आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला दोन महानायक उपस्थित होते. पैकी एकाने आपली प्रतिमा आपली चाहत्यांमध्ये वाईट होण्याचा धोका असुनही आपले टक्कल लपविले नव्हते. दुसऱ्या महानायकाचे मला माहित नाही. काही वर्षांपूर्वीही हा महानायक स्व. बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्याकरिता मुंबईला आला असता तेंव्हाही त्याने आपले टक्कल लपविले नव्हते.हाच खरा महानायक.
रविवार, २३ नोव्हेंबर, २०१४
गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०१४
बुधवार, १२ नोव्हेंबर, २०१४
| दिलीप कुलकर्णी फोन इन्टरनेट वापरत नाहीत. मातीच्या घरात राहतात. वीज फक्त दिव्यांपुरती वापरतात. पंखे वापरत नाहीत. खेड्यात राहतात. टेल्को मध्ये इंजिनियर होते. पर्यावरणपूरक जीवनशैलीने जगतात. लोकांचे प्रबोधन करण्यासाठी " गतिमान संतुलन " हे चार पानी मासिक चालवतात. काळी पांढरी छपाई असते व कुठलीही जाहिरात नसते. कुठल्याही विषयावर ते वेगळाच विचार मांडतात की ज्याबद्दल आपण विचारही केला नसतो. त्यांची पंधरा पुस्तके प्रसिध्द झालेली आहेत. ही पुस्तके उज्ज्वल ग्रंथ भांडार , आप्पा बळवंत चौक , पुणे येथे उपलब्ध आहेत. त्यांना २०११ साली वर्ध्याला डॉ. उल्हास जाजू यांनी जाहीर केलेला त्यांच्या आजोबांच्या नावाने असलेला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. विकास म्हणजे विनाश या विषयावर ते पूर्ण दिवसाची कार्यशाळा घेतात. पर्यावरण साहित्य संमेलन दापोली येथे कमीत कमी खर्चात घेतले. ते भारताचे मार्क बॉईल आहेत. त्यांच्याशी संपर्क फक्त पोस्टकार्ड द्वारेच होऊ शकतो. |
शनिवार, १ नोव्हेंबर, २०१४
पाकिस्तानची आणि भाजपची एकच गोची
पाकिस्तानमध्ये शाळांमधून इतिहास शिकवतांना काय शिकवावे हा प्रश्न पडतो. स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास शिकवावा तर कॉंग्रेसचा उल्लेख अपरिहार्य होतो त्यामुळे पाकिस्तानात विद्यार्थ्यांना गाळून इतिहास शिकवावा लागतो. भाजपचेही तसेच झाले आहे स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास शिकवायचा म्हणजे कॉंग्रेसचा उल्लेख टाळता येत नाही. त्यामुळे भाजपनेही आता इतिहास गाळून सांगायचे ठरविले आहे. या गाळणीची भोके सोयीची ठेवली आहेत. त्यातून गांधी, नेहरू सारखी मंडळी खाली पडतात तर पटेलांसारखी काही नावे गाळनीतच राहतात. आता तर लोकेश चंद्र नावाच्या विद्वानाने मोदी हे गांधीजिंपेक्षाही उजवे आणि दैवी अवतार असल्याचा शोध लावला आहे. सूर्य मावळतीला गेलाकी खुज्या माणसांच्या सावल्याही लांब पडतात असे म्हणतात त्याचा प्रत्यय येत आहे. --- राजेंद्र कडू
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
