शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०१४
गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०१४
एका रात्रीतून मतपरिवर्तन कसे काय होते ?
मुंबईचे पोलिस आयुक्त ( आता माजी ) नोकरीचा राजीनामा देऊन भाजपाच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढविण्यास सज्ज झाले आहेत. एखाद्या पक्षात प्रवेश करून महत्वाची जबाबदारी पार पाडायची म्हणजे त्या पक्षाच्या ध्येय धोरणाचा सखोल अभ्यास करून व त्या पक्षाने अंगीकारलेली तत्वे आत्मसात करून मगच त्या पक्षाचे सदस्यत्व एखादी व्यक्ती स्वीकारते असा माझा भाबडा समज होता. प्रत्यक्षात मात्र असे दिसते की कोणत्या पक्षाची चलती आहे हे पाहून त्या पक्षात संधिसाधू उडी घेतांना दिसत आहेत. त्यातल्या त्यात भाजप व आप या दोन पक्षांना सध्या जास्त मागणी आहे. गेल्या वेळेस हत्ती चिन्हावर निवडणूक लढविलेले पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक या वेळेस आपच्या झाडूवर स्वार होऊ पाहताहेत.
या सर्व गदारोळात मला एक प्रश्न नेहमीच पडतो तो सरकारी नोकरीत मोठ्या हुद्द्यावर असणारीमंडळी राजीनामा दिल्यानंतर किंवा निवृत्त झाल्यानंतर लगेच एखाद्या पक्षात कसा काय प्रवेश करतात. म्हणजेच यांचे सगळे आधीच ठरलेले असते. याचाच अर्थ नोकरीत असतांना हि मंडळी शरीराने एखाद्या पक्षाच्या सरकारचे नोकर तर मनाने दुसरेच कुठलेतरी आदर्श मानणाऱ्या पक्षाच्या विचाराचे. त्यामुळे त्यांच्याकडून विद्यमान सरकार कसे अडचणीत येईल हे पहिले जाण्याची व तशी कामगिरी बजाविण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उदाहरणार्थ निवृत्त झाल्यावर मोदींच्या मांडीला मांडी लावून बसणारे माजी लष्कर प्रमुख यांनी एका बलाढ्य लष्कराच्या प्रमुख पदी असूनही आपल्या जन्मतारखेबद्दल जो पोरकटपणा केला तो अशोभनीय होता. एखाद्या सरकारी बाबू सारखे ते सरकार विरुद्ध कोर्टातही गेले. निवृत्तीनंतरही बरीचशी पोरकट विधाने त्यांनी केली व नंतर कोर्टात ती मागेही घेतली. काही उच्च सरकारी अधिकारी नोकरीत असतांना सरकारला कोंडीत कसे पकडता येईल याची विरोधी पक्षाला संधी मिळवून देतात व नंतर विरोधी पक्षाचे सरकार आले कि निवृत्तीनंतर त्यांना त्याचा घसघसीत मोबदला मिळतो. या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेत असलेली पद्धत योग्य वाटायला लागते. तेथे नवीन अध्यक्ष निवडून आला की पूर्वीच्या अध्यक्षांनी उच्च पदावर नेमलेले सर्वच अधिकारी राजीनामा देतात व नवीन अध्यक्षाला त्याच्या विचाराशी सुसंगत असणारी माणसे नेमण्याचा मार्ग मोकळा करून देतात. अर्थात आपल्या देशात हे केले तर " टगे " राजकारणी प्रत्येक नको असलेल्या अधिकाऱ्याला " परदेशी " करतील. पण त्यामुळे तत्वाला मुरड घालून प्रशासन चालविणारी मंडळी निवृत्त झाल्यावरच तत्व पालनाला सुरुवात करतात. त्यामुळे देशात तत्वासाठी झगडणाऱ्या तरुण मंडळीची वानवा जाणवते. उतारवयात तत्वासाठी लढा पुकारण्याऐवजी तरुणपणातच जर नोकरीचा राजीनामा दिला किंवा नोकरीच स्वीकारली नाही तर देशाला त्याचा काहीतरी फायदा होईल. नाहीतरी आमच्या पूर्वजांनी म्हटले आहे की शहाण्याची गुलामी करावी पण मूर्खाची चाकरी करू नये. सद्याच्या प्रवुत्तीला मात्र एकच म्हण लागू पडते, करून करून भागले आणि देवपूजेला लागले.आमच्या मागच्या पिढीतल्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी आपले शिक्षण, नोकऱ्या सोडल्या. आपल्यालाही दुसरे ( की तिसरे, चौथे ) स्वातंत्र्य मिळवायचे आहेना ?
राजेंद्र कडू
९४२३१२५२५४
उदाहरणार्थ निवृत्त झाल्यावर मोदींच्या मांडीला मांडी लावून बसणारे माजी लष्कर प्रमुख यांनी एका बलाढ्य लष्कराच्या प्रमुख पदी असूनही आपल्या जन्मतारखेबद्दल जो पोरकटपणा केला तो अशोभनीय होता. एखाद्या सरकारी बाबू सारखे ते सरकार विरुद्ध कोर्टातही गेले. निवृत्तीनंतरही बरीचशी पोरकट विधाने त्यांनी केली व नंतर कोर्टात ती मागेही घेतली. काही उच्च सरकारी अधिकारी नोकरीत असतांना सरकारला कोंडीत कसे पकडता येईल याची विरोधी पक्षाला संधी मिळवून देतात व नंतर विरोधी पक्षाचे सरकार आले कि निवृत्तीनंतर त्यांना त्याचा घसघसीत मोबदला मिळतो. या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेत असलेली पद्धत योग्य वाटायला लागते. तेथे नवीन अध्यक्ष निवडून आला की पूर्वीच्या अध्यक्षांनी उच्च पदावर नेमलेले सर्वच अधिकारी राजीनामा देतात व नवीन अध्यक्षाला त्याच्या विचाराशी सुसंगत असणारी माणसे नेमण्याचा मार्ग मोकळा करून देतात. अर्थात आपल्या देशात हे केले तर " टगे " राजकारणी प्रत्येक नको असलेल्या अधिकाऱ्याला " परदेशी " करतील. पण त्यामुळे तत्वाला मुरड घालून प्रशासन चालविणारी मंडळी निवृत्त झाल्यावरच तत्व पालनाला सुरुवात करतात. त्यामुळे देशात तत्वासाठी झगडणाऱ्या तरुण मंडळीची वानवा जाणवते. उतारवयात तत्वासाठी लढा पुकारण्याऐवजी तरुणपणातच जर नोकरीचा राजीनामा दिला किंवा नोकरीच स्वीकारली नाही तर देशाला त्याचा काहीतरी फायदा होईल. नाहीतरी आमच्या पूर्वजांनी म्हटले आहे की शहाण्याची गुलामी करावी पण मूर्खाची चाकरी करू नये. सद्याच्या प्रवुत्तीला मात्र एकच म्हण लागू पडते, करून करून भागले आणि देवपूजेला लागले.आमच्या मागच्या पिढीतल्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी आपले शिक्षण, नोकऱ्या सोडल्या. आपल्यालाही दुसरे ( की तिसरे, चौथे ) स्वातंत्र्य मिळवायचे आहेना ?
राजेंद्र कडू
९४२३१२५२५४
मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०१४
मराठी दिनाच्या (२७ फेब्रुवारी ) निमित्ताने
अमरावती शहरातील दोन सच्चे मराठी ……….
अमरावती शहरातील व्यावसायिक आपल्या व्यवसायाची जाहिरात करतांना बहुधा हिंदीतून करतांना दिसतात. वर्तमान पत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती एकवेळ मराठीतून प्रसिद्ध होतात. मात्र जाहिरात करण्याचा आणखी एक मार्ग म्हाणजे ऑटो रिक्षावर लाऊड स्पीकर द्वारे केल्या जाणाऱ्या जाहिराती, त्या मात्र हिंदीतूनच असतात. कारण ऑडीयो जाहिराती म्हणजे जाहिरातीला आवाज देणाऱ्यांला अमीन सयानी बनण्याची हुकमी संधी. आणि समस्त व्यावसायिक बंधूंनी असा गैरसमाज करून घेतला आहे की अमरावती शहरातील नागरिकांना हिंदी शिवाय इतर दुसरी कुठलीच भाषा समाजात नाही आणि अमरावतील " काही " लोकांना मराठी अजिबात समाजत नाही. वास्तव हे आहे की बोलालेले मराठी अमरावतीतील प्रत्येक नागरिकाला समजते. मग तो मारवाडी, गुजराती, सिंधी, पंजाबी, मुसलमान कुणीही असो. अशा या पार्श्वभूमीवर एक व्यावसायिक मात्र फक्त आणि फक्त मराठीतूनच आपल्या व्यवसायाची जाहिरात करतात ते प्रतिष्ठान म्हणजे मोतीनगर मधील पूनम इलेक्ट्रानीक्स. शहरात आता या प्रतिष्ठानाच्या बऱ्याच शाखा आहेत. यांची प्रत्येकच जाहिरात मग ती छापील असो कि ऑडियो मी फक्त मराठीतूनच केलेली पाहिलेली आहे व त्यासाठी मी पत्र लिहून त्यांचे अभिनंदनही केले आहे. या प्रतिष्ठानाचे संचालक सच्चे मराठी आहेत असे मी समजतो.
दुसरे असेच एक सच्चे मराठी म्हणजे राजकमल चौकातील दुग्धपुर्णा हे प्रतिष्ठान. माझ्या माहितीप्रमाणे हे दुकान फक्त उन्हाळ्यातच सुरु असते कारण हे शीत पेयांचे दुकान आहे. मात्र उन्हाळ्यात व्यवसायाला सुरुवात केल्या दिवसापासून स्थानिक वृत्तपत्रातून त्यांची जाहिरात सुरु होते. अर्थात या जाहिरातीत प्रसिद्धीचा मजकूर कमीच असतो मात्र दररोज उतमोत्तम मराठी कविता, त्याही नामवंत कवींच्या त्यातून प्रसिद्ध होत असतात. यांचा हा व्यवसायाचा हंगाम म्हणजे मराठी साहित्य रसिकांना एक मेजवानीच असते. माझ्या माहिती प्रमाणे या प्रतिष्ठानाचे संचालक हे रूढ अर्थाने मराठी नाहीत. तरीही त्यांनी आपल्या जाहिरातीत आवर्जून मराठी कविताच प्रसिद्ध कराव्यात याचे मला खूप अप्रूप वाटते. घराबाहेर पडल्यावर दोन मराठी माणसे आपसात मराठीत बोलतील की नाही याची खात्री नाही. आणि मंचावरून कार्यक्रमाचे संचालन करणाऱ्या मंडळींना तर संचलन करतांना फक्त शेरोशायरीच आठवते त्याशिवाय आपले संचलन दमदार होणार नाही यांची त्यांना धास्ती वाटत असते. कुसुमाग्रज किंवा विंदा यांच्या कवितेचा दाखला देतांना कुणी दिसत नाही. मराठी कवींना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत याचाही त्यांना विसर पडलेला असतो. असे असतांना दुग्धपुर्णाच्या संचालकांना मराठी कवितांची दाखल घ्यावीशी वाटली हे मराठीचे सौभाग्य आहे. व मराठी स्वाभिमान गीत लिहिणाऱ्या कविवर्य सुरेश भटांचा आत्मा त्यांना नक्कीच दुवा देत असेल.
वरील दोन्ही प्रतिष्ठानच्या संचालकांना मी वैयक्तिकरीत्या ओळखत नाही. किंवा ते काळे आहेत कि गोरे आहेत हेही मला माहित नाही. पण ते सच्चे " मराठी "आहेत हे मात्र नक्की.
राजेंद्र कडू
रविवार, २३ फेब्रुवारी, २०१४
जास्त दुर्दैवी कोण ? दाभोळकर की पंड्या कुटुंबीय
काही महिन्यांपूर्वी सुप्रसिद्ध समाजसेवक नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला. त्याचा तपास सुरु आहे. तपासातील संथ प्रगतीबद्दल विरोधी पक्ष सरकारवर तोंडसुख घेत आहेत. मुख्यमंत्री, गृहमंत्री व एकूणच महाराष्ट्रातील कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे युती सरकार हे अकार्यक्षम आहे, असा सर्वांचा आरडाओरडा सुरु आहे. खरे पाहता एखाद्या गुन्ह्याचा शोध किती काळात लागेल हे कुणीच सांगू शकत नाही. एखाद्या गुन्ह्याचा शोध घ्यायला महिनोन्महिने लागू शकतात. कधी कधी अचानकच एखाद्या दुसऱ्या गुन्ह्याचा शोध घेतांना आधी घडलेल्या गुन्ह्याचा शोध लागतो.
दाभोलकर हे कुठल्याही सत्तास्थानावर नव्हते. केवळ एक समाजसेवक होते. मात्र दहा वर्षांपूर्वी गुजरात मध्ये राज्याचे गृहमंत्री असलेले हरेन पंड्या यांचा ते सकाळी फिरायला गेले असतांना त्यांचा खून झाला होत. त्याच्या चौकशीत काय प्रगती झाली आहे हे कळायला मार्ग नाही. मुळात एखाद्या राज्याच्या गृहमंत्र्याचा खून होणे ही गंभीर बाब आहे. राज्याचा गृहमंत्रीच जेथे सुरक्षित नाही तेथील सर्वसामान्य जनता किती सुरक्षित असेल याची कल्पना करता येऊ शकते. तेही मोदी सारख्या कर्तव्य कठोर व कार्य कुशल मुख्यमंत्री असलेल्या राज्यात ही घटना घडावी हे मोदींना किती भूषणावह आहे, हे मोदी प्रशंसकांनीच ठरवावे. गुजरात दंगलींमध्ये तेथील खासदार मदतीसाठी टाहो फोडत होते मात्र खासदाराला सुद्धा गुजरात प्रशासन सुरक्षा देऊ शकले नाही. वाजपेयींनी दिलेला राजधर्म पाळण्याचा दिलेला सल्ला सुद्धा मोदींनी मनावर घेतला नाही. खोट्या चकमकी घडवून आणून निरपराध लोकांची हत्या केल्याबद्दल गुजरात मधील मोठमोठे पोलिस अधिकारी गजाआड आहेत. सर्वात जास्त पोलिस अधिकारी तुरुंगात असण्याचा मान सुद्धा गुजरात कडे जातो. याही बाबतीत गुजरात राज्य आघाडीवर आहे. व हे सर्व अधिकारी कॉन्स्टेबल किंवा सब इन्सपेक्टर दर्जाचे नसून उच्चाधिकारी आहेत. म्हणजेच गुजरात राज्य म्हणजे शेत खाणाऱ्या कुंपणाने वेधल्या गेले आहे. एका आर्किटेक्ट तरुणीवर गुजरात पोलिसांनी तर पाळत ठेवलीच शिवाय कर्नाटक पोलिसांनाचीही पाळत ठेवण्यासाठी मदत घेण्यात आली. दोन्ही प्रकरणात दाभोळकर कुटुंब जास्त दुर्दैवी आहे की पंड्या कुटुंबीय हे वाचकांनीच ठरवावे.
राजेंद्र कडू
दिव्य मराठीच्या दिनांक २०/०२२०१४ च्या अंकात अनुभव या सदरात लक्ष्मण कुर्हेकर, मूर्तिजापूर यांनी व्यक्त केलेला आपला अनुभव
ड्यूटी आटोपली की मी रेल्वेस्टेशन परिसरात ये-जा करत असतो. एक दिवस फुरसत काढून एका भिकार्याची दिनचर्या (त्याच्या नकळत) पाहिली अन् थक्क झालो. ते भिकारी जोडपे घाईघाईत गरमागरम पोळ्या व भाजी एका डब्यात भरताना पाहिले. माझी उत्कंठा वाढली. मी तेथेच थांबलो. पुढे ते सायंकाळी सातच्या मेलने अमरावतीला निघून गेले. जवळच्या दुकानदाराकडे त्या जोडप्याविषयी चौकशी केली असता बरीच माहिती मिळाली. चांगल्या प्रतीचा तांदूळ, गहू, डाळ व किराणा ते नियमित घेतात. ते आमचे नगदीचे व नियमित ग्राहक आहे. त्यांचे राहणीमान पाहून त्यांना भिकारी या शब्दाने का संबोधावे, हा मलाच प्रश्न पडला. त्यांचे जीवनमान पाहून कोणीही चाट पडावे. एकदा तर एकमेकांचा आधार घेऊन भीक मागताना त्यांना गाडीत पाहिले आणि चाट पडलो. कारण दीनवाणा चेहरा करून भीक मागत होते. नागपूरला त्यांना सामान्य नागरिकांप्रमाणे फिरताना पाहिले तेव्हा हे तेच का, या विचाराने गरगरायला झाले. मलिन कपडे व एखादा फंडा हेच त्यांचे भांडवल असते. प्रसंगी दीन व हतबल दिसणारा भिकारी पॉश व ऐटीत पाहायचा असेल, तर थोडी सवड काढून आपणही पाहू शकता. त्यासाठी वेळ काढावा लागेल. अगदी र्शीमंताला लाजवेल असे जेवण करून आम्ही दोन दिवसांचे भुकेले आहोत, असा अभिनय करणे सोपे नाही. त्यासाठी लाज सोडण्याची व खोटे बोलण्याची सवय हवी. भिकारी या व्यक्तीकडे बहुतांश लोकांचा पाहण्याचा कल म्हणजे दीनदुबळा, गरीब, लाचार किंवा हतबल असाच असतो. त्यामुळे सहानुभूतीचे शब्द वापरण्यापूर्वी त्यांची वास्तविक स्थिती लक्षात घेणेही आवश्यक असते. पोटासाठी माणूस काय काय करतो, याचेच दर्शन या लोकांच्या वागण्यातून होते.राजेंद्र कडू
शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०१४
गुजरातमध्ये आबादीआबाद , गुरे मात्र महाराष्ट्रात ………………
गुजरातमध्ये सर्वत्र आबादीआबाद असल्याचे ढोल बडविल्या जात असतात . मोदींच्या भाषणातूनही गुजरातच्या समृद्धीचे पोवाडे गायल्या जात असतात. मात्र दरवर्षी गुजरातमधील काठेवाडी मंडळी आपली गुरे ढोरे घेऊन विदर्भात येत असतात. त्यांचे गुरांचे हे कळप विदर्भातील शेतीची नासधूस तर करत असतात शिवाय विदर्भातील राखीव जंगलेही फस्त करत असतात. शेतात गुरे चारल्याबद्दल शेतकरी व काठेवाडी यांच्या मध्ये बर्याच ठिकाणी संघर्ष उदभवून कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्नही निर्माण झालेले आहेत. काठेवाडींची दादागीरीही बऱ्याच ठिकाणी पहावयास मिळते. अमरावती जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये काठेवाडींना प्रवेशबंदी घातल्या गेली आहे. ही काठेवाडी काही ठिकाणी कायमची स्थायिक झाली असून त्यांची नावे मतदार यादीत आली आहेत. त्यामुळे त्यांना नाराज करण्याचे धार्ष्ट्य स्थानिक पुढारी दाखवू शकत नाहीत. आणि यांचा पशुपालनाचा व्यवसाय विदर्भातील जंगलांच्या भरवश्यावर सुखाने चालू आहे. गुजरात मध्ये एवढी समृद्धी असतांना या काठेवाडींना विदर्भात का यावे लागते. मोदींना विनंती की कृपया त्यांच्या मंडळींना सन्मानाने गुजरात मध्ये घेऊन जावे कारण त्यांच्यामुळे गुजरातच्या समृद्धीची खिल्ली उडविल्या जात आहे.
राजेंद्र कडू
शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०१४
दुधखुळे नारायण मूर्ती....................
इन्फोसिसचे एकदा निवृत्ती घेऊन पुन्हा प्रमुख पदावर स्वर झालेले नारायण मूर्ती यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी काही उपाय सुचविले आहेत. त्यांनी सुचवलेले उपाय वाचून मूर्ती हे किती दुधखुळे आहेत याची कल्पना येते. नारायण मूर्ती यांनी मोदीन्ना समर्थन व पाठींबा जाहीर केलेला आहे.(हुरळली शेळी लागली लांडग्याच्या मागे) मोदी पंतप्रधान झाल्यासारखेच आहेत. मोदी व भाजप सत्तेवर आल्यानंतर मुर्ती यांना अपेक्षीत सर्व सुधारणा घडवून आणतील यात शंका नाही. त्यामुळे तुम्ही आम्ही काळजी करण्याची गरज नाही. काय आहेत मूर्तींनी सुचवलेले उपाय .मूर्तींनी सुचविलेला एक उपाय म्हणजे निवडून आलेल्या राजकीय नेत्यांना भरघोस वेतन द्यावे . याची काय गरज आहे . राजकीय नेत्यांना भरघोस वेतन देण्याची आवश्यकता नाही. ते ज्या पंचतारांकीत सोयी सवलती उपभोगतात, त्याला जनतेची काहीच हरकत नसते. हरकत आहे ती डबोले जमविणे, सात पिढ्यांची तरतूद करणे, अमर्याद सत्तेतून अमर्याद संपती व अमर्याद संपत्तीतून पुन्हा अमर्याद सत्ता मिळविणे या गोष्टींना. मूर्ती असा विचार करतातेत जणू काही ते भारतातील राजकारण्यांना ते ओळखतच नाहीत व राजकारणी म्हणजे कुणीतरी बिच्चारा प्राणी आहे . इतका भोळा सांब इन्फोसिस सारखा मोठा उद्योग सांभाळतो यावर विश्वास बसत नाही . नोकरशहांना भरघोस पगार,पंचतारांकित सोयी सवलती देऊनही त्यांची भूक कधी शमतच नाही. अपसंपदा जमविण्यात ते तसूभरही मागे राहिलेले नाहीत. मग राजकारणी तर देशाचे मालक ते नोकरांच्या मागे कसे राहतील.
मूर्ती म्हणतात विकास कामातील दिरंगाईसाठी बाबूंना ही जबाबदार धरावयास हवे. आपल्या काळ्या बेरया उद्योगात राजकारण्यांना बाबूंची साथ हवी असते . नेता आणि बाबू यांची अभद्र युती फेविकॉलने जोडलेली आहे. हि दोस्ती तुटायची नाय . त्यातही कुणालाही जबाबदार ठरविण्याची घंटा बाबू रुपी मांजराने स्वत:जवळच ठेवली आहे ती हिसकावून घेऊन कोण मांजराच्या गळ्यात बांधतो ते पाहू . मूर्ती इतके दुधखुळे असतील असे वाटले नव्हते .
राजेंद्र कडू
लोकसत्ताच्या दिनांक ०८/०२/२०१४ च्या अंकात गिरीश कुबेरयांनी लिहिलेल्या " बेगानी शादीमे…. " या लेखातील काही अंश
Published: Saturday, February 8, 2014
मग हे हास्यास्पद उद्योग करावं असं आपल्यालाच का वाटतं?
कारण आपण अजूनही वैचारिकदृष्टय़ा गुलामीच्या अवस्थेतच आहोत म्हणून.
वर उल्लेखलेल्या गुलामांच्या जथ्थ्याला आपल्यातल्या एखाद्याचं पळून जाणं हेच मोठं यश वाटायचं, तसंच आपलंही आहे. कोणीतरी देशाबाहेर जाऊन काही तरी दिवे लावतोय.. तर करा त्याच्या नावानं आरत्या. असं केल्यामुळे दोन गोष्टी साध्य होतात. इथे असलेल्यांना आपण किती गुणग्राहक आहोत हे दाखवता येतं आणि दुसरं म्हणजे फुकाचं राष्ट्रीयत्वही मिरवता येतं. यातल्या राष्ट्रीयत्वाला फुकाचं म्हणायचं ते अशासाठी की ज्यांच्या यशाच्या गुणगानाची स्पर्धा आपल्यात लागते त्यांचं यश काही त्यांना ते भारतीय आहेत म्हणून मिळालेलं नसतं. म्हणजे चला.. हा आला आर्यसंस्कृतीतला सद्गुणांचा पुतळा भारतीय..देऊन टाका त्याला वरचं पद.. असं काही कुठे घडलेलं नसतं. जे काही असेल ते त्यानं मेहनतीनं मिळवलेलं असतं.
म्हणजे खरं श्रेय ते मेहनतीचं. त्याकडे आपण लक्षच द्यायचं नाही. आणि मिरवायचं काय तर भारतीयत्व. मग कधीतरी एखादा रामकृष्णन खरं बोलून गेला तर ते लागतं आपल्याला.
आणि आणखी एक मुद्दा. तो असा की साजरं करण्याइतकं भव्यपण काय, हे कळतं का आपल्याला? उदाहरणार्थ सत्या नाडेला.
तो बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट्स कंपनीचा प्रमुख कार्यकारी अधिकारीपदी नेमला गेल्यावर समस्त भारतवर्षांला धन्य धन्य झालं. आपल्या मातृभूमीचे त्याने पांग फेडले असंच अनेकांना वाटायला लागलं. पण ही नियुक्ती आपण मिरवावी इतकी महत्त्वाची आहे का? खरं तर या नियुक्तीबद्दल आनंद साजरा करण्यापेक्षा आपल्याला भारतीय म्हणून लाज वाटायला हवी, अशी परिस्थिती आहे, याची जाण आपल्याला आहे का? याचंही खरं उत्तर नाही असंच असेल.
आज जगात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वाधिक अभियंते भारतीय आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनेक कंपन्यांत ज्येष्ठ ज्येष्ठ पदांवर भारतीयच आहेत. तेव्हा त्याचा आनंद साजरा करत असताना एक प्रश्न आपण आपल्याला विचारायला हवा.
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातलं एक तरी उत्पादन भारतीयानं जन्माला घातलेलं आहे का मायक्रोसॉफ्ट. अॅपल. गुगल. फेसबुक. ट्विटर. विकिपीडिया. व्हॉट्सअॅप. झालंच तर गेलाबाजार याहू. ऑर्कुट.. यादी कितीही वाढवता येईल. यातलं आपलं काय? त्यावर काही जण सुबीर भाटिया आणि हॉटमेलचा दाखला देतील. पण सुबीर किती भारतीय आणि हॉटमेलचं आज काय झालंय हे सांगायची गरज नाही.
तेव्हा इतर कुणी काही तरी जन्माला घालायचं आणि आपण त्याचं पालनपोषण करायचं ही गुलामीच आपण करतोय, हे आपण लक्षात घ्यायला हवं. पण त्याच वेळी नवीन काही जन्माला घालायची ताकद आपण हरवून बसलोय, हेही ध्यानात घ्यायला हवं. आता ही बाब काय आपण साजरी करावी इतकी थोर आहे?
पण हे कुठं कळतंय आपल्याला?
बेगानी शादी में धुंद होऊन नाचणारा आपला भारतीय अब्दुल्ला दीवानाच आहे..
*********************************************************************************
बुधवार, १२ फेब्रुवारी, २०१४
फक्त ईंग्रजी न येण्याची लाज का वाटते ?
आम्ही जेंव्हा महाराष्ट्राबाहेर एखाद्या प्रांतात उदा. पश्चिम बंगाल किंवा केरळ मध्ये फिरायला जातो तेंव्हा बंगाली किंवा मल्याळी भाषा आम्हाला येत नसली तरी आम्हाला त्याची लाज वाटत नाही. आम्ही थायलंड किंवा जापान मध्ये पर्यटनाला गेलो तरीसुद्धा आम्हाला तेथील भाषा येत नसली तरी आम्हाला कुठल्याही प्रकारची लाज वाटत नाही. मात्र आम्ही जर ब्रिटन, अमेरिका किंवा युरोप मधील काही ईंग्रजी बोलल्या जाणाऱ्यां एखाद्या ( युरोप मधील मोजक्याच देशांमध्ये ईंग्रजी बोलली जाते) देशामध्ये गेलो व आम्हाला ईंग्रजी येत नसली तर मात्र लाजिरवाणे झाल्या सारखे वाटते.
एवढेच काय मुंबई पुणे किंवा नागपूर सारख्या शहरातील एखाद्या खाजगी कंपनीच्या पॉश कार्यालयात गेलो व आम्हाला ईंग्रजी येत नसेल तर आम्ही ओशाळवाणे होतो. तेथील स्वागतिका आमची विचारपूस ईंग्रजीतूनच सुरु करते व आमची अवस्था केविलवाणी होते. मात्र " मला ईंग्रजी समजत नाही कृपया मराठीत बोला " असे म्हणण्याची आमची हिम्मत नसते. तिची ईंग्रजीतील बोलणे समजून घेण्याची व आपले म्हणणे मोडक्या तोडक्या ईंग्रजीत समजावून सांगण्याची आमची केविलवाणी धडपड सुरु असते.
एवढेच काय मुंबई पुणे किंवा नागपूर सारख्या शहरातील एखाद्या खाजगी कंपनीच्या पॉश कार्यालयात गेलो व आम्हाला ईंग्रजी येत नसेल तर आम्ही ओशाळवाणे होतो. तेथील स्वागतिका आमची विचारपूस ईंग्रजीतूनच सुरु करते व आमची अवस्था केविलवाणी होते. मात्र " मला ईंग्रजी समजत नाही कृपया मराठीत बोला " असे म्हणण्याची आमची हिम्मत नसते. तिची ईंग्रजीतील बोलणे समजून घेण्याची व आपले म्हणणे मोडक्या तोडक्या ईंग्रजीत समजावून सांगण्याची आमची केविलवाणी धडपड सुरु असते.
आजकाल आमच्या मुलांना आम्ही ईंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतो. आम्ही बोलतांना एखादा आकडा मराठीतून सांगितला उदा. एकोणचाळीस, की सात आठ वर्षाचा चिमुरडा/चिमुरडी लगेच विचारतो/ते " म्हणजे कितीहो काका/आजोबा ? " मग त्याला सांगावे लागते थर्टी नाईन.
घरी मराठी बोलल्या जात असल्यामुळे त्याला प्राथमिक स्वरूपाचे मराठी समजते. परंतु एखादा थोडाफार "भारी " मराठी शब्द वापरला तर त्याच्या चेहऱ्यावर " म्हणजे काय रे भाऊ " असे भाव असतात. ईंग्रजी व्याकरण त्या लहानग्याला अचूक माहित असते मात्र मराठीत बोलतांना गव्हाची पोळी असे न म्हणता गहुची पोळी असे म्हणतो. पालकही त्याची ही चूक दुरुस्त करतांना दिसत नाहीत.
कारण फक्त ईंग्रजीच बिनचूक बोलायचे असते, चुकीचे मराठी बोलले तर "चलता हैं " खरे तर आम्हाला मराठी बिनचूक न बोलता आल्यास लाज वाटायला पाहिजे परंतु परिस्थिती उलट आहे. आम्हाला ईंग्रजी बोलता न येण्याची किंवा फाडफाड ईंग्रजी बोलता न येण्याची लाज वाटते वाटते.
श्रीदेवीने इंग्लिश विंग्लिश चित्रपट काढून, लपून छापून का होईना पण ईंग्रजी शिका, इंग्रजी आलेच पाहिजे हा संदेश दिला व आम्हाला ईंग्रजी न येण्याची जी लाज वाटते ती अधिक धृढ केली.
येत्या २७ फेब्रुवारीला मराठी दिन आहे तेंव्हा लाज कशाची बाळगायची ईंग्रजी न येण्याची की मराठी बिनचूक न येण्याची हे आतापासून ठरवायला हवे.
घरी मराठी बोलल्या जात असल्यामुळे त्याला प्राथमिक स्वरूपाचे मराठी समजते. परंतु एखादा थोडाफार "भारी " मराठी शब्द वापरला तर त्याच्या चेहऱ्यावर " म्हणजे काय रे भाऊ " असे भाव असतात. ईंग्रजी व्याकरण त्या लहानग्याला अचूक माहित असते मात्र मराठीत बोलतांना गव्हाची पोळी असे न म्हणता गहुची पोळी असे म्हणतो. पालकही त्याची ही चूक दुरुस्त करतांना दिसत नाहीत.
कारण फक्त ईंग्रजीच बिनचूक बोलायचे असते, चुकीचे मराठी बोलले तर "चलता हैं " खरे तर आम्हाला मराठी बिनचूक न बोलता आल्यास लाज वाटायला पाहिजे परंतु परिस्थिती उलट आहे. आम्हाला ईंग्रजी बोलता न येण्याची किंवा फाडफाड ईंग्रजी बोलता न येण्याची लाज वाटते वाटते.
श्रीदेवीने इंग्लिश विंग्लिश चित्रपट काढून, लपून छापून का होईना पण ईंग्रजी शिका, इंग्रजी आलेच पाहिजे हा संदेश दिला व आम्हाला ईंग्रजी न येण्याची जी लाज वाटते ती अधिक धृढ केली.
येत्या २७ फेब्रुवारीला मराठी दिन आहे तेंव्हा लाज कशाची बाळगायची ईंग्रजी न येण्याची की मराठी बिनचूक न येण्याची हे आतापासून ठरवायला हवे.
राजेंद्र कडू
लोकमतच्या दिनांक ०९/०२/२०१४ च्या अंकातील मंथन पुरवणीतील प्रा. डॉ. द. ता. भोसले यांचा चर्चासत्रातील लेखप्राध्यापकांचे त्यांच्या-त्यांच्या विषयातील ज्ञान अद्ययावत व्हावे, यासाठी विद्यापीठ किंवा अन्य संस्थांच्या साहय़ाने चर्चासत्रांचे आयोजन केले जात असते. अशाच एका चर्चासत्रातील मार्मिक अनुभव.. ----------------- एका चर्चासत्राच्या निमित्ताने शहरातील तीन-चार महाविद्यालयांतील आमच्या विषयाचे प्राध्यापक आणि परिसरातील बर्याच महाविद्यालयातील प्राध्यापक दोन-तीन दिवस एकत्र होतो. काही शोधनिबंध वाचणारे होते. काही ऐकायला आलेले होते; तर बरेच जण चर्चासत्राच्या निमित्ताने परिसरातील प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा हेतू ठेवून गोळा झालेले होते. संयोजकांनी या सार्यांची दोन-तीन ठिकाणी निवासव्यवस्था केलेली होती. यासाठी जे विशेष निमंत्रित होते, त्यांची व्यवस्था वेगळीच केलेली होती. ते आदल्या दिवशीच आले होते. मनसोक्त गप्पा, मनसोक्त खाणे-पिणे हा अलिखित विषय ठरलेला. त्यावरच विशेष भर असावा. ‘मनसोक्त पिणे’ यालाच अग्रक्रम. अन्य ठिकाणी ज्यांची व्यवस्था केलेली होती, त्यातील काहींनी तिथेच भोजन घेतले. जी काही असेल ती भाजी-भाकरी त्यांनी खाल्ली; पण इतर मंडळींनी ‘असला बेचव कडबा खाण्यासाठी आपण इथे आलो आहोत का? या कॉलेजने मनासारखे दिले नाही तरी आपण आपला खर्च करू.आपणाला पगार कमी नाही. शिवाय माझ्यापुरते म्हणाल तर माझा व्याजबट्टय़ाचा धंदा जोरात चालतो. म्हणत असाल, तर मी माझ्या खर्चानं तुम्हाला ‘तीर्थ’ पाजतो. जाऊया एखाद्या चांगल्या हॉटेलात,’ असे म्हणत मित्रांना खोलीबाहेर ढकललेही. रस्त्यावर येताच एक जण चेष्टेच्या सुरात म्हणाला, ‘अरे, या आपल्या रमेशला यंदा ऊस आणि कांद्याचे भन्नाट उत्पन्न झाले आहे. त्याचे निम्मे तास तर त्यानं उसाला पाणी देण्यासाठीच खर्च केले. सवड मिळेल तसा हा कॉलेजवर यायचा. यानं दिलेली कोंबडी पोटात गेली का, याचा प्राचार्य गपगार व्हायचा. तेव्हा यानं आपणाला या आनंदासाठी कोंबडी खाऊ घातली पाहिजे. काय रमेश?’ सगळ्यांनीच जोरात पाठिंबा दिला. रमेश प्राध्यापकाची पंचाइत झाली. ‘बरं देतो बाबा,’ असं म्हणून त्यानं आपली सुटका करून घेतली; पण ज्या सहकार्यानं उसाच्या उत्पन्नाचे घबाड उघडे केले, त्यालाच चिमटा घेत प्राध्यापक रमेश म्हणाला, ‘भाऊसाहेब, आपला पराक्रम कुठं कमी आहे? तुम्हीच आमचे यातले ‘गुरू’ आहात. वर्षातले चार महिन्यांची सुट्टी सोडली तर उरलेल्या आठ महिन्यांत आईची शपथ घेऊन सांगा; तुम्ही किती तास घेतले? तासासाठी थांबणार्या मुलांना तुम्ही पिटाळून लावता. त्यातल्याच एखाद्या पोराला दहा-वीस रुपये देऊन घरातले काम सांगता. भाऊसाहेब, आपणाला मिळणार्या पगाराशी तरी प्रामाणिक राहा. जरा अभ्यास करून, जरा तयारी करून शिकवत चला.’ भाऊसाहेबांना हा घाव वर्मी लागला असावा. स्वत:ला सावरत भाऊसाहेब म्हणाले, ‘अरे, मी एकटाच हे करीत नाही. सारेच प्राध्यापक असे वागतात. शिवाय आजकालची मुले तरी कुठे सिन्सियर आहेत? मजा करायलाच कॉलेजवर येतात. त्यांना भरपूर अभ्यास करून तुम्ही शिकविले तरी पसंत पडत नाही. त्यांची मागणी असते परीक्षेला पास होण्यापुरते शिकवा अशी. वाटल्यास आम्हाला नोट्स लिहून द्या.’ भाऊसाहेबांना टाळी देत तिसरा प्राध्यापक म्हणाला, ‘बरोबर आहे भाऊसाहेब तुमचे, माझा अनुभव तुम्हाला सांगतो. एकदा दोन-तीन विद्यार्थी माझ्याकडे आले आणि मलाच विचारतात, की तुमच्या विषयासाठी कुणाचं गाइड वापरू.मग मीही चालूगिरी केली. ज्याच्याकडून मला भरघोस कमिशन मिळणार, त्या गाइडची मी शिफारस केली. आता बोला, कशाला अभ्यास करायचा मग आपण? त्यापेक्षा रोज एक नवा पदार्थ करून खावा; कंटाळा आला तर बायकोला घेऊन हॉटेलात जेवावे. रात्री-उशिरापर्यंत टी.व्ही. बघावा. नातेवाइकांच्या लग्नाला जावे, लग्ने जमवावीत. संस्थाचालकांना अधूनमधून भेटावे. त्याच्या पायावर झुकावे. त्याच्या वाढदिवसाला मोठी भेट द्यावी, जमले तर त्याच्या पोरापोरीच्या लग्नात राबावे. ज्यांच्या हातात आपली नोकरी आहे, अशा सार्यांचा उदोउदो करावा. आपल्या आवडीच्या विषयावर लेखन करावे, शोधनिबंध लिहावेत याची आता आवश्यकता उरली नाही आणि आजही उरली नाही. आपल्या शेजारच्या कॉलेजचे चर्चासत्राला आलेले सहकारी गेले की, देवधर्म करायला, पर्यटनस्थळे बघायला!’ दुसर्या दिवशीच चर्चासत्राच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही यथातथाच झाला. मान्यवर मंडळींनी सुचेल ते आणि सुचेल तसे बोलून प्रसंग साजरा केला. संस्थेचे अध्यक्ष, सचिव सल्लागार या मंडळींनी प्राध्यापकांसमोर बोलण्याची हौस भागवून घेतली. प्राचार्यांनी नेहमीप्रमाणे कॉलेजप्रगतीचा ‘तेजस्वी’ इतिहास सांगितला. सूत्रसंचालन करणार्या प्राध्यपिकेने संचलन करण्याच्या निमित्ताने एक लांबलचक व्याख्यानच दिले, त्यामध्ये शेरो-शायरीच्या आणि गाजलेल्या काव्यपंक्तींचा पाऊस पाडला. सभागृहात असलेला श्रोतृवर्ग शांतपणे सारे सोसत होता. मध्येच श्रोत्यांची संख्या कमी वाटल्याने प्राचार्यांनी एक वर्गच सभागृहात आणून बसवला. या मुलांच्या डोक्यावरून सारे वाहून जाऊ लागल्याने त्यांनी गप्पा मारायला सुरुवात केली अन् अशाप्रकारे संस्मरणीय उद्घाटन साजरे झाले. सर्वांनाच सुटकेचा आनंद झाला. दुपारच्या भोजनाची व्यवस्था शेजारीच असलेल्या भोजनगृहात केलेली होती. सर्वजण त्याच्यावर तुटून पडले. हातात प्लेट घेऊन गटागटाने चर्चा करीत होते. नव्या-जुन्या आठवणींना उजाळा देत होते. नव्याने ओळखी करून घेत होते. आपल्या कॉलेजच्या प्राचार्यांचा ‘उद्धार’ करीत होते. काहीजण नव्या वेतनश्रेणीचा फरक केव्हा मिळणार, वाढलेला डी. ए. अद्याप का मिळाला नाही. विद्यापीठ अनुदान मंडळाने घातलेल्या जाचक अटीवर नाराजी प्रकट करीत होते तर काहीजण अशा चर्चासत्रांचा काय उपयोग? अशाने गुणवत्ता वाढणार आहे का? अशी टीकाही करीत होते. फार थोडेच-अगदी थोडे लोक नवीन काय वाचले यावर चर्चा करीत होते. काही पठ्ठे तर समोरचे मिष्टान्न खातखातच मागच्या दोन वर्षांत झालेल्या चर्चासत्रात कुणी काय-काय खाऊ घातले. प्रतिनिधींची खाण्याची किती चोख व्यवस्था ठेवली होती, यावरच तोंडाला पाणी सुटेपर्यंत बोलत होते अन् शेवटी शोधनिबंधाच्या वाचनाला प्रारंभ होणार, अशी उद्घोषणा झाल्यावरच सारेजण सभागृहात खुर्चीवर मान टाकून झोपायच्या तयारीने आत आले. नेहमीच्या सवयीप्रमाणे दुपारची विश्रांती त्यांना आवश्यकच होती, नव्हे अत्यावश्यक होती. त्यातच भर पडली सुमार शोधनिबंधांची. पेपर सादर करणार्या या प्राध्यापकांनी शोध (रिसर्च) किंवा ‘संशोधन’ म्हणून जे काही चारपानी कागदांत गोळा केले होते, ती चार पुस्तकांतील मजकुराची तयार केलेली भेळ होती. चार लेखकांची मते आणि अवतरणे यांच्या साहय़ाने त्याने आपला हा ‘रिसर्च पेपर’ सिद्ध केला होता. त्यात ‘सर्च’ही नव्हते, आणि ‘रिसर्च’ही नव्हते. अशा श्रवणीय (चिंतनीय नसलेल्या) निबंधाच्या श्रवणाने गच्च पोट भरलेल्या श्रोत्यांना झोप नाही लागणार तर का होईल? डोळे मिटून मंद सुराच्या साक्षीने सूक्ष्म आणि सखोल ‘चिंतन’ करणार्या या प्राध्यापकांना समोर चहा आल्यावरच भान आले. त्यांच्या दृष्टीने वाचलेले शोधनिबंध खूपच ‘उपयुक्त’ ठरले. रात्री भोजन झाल्यानंतर आम्ही तीन-चार मित्र गप्पा मारत बसलो असतानाच आमच्या शहरातील पण दुसर्या महाविद्यालयात नोकरीस असणारे दोन-तीन प्राध्यापक आले. पाच-दहा मिनिटे इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्यावर एकजण म्हणाला, ‘सर, मी तुम्हाला एक प्लॉट द्यायचं ठरवलं आहे. इतरांपेक्षा चार पैसे स्वस्त देतो. अगदी मोक्यावरचा आहे. प्लॉट खरेदी-विक्रीचा मी व्यवसाय करतो.’ त्याबरोबर शेजारचा प्राध्यापक तितक्याच आग्रहानं मला म्हणाला, ‘मी तुमची विमा पॉलिसी करणार आहे. मी एल. आय. सी. चा एजंट म्हणून काम करतो. पगाराइतका पैसा कमावतो मी.’ थोड्या वेळानं तिसरा म्हणाला, ‘मी डेअरी चालवतो. छान धंदा चालतो. काही लागलं तर सांगत चला तेवढीच तुमची सेवा होईल.’ मी हसत-हसत त्यांना म्हणालो, ‘त्या कोपर्यात दोन सेवानवृत्त प्राध्यापक आपल्याच विषयावर चर्चा करताहेत. त्यांच्याकडे जाऊन आधी ऐकूया. उद्या तुम्हाला तुमच्या कामाविषयी सांगतो,’ असं म्हणताच त्या तिघांचेही चेहरे अपेक्षाभंगामुळे वेडेवाकडे झाले होते. (लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा,लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासकव निवृत्त प्राचार्य आहेत.) |
गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०१४
महात्मा गांधींच्या सर्व फिल्म एकाच छत्राखाली उपलब्ध
दिव्या मराठीच्या दिनांक ०३/०२/२०१४ च्या अंकात प्रसिद्ध झालेली बातमी
अशोक अडसूळ । मुंबई महात्मा गांधी याचं खरंखुरं जीवन शब्दबद्ध करणे कोण्याही लेखकाला शक्य नाही, असे पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते. पण साक्षात बापूंना भेटणे, न्याहाळणे, ऐकणे आता शक्य झालं आहे. कारण मुंबईच्या मणीभवनात गांधींच्या खर्याखुर्या फिल्म्स नि:शुल्क पाहण्याची कायमस्वरूपी सुविधा गांधी फिल्म फाउंडेशनने उपलब्ध करून दिली आहे. गांधी पुण्यतिथीच्या दिवशी फिल्मच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
आपण जिवंत बापू पाहिलेत, पण ते रिचर्ड अँटनबरोच्या चित्रपटात. त्यातील गांधीबेन किंग्जले होते. खर्या बापूंचे चुकूनमाकून दर्शन फिल्म डिव्हिजनच्या माहितीपटात झाले, पण त्रोटक स्वरूपात. जगभरात महात्मा गांधी यांचे सात तासांचे खरेखरे चित्रीकरण उपलब्ध आहे. चलचित्र रूपातील हे बापू आजपर्यंत गोडाऊनमध्ये बंद होते. गांधी स्मारक निधीने ते आता बाहेर आणले आहे. गांधी फिल्म फाउंडेशनने बापूंसंदर्भातील सर्व फिल्मसचे कायस्वरूपी प्रदर्शन उभारले आहे. त्यामुळे कोणालाही जिवंत बापूंना भेटण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तीदेखील नि:शुल्क. येथे तुम्हाला विठ्ठलभाई जव्हेरी यांनी बनवलेली साडेपाच तासाची 'महात्मा' नावाची फिल्म पाहता येईल. ही फिल्म तब्बल नऊ भारतीय भाषांत असून यातील सर्व चित्रीकरण त्या त्या वेळी ब्रिटिश सरकारने केलेले आहे. त्यामुळे आपल्याला साक्षात बापूंना भेटल्याचे समाधान मिळते. खान अब्दुल गफार खान यांचे जीवन चितारणारी 'सरहद्द गांधी यांची कथा', भंगी समाजाच्या जीवनावरील 'अभिशाप', स्वातंत्र्याच्या पूर्वसंधेचा घटनाक्रम दाखवणारी '14 ऑगस्ट 1947 ची मध्यरात्र' आणि 'करेंगे या मरेंगे' हा भारत छोडो आंदोलनावरील माहितीपटही येथील प्रदर्शनात ठेवला आहे.
1942 ची भारत छोडो चळवळ, गोलमेज परिषदांमधील बोलणी, येरवड्यातील 21 दिवसांचे उपोषण, फाळणीच्या काळातील दंगली, त्या शमवण्यासाठी केलेल्या पायपिटीपासून ते नथुराम गोडसेने गोळय़ा झाडण्याच्या काही क्षणापूर्वी बिर्ला भवनाच्या हिरवळीवरची प्रार्थना हे सर्व येथील फिल्ममध्ये पाहण्यास मिळेल.
बुधवार, ५ फेब्रुवारी, २०१४
हे फक्त महाराष्ट्रातच घडू शकते.
नुकत्याच कॉंग्रेसच्या मेळाव्यात एका अतीउत्साही कार्यकर्त्याने हवेत चाकू फिरवून आपला आनंद व्यक्त केला. अमरावती पोलिसांनी तत्परेतेने त्या युवकास अटक करून कोर्टासमोर हजार केले. असे फक्त महाराष्ट्रातच घडू शकते. आपण पाहतो की उत्तर प्रदेश, बिहारमध्ये आनंद किंवा जल्लोष व्यक्त करावयाचा असला की उत्साही कार्यकर्ते हवेत गोळीबार करतात. मिरवणूक काढायची असली की त्यातसुद्धा हवेत बन्दुकीच्या फैरी झाडल्या पाहिजेत असा जणू अलिखित नियमच असतो. यात आनंद प्रदर्शन करायाचे असते की जन सामान्यांवर दहशत बसावी हा उद्देश असतो हे ते कार्यकर्तेच जाणो. महाराष्ट्रात मात्र हा प्रकार खपवून घेतल्या जाणार नाही हे अमरावती पोलिसांनी दखावुन दिले आहे. केवळ फटाके फोडून आनंद व्यक्त करण्याची मुभाच आमचेकडे आहे.
महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था चांगली असल्यामुळे परप्रान्तीयांनासुद्धा या गोष्टीचे आकर्षण आहे व रोजगारासाठी स्थलांतर करतांना महाराष्ट्राला प्राधान्य देण्यात येते. त्यामुळे परप्रांतीयांचे लोंढे महाराष्ट्रात येत असतात. भारतात जरी लोकशाही असली तरी काही प्रांतांमध्ये अजूनही सरंजामशाही अस्तित्वात आहे. भारतीयांचा जसा अमेरिकेकडे ओढा आहे, तसाच इतर प्रांतातील लोकांना महाराष्ट्रातील खुल्या वातावरणाची ओढ आहे. यामुळे सोयीसुविधांवर ताण पडतो. परंतु इतरांनी इकडे येऊ नये म्हणून येथे "जंगल राज" निर्माण होऊ द्यावे असे म्हणता येणार नाही. अमरावती पोलिसांचे अभिनन्दन.
राजेंद्र कडू
शनिवार, १ फेब्रुवारी, २०१४
भारताची प्रतिष्ठा कशी काय धुळीस मिळाली ?
नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेत भारताचा ४-० असा पराभव झाला. हि बातमी देतांना एका वृत्तपत्राने " भारताची प्रतिष्ठा धुळीला मिळाली " अश्या शीर्षकासहीत बातमी दिली आहे. क्रिकेट सामन्यात झालेल्या पराभवाने भारताची प्रतिष्ठा कशी काय धुळीस मिळू शकते हे मला समझले नाही. कारण क्रिकेटची ही टीम भारत सरकारची अधिकृत टीम नसून ही टीम बीसीसीआय म्हणजेच बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडिया या संघटनेची टीम होती. सरकारचा या संघटनेशी दुरान्वयेही काही संबंध नाही. काही वर्षांपूर्वी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा वाद कोर्टात गेला होता तेंव्हा आमचा सरकारशी काहीही संबंध नाही व सरकारकडून आम्ही कुठल्याही प्रकारचे अनुदान अथवा अर्थ सहाय्य घेत नाही, असे शपथपत्र बीसीसीआयच्या वतीने कोर्टात करण्यात आले होते. बीसीसीआय ही केवळ एक नोंदणीकृत संस्था असून अशा प्रकारची नोंदणी कुठलाही प्रकारचा समूह अथवा गट करू शकतो व सामने भरवू शकतो.
वर्षोनुवर्षे सर्वच माध्यमे क्रिकेटविषयक बातम्या देतांना बीसीसीआय टीम असा उल्लेख न करता भारत असा उल्लेख करत आली आहे. उदा. भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना कधीच नसतो तर बीसीसीआय टीम विरुद्ध पीसीबी म्हणजेच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड टीम असा असतो. मात्र एकच चुकीची गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितल्या गेल्यास ती खरी वाटायला लागते तसेच काही या बाबतीत झालेले आहे. बीसीसीआयने सुद्धा या गोष्टीला कधी हरकत घेतली नाही. राष्ट्रभक्तीच्या तव्यावर आपल्या भरघोस उत्पन्नाची पोळी बीसीसीआयला भाजून घ्यायची असल्यामुळे ते कधी अशी हरकत घेतील अशी चुकूनही शक्यता नाही. कुणीतरी कोर्टात याचिका दाखल करून माध्यमांना तसेच बीसीसीआयला भारताची टीम असा उल्लेख करण्यास मनाई करणारा आदेश मिळविल्याशिवाय हा प्रकार बंद होणार नाही. त्यातही आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या काही मंडळींनी अशाच प्रकारच्या संस्थेची नोंदणी करून क्रिकेट सामने भरविण्याचा प्रयत्न केला असता बीसीसीआयने त्याला कोर्टात आवाहन दिले होते. हे म्हणजे एखाद्या भिकाऱ्याने मी खूप वर्षांपासून या फुटपाथवर भिक मागत आहे इथे दुसऱ्या कुणालाही भिक मागण्याचा अधिकार नाही असा दावा करण्यासारखे झाले. असो. मालिकेत पराभव झाला म्हणजे भारताची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असे मला वाटत नाही.
राजेंद्र कडू Email----- rajendra.kadu02@gmail.com