मराठीला गृहीत धरणे चालू आहे (महाराष्ट्रात). पाहुण्यांची सोय दोन दिवसच पहायची असते. कायम मुक्कामी आलेली व्यक्ती पाहुणा नसते. आणि भाषेच्या उपेक्षेमुळे मराठी संस्कृती कोपरयात ढकलली जात आहे.
शनिवार, २८ फेब्रुवारी, २०१५
बुधवार, २५ फेब्रुवारी, २०१५
मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०१५
बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाउले.
मोदी जितके कमी बोलतील व प्रसार माध्यमांपासून दूर राहतील तेव्हढे ते पंतप्रधानपदावर जास्त दिवस टिकून राहतील. अति प्रकाशझोतात राहिल्यामुळे यापूर्वी दोन पंतप्रधानांना पायउतार व्हावे लागले होते. एक म्हणजे राजीव गांधी (त्यांच्या ' हमे देखना हैं " ने त्यांचा घात केला) तर दुसरे अटल बिहारी वाजपेयी (त्यांच्या फील गुड व शायनिंग इंडिया च्या जाहिराती मुळे). जर मोदी कमीतकमी प्रकाशझोतात राहिले तर ते कमीत कमी पाच वर्षे तरी पदावर राहतील व त्यांच्या ' अच्छे दिन आयेंगे ' चा लोकांना विसर पडेल. (सध्या तसा पडत चाल लेला आहे). नाहीतर मोदी हे वर्ष तरी काढतील की नाही याबद्दल मी साशंक आहे. कारण संघ परिवार त्यांच्या सिंहासनाला सुरुंग लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवा ते प्रसिद्ध वचन " भय नही हमे दुष्टोकी दुर्जनतासे, भय हैं हमे स्वजनोकी निश्क्रीयतासे. मोदींना निष्क्रिय ठरवून हाकलले जाण्याचे बेत सुरु आहेत असे म्हणतात.मनमोहनसिंगांनी पदावर आल्याआल्या, " कुठल्याही सरकारी कार्यालयात माझा फोटो लावू नये व मला कारण नसतांना दूरदर्शनवर प्रसिद्धी देऊ नये " असे फर्मान काढले होते. त्यामुळे की काय ते पुन्हा दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. कारण जेव्हढे जास्त बोलाल तेव्हढा उक्ती आणि कृती यात फरक पडत जातो. आणि हा फरक फारच धोकादायक असतो. कारण तुकारामांनी म्हटले आहे. " बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाउले." आणि जे नाही चाले त्यांनी चालते व्हावे असा अलिखित कायदाच आहे.
राजेंद्र कडू
अति(दूर)दर्शन महागात पडणार काय ?
आपल्या देशात दूरदर्शन येउन अर्ध शतकाचा काळ लोटला. पण खरे महत्व आले १९८२ च्या एशियाड सामन्यांपासून. तेंव्हा चार महानगरांसोबतच इतर काही महत्वाच्या शहरांमध्ये दूरदर्शन पोहोचले. त्यानंतर मात्र लगेचच दुसरऱ्या वर्षी म्हणजे १९८३ साली पंतप्रधान इंदिरा गांधीनी दररोज एक लघुशक्ती प्रक्षेपक उभारण्याचे उद्दिष्ट नभोवाणी खात्याला दिले. त्या मोहिमेत जिल्ह्यांच्या ठिकाणीच नव्हे तर तालुक्यांच्या गावीसुद्धा दूरदर्शन पोहोचले. आता जरी राजकारण्यांना आपली छबी लोकांना वारंवार लोकासमोर ठेवण्यासाठी दूरदर्शनचा उपयोग होत असला तरी इंदिरा गांधींना मात्र याचा लाभ मिळण्याआधीच त्यांची निर्घृण हत्या झाली व त्यांची अन्त्ययात्रा व अन्त्यसंस्कारच लोकांना दूरदर्शनवर पाहायल मिळाले. त्यानंतर पंतप्रधान झालेल्या राजीव गांधी यांचे मात्र भरपूर (दूर)दर्शन लोकांना झाले. त्यांच्या प्रत्येक भाषणातील ' हमे देखना हैं " हा तकिया कलामही लोकांच्या पाठ झाला होता. मात्र हे अतिदर्शन राजीवजींना महागात पडले व नंतर १९८९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा पराभव झाला. त्यांच्यानंतर आलेले व्हि .पी सिंग ही दोन वर्षातच पाय उतार झाले. त्यानंतर राजकारणातून निवृत्ती पत्करलेले व सामानाची बांधाबांध करून हैदराबादला जायच्या तयारीत असलेल्या सौम्य प्रकृतीच्या नरसिंहराव यांच्या शिरावर १९९१ मध्ये पंतप्रधानपदाची जबाबदारी येउन पडली. त्यांनी पाच वर्षे नाईट वाचमन म्हणून काढले. बिगर गांधी असल्यामुळे त्यांना प्रसिद्धीचे तंत्र कदाचित गवसले नसावे. नंतरचे दोन पंतप्रधान एक एक वर्षाचा आपआपला ओव्हर खेळून गेले. त्यांना आपली खुर्ची सांभाळण्याच्या कसरतीमुळे दूरदर्शनच्या ताकदीकडे लक्ष देता आले नाही. नंतर मात्र प्रथम १३ महिने व नंतर पाच वर्षे अशी सहा वर्षे भाजपचे अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते. त्यांच्या मंत्रिमंडळात प्रमोद महाजानांसारखे कॉर्पोरेट संस्कृतीची जाण असलेले तडफदार मंत्री होते. या काळात सरकार व नेत्यांच्या प्रसिद्धीसाठी दूरदर्शनचा भरपूर वापर करण्यात आला. वाजपेयींच्या कार्यकाळाच्या शेवटच्या वर्षात तर दूरदर्शन व वृत्तपत्रांमधून 'फील गुड' व 'शायनिंग इंडिया'चा जनतेवर मारा करण्यात आला. आणि या अतिप्रसिद्धीनेच भाजपचा घात केला. कारण जो सतात नजरेसमोर समोर दिसतो त्याची जनता चिकित्सा करत असते. तशी चिकित्सा जनतेने वाजपेयींची व भाजपची केली आणि त्यांना घरी जावे लागले. २००४ मध्ये सत्तेवर आलेल्या मनमोहनसिंगांनी मात्र पदावर येताच आपला फोटो कुठल्याही सरकारी कार्यालयात लावू नये व कारण नसतांना आपल्याला दूरदर्शनवर दाखवू नये अशी सक्त ताकीद दिली. त्यामुळे की काय जनतेने त्यांना पुन्हा २००४ पेक्षा जास्त जागांवर निवडून दिले. म्हणजे परत असेच म्हणावे लागते की लोकांना जर तुम्ही माफक (दूर)दर्शन दिले तर तुमची जास्त चिकित्सा केली जात नाही. आता मोदी मात्र कधी दूरदर्शन, कधी आकाशवाणी, कधी दिलकी बात, कधी मनकी बात, कधी झाडू तर कधी दहा लाखाचा अंगरखा असे सतत लोकांसमोर येत राहतात. ज्याप्रमाणे राजीव गांधी, वाजपेयी यांना या अति (दूर)दर्शनाचा फटका बसला तसा मोदींनाही बसेल असा माझा अंदाज आहे. राजकारणीच नव्हे तर अण्णा हजारेंना सुद्धा या अति(दूरदर्शनाचा फटका बसला आहे. दिल्लीत भरपूर (दूर)दर्शन दिल्यामुळे मुंबईतील त्यांचे आंदोलन फ्लॉप झाले होते. याचे कारण माझ्यामते एकच, जो सतत नजरेसमोर असतो त्याची चिकित्सा केली जाते. तशीच ती अण्णांची झाली असावी. आणि अशी ही चिकित्सा ती बहुतेक नकारात्मक फळच देते. तेंव्हा मोदींना या अति(दूर)दर्शनाचा फटका बसू शकतो असे माझे मत आहे. कारण की तुम्ही लोकांसमोर येउन जितके जास्त बोलाल तितके तुमच्या उक्ती व कृतीची तुलना केली जाते आणि उक्तीपेक्षा कृतीचे पारडे केंव्हाही हलकेच भारत असते. म्हणूनच तुकारामांनी म्हटले आहेकी " बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाउले"
शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०१५
गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०१५
मंगळवार, १० फेब्रुवारी, २०१५
मेरे देशकी धरती …
महाराष्ट्रात फक्त शेतकरीच शेतजमीन विकत घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला शेतजमीन विकत घ्यायची असेल तर त्यापूर्वीच तुमच्या नावाचा सातबारा असे आवश्यक आहे. तुम्ही शेतकरी नसाल तर तुम्हाला शेती विकत घेण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्याची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. महानायकाने पुण्याजवळ विकत घेतलेल्या घेतलेल्या शेतजमिनीबद्दल असाच वाद उदभवला होता. तेथील कर्तव्यदक्ष तहसीलदाराने या संदर्भात महानायकाला नोटीसही बजावली होती. हे प्रकरण बरेच गाजले होते. शेवटी महानायकाला युपीमध्ये कुठल्यातरी आडगावात शेती असल्याचा दाखला मिळवावा लागला होता. तुमच्याही गावात/शहरात असा एखादा व्यवहार झाला आहे असा तुम्हाला संशय असल्यास त्याप्रकारणाबाबत तुम्ही जिल्हाधिकारी अथवा सक्षम अधिकाऱ्याकडे माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती मागून असा गैरप्रकार उघडकीस आणू शकता व गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेतजमिनी इन्कम ट्याक्स वाचविण्यासाठी विकत घेणाऱ्या धनदांडग्यापाऊन वाचवू शकता. अर्थात शेतकरी आपली नड म्हणून शेती विकत असतो. पण तुम्ही दखल दिली तर खऱ्या शेतकऱ्याकडेच ही शेतजमीन जाईल.रविवार, ८ फेब्रुवारी, २०१५
गुजरात पोलिसांच्या दृष्टीकोणातून आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते व मुस्लिमच दंगेखोर आहेत काय ?
गुजरात- मॉक ड्रीलमध्ये "आम आदमी' दंगेखोर
अहमदाबाद | हेछायाचित्र आहे गुजरात पोलिसांच्या मॉक ड्रीलचे. दंगेखोरांना आवरण्याच्या मोहिमेचा आरएएफच्या जवानांनी सराव केला. त्यात दंगेखोराच्या डोक्यावर आम आदमी पार्टीच्या टोपीशी मिळतीजुळती टोपी घालण्यात आली. त्यावर मैं आम आदमी हूं असे लिहिण्यात आले होते. याआधी मुस्लिम समुदायाची टोपी घालून केलेल्या गुजरात पोलिसांच्या मॉकड्रीलवरून वाद झाला होता.
गुजरात- मॉक ड्रीलमध्ये "आम आदमी' दंगेखोर
अहमदाबाद | हेछायाचित्र आहे गुजरात पोलिसांच्या मॉक ड्रीलचे. दंगेखोरांना आवरण्याच्या मोहिमेचा आरएएफच्या जवानांनी सराव केला. त्यात दंगेखोराच्या डोक्यावर आम आदमी पार्टीच्या टोपीशी मिळतीजुळती टोपी घालण्यात आली. त्यावर मैं आम आदमी हूं असे लिहिण्यात आले होते. याआधी मुस्लिम समुदायाची टोपी घालून केलेल्या गुजरात पोलिसांच्या मॉकड्रीलवरून वाद झाला होता.
गुरुवार, ५ फेब्रुवारी, २०१५
मरण म्हणजे विस्मरण
साने गुरुजी यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने आणि प्रवचनांमधून 'भारतीय संस्कृती' या विषयावर आपले विचार मांडले होते. त्यातील 'मृत्यूचे काव्य' या विषयावरील त्यांच्या भाषणाचा संपादित भाग.भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे ठिकठिकाणी जे विचार आहेत, ते किती गोड व भव्य आहेत. मृत्यूची भीषणता भारतीय संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ. गीतेने मरण म्हणजे वस्त्र फेकणे, असे म्हटले आहे. काम करता करता हे वस्त्र जीर्ण झाले, फाटले की त्रिभुवनमाउली नवीन वस्त्रे देण्यासाठी आपणांस बोलाविते. पुन्हा नवीन आंगडे-टोपडे लेववून या जगाच्या अंगणात खेळावयास आपणास ती ठेवते व दुरून गंमत बघते. कधी कधी जीव जन्मला नाही, तोच जातो. कोणी बालपणी मरतो, कोणी तरुणपणी. आई अंगरखा देऊन पाठवते. परंतु जगात पाठवले नाही तोच तिला दुरून तो अंगरखा चांगला वाटत नाही. पटकन ती बाळाला मागे नेते व नवीन अंगरखा घालते. आईच्या हौसेला मोल नाही. माझी माता काही भिकारी नाही. अनंत वस्त्रांनी तिचे भांडार भरलेले आहे. परंतु मातेचे भांडार भरलेले आहे म्हणून दिलेले कपडे मी वाटेल तसे फाडून टाकता कामा नयेत, शक्य तो काळजीपूर्वक हा कपडा वापरला पाहिजे. तो स्वच्छ, पवित्र राखला पाहिजे आणि सेवा करता करता तो फाटला पाहिजे.
मृत्यू म्हणजे महायात्रा. मृत्यू म्हणजे महाप्रस्थान, मृत्यू म्हणजे महानिद्रा. दररोजच्या धडपडीनंतर आपण झोपतो. झोप म्हणजे लघू मरण. सर्व जीवनाच्या, अनेक वर्षांच्या धडपडीनंतरही आपण असेच झोपतो. रोजची झोप आठ तासांची. परंतु ही झोप मोठी असते, एवढाच फरक.
मृत्यू म्हणजे आईच्या कुशीत जाऊन झोपणे. लहान मूल दिवसभर खेळते, खिदळते, रडते, पडते. रात्र पडताच आई हळूच त्याला उचलून घेते. त्याची खेळणी वगैरे तेथेच पडतात. आई त्याला कुशीत घेऊन झोपते. ती आईची ऊब घेऊन बाळ ताजेतवाने होऊन सकाळी पुन्हा दुप्पट उत्साहाने चेष्टा करू लागते. तसेच जीवाचे. जगात दमलेल्या, श्रमलेल्या जीवाला ती माता उचलून घेते. बाळाची इच्छा नसतनाही उचलून घेते. आपल्या सोबत्यांकडे, आपल्या सांसारिक खेळण्यांकडे बाळ आशाळभूत दृष्टीने बघत असतो. परंतु आईला बाळाचे हित ठावे. त्या रडणाऱ्या बाळाला ती घेत. कुशीत निजविते. जीवनरस पाजून पुन्हा पाठवते.
मृत्यू म्हणजे माहेरी जाऊन येणे. सासरी गेलेली लेक दोन दिवस माहेरी जाऊन येते. पुन्हा प्रेम, उत्साह, आनंद, मोकळेपणा घेऊन येते. त्याप्रमाणे त्या जगन्माउलीजवळ जाऊन येणे म्हणजेच मृत्यू. मरण म्हणजे एक प्रकारे विस्मरण. जगात स्मरणाइतकेच विस्मरणाला महत्त्व आहे. जन्मल्यापासून ज्या ज्या गोष्टी आपण केल्या, जे जे ऐकिले, जे जे पाहिले, जे जे मनात आले, त्या सर्वाचे जर सारखे आपणास स्मरण राहिले तर तो केवढा भार होईल. त्या प्रचंड पर्वताखाली आपण चिरडले जाऊ. हे जीवन असह्य़ होईल.
व्यापारी ज्याप्रमाणे हजारो घडमोडी करतो, परंतु शेवटी एवढा फायदा किंवा एवढा तोटा, एवढी सुटसुटीत गोष्ट ध्यानात धरतो, तसेच जीवांचे आहे. मरण म्हणजे जीवनाच्या व्यापारातील नफा-तोटा पाहण्याचा क्षण. साठ-सत्तर वर्षे दुकान चालविले, त्याचा आढावा घेण्याची वेळ म्हणजे मरण. मरणाची फारच आवश्यकता असते. कधी कधी जगातून या सद्य:कालीन नामरूपाने नाहीसे होणे हे इष्ट व आवश्यक असते. एखादा मनुष्य, समजा, वाईट रीतीने वागत होता. त्या माणसास पश्चात्ताप होऊन पुढे तो जरी चांगल्या रीतीने वागू लागला, तरी जनतेला त्याच्या काळ्या भूतकाळाचे विस्मरण होत नाही. लोक म्हणतात, तो अमूक मनुष्य ना? माहीत आहे त्याचे सारे. करून करून भागले आणि देवपूजेला लागले. उगीच सोंग करतो झाले. लोकांचे हे उद्गार स्वत:त सुधारणा करू पाहणाऱ्या त्या अनुतप्त जीवाच्या मर्मी लागतात. स्वत:चा भूतकाळ तो विसरू पाहतो. परंतु जग तो विसरू इच्छित नाही. अशा वेळेस पडद्याआड जाऊन नवीन रंग व नवीन नामरूप घेऊन लोकांसमोर पुन्हा येण्यातच मौज असते.
मरण उपकारक आहे. जीवनाने जे काम होत नाही, ते कधी कधी मरणाने होते. संभाजी महाराजांच्या जीवनाने मराठय़ांत फूट पडली, परंतु त्यांच्या महान मरणाने मराठे जोडले गेले. ते मरण म्हणजे अमृत ठरले. जीवन कसे जगलो, याची परीक्षा म्हणजे मरण. तुमच्या मरणावरून तुमच्या जीवनाची किंमत करण्यात येईल. जो मरताना रडेल, त्याचे जीवन रडके ठरले. जो मरताना हसेल, त्याचे जीवन कृतार्थ समजण्यात येईल. थोरांचे मरण म्हणजे एक दिव्य वस्तू आहे, ते अनंताचे दर्शन आहे. किती शांती, किती समाधान.
ज्या संस्कृतीने मरणाचे जीवन बनविले, त्या संस्कृतीच्या उपासकांत आज मरणाचा अपरंपार डर भरून राहिला आहे. मरण हा शब्दही त्यांना सहन होत नाही. केवळ शरीराला कुरवाळणारे सारे झाले आहेत. महान ध्येयासाठी ही देहाची मडकी हसत हसत फोडावयास जे निघतील, तेच भारतीय संस्कृतीचे खरे उपासक. कातडी सांभाळणारे भारतीय संस्कृतीचे पुत्र शोभत नाहीत. भारतातील सर्व प्रकारचे दैन्य, दास्य, सर्व प्रकारचे विषयम वैषम्य, सर्व प्रकारचा अंधार दूर करण्यासाठी देहाची बलिदाने करावयास लाखो कन्या-पुत्र उठतील, त्या वेळेसच भारतीय संस्कृतीचा सुगंध दिगंत जाईल व भारत नवतेजाने फुलेल.
(कॉन्टिनेन्टल प्रकाशन प्रकाशित आणि साने गुरुजी लिखित 'भारती संस्कृती' या पुस्तकावरून साभार.)
संकलन - शेखर जोशी
त्यांचे आडनाव गांधी नाही. विधवा सुनेच्या पुनर्विवाहात १०० कोटी रुपयाचे ' कन्यादान " विठ्ठल राडदिया हे भाजपचे खासदार आहेत तर त्यांचा मुलगा गुजरात मंत्रिमंडळात मंत्री आहे. पण याला घराणेशाही म्हणता येणार नाही. कारण त्यांचे आडनाव गांधी नाही. फक्त गांधी आडनावाच्या माणसांनाच घराणेशाहीचा सिद्धांत लागू होतो इतरांना नाही.
कॉंग्रेसवर मुस्लिमांचे लांगुलचलन करण्याचा आरोप होतो. कॉंग्रेसने ओवेसीवर कारवाई केली नाही म्हणून तो डोईजड होत आहे असे काही मंडळी म्हनतात. मग मुशर्रफला बासुंदी खाऊ घालणारे वाजपेयीजी व नवाज शरीफसाठी पायघड्या घालणाऱ्या नरेंद्र मोदी यांना काय म्हनाल ? बासुंदी प्रकरणानंतर लगेच कारगिल घडले होते. ओवेसीची काळजी करू नका. कुठल्याही धर्मातील कट्टरवाद्यांना त्या धर्मातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देते आपण वारंवार पाहिले आहे. रामाच्या नावाने सत्ता मिळवनार्यांना पाच वर्षातच घरी बसवले. जनतेचे नाव घेऊन १९७७ साली सत्तेवर आलेले 'जनता' सरकार २८ महिन्यातच कोसळले. आताही जनतेने मोदींना सत्ता दिली ती सुप्रशासानाची आशा ठेवून. मोदींनी जर हिंदू राष्ट्रवादाचा अगेंडा पुढे केला तर त्यांचाही 'मोरया' (मोरारजी देसाई) व्हायला वेळ लागणार नाही. भारत हा बहुधर्मीय, बहुभाषिक देश असल्यामुळे पाकिस्तानसारखी स्थिती होणे शक्य नाही. अर्थात काही नतद्रष्टांनी भारताचा लेबनॉन करायचे ठरविले तर मात्र विनाशासाठी तयार रहा.