आैरंगझेब परवडला,
:
:
:
:
:
:
तुघलक नको.
:
:
:
:
:
:
तुघलक नको.
महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे उर्जास्थान महाऋषी वारकरी रत्न श्री संत
वासुदेव महाराज यांचा जन्म अकोट तालुक्यातील अकोली जहाँगीर येथे २३
फेब्रुवारी १९१७ रोजी झाला. महाराजांचे जन्मनाव देवेंद्र देव असे होते.
भास्कर महाराज समाधी मंदिराचा जिर्णोद्धार त्यांनी केला. मामा दांडेकर
गौरीशंकर महाराजांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
केली. शेत स. नं. श्रीक्षेत्र अकोली जहागीर येथील संत गजानन महाराजांनी सजल
केलेल्या विहिरीच्या जिर्णोद्धाराचे काम पूर्ण केले. संत गजानन महाराज संत
भास्कर महाराज यांची जिथे ऐतिहासिक भेट झाली तिथे मंदिराची निमिर्ती केली.
संत तुकाराम हे वासुदेव महाराजांचे भावविश्व होते. त्यांचे विचार सामान्य
माणसाच्या मनात खोलवर रुजवण्याचे मोठे कार्य अविरत सुरू आहेत. यावर्षी
महाराजांचा १०० वा जयंती महोत्सव श्रद्धासागर अकोट येथे साजरा होत आहे.
| ||
श्री गजानन विजय या ग्रंथाला पुष्टी देत ऐतिहासिक घटनांचा सरकारी कागदपत्रांचा सखोल अभ्यास करून श्री संत गजानन महाराजांचे संपूर्ण चरित्र हा ग्रंथ त्यांनी लिहिला. महाराजांनी चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण दोनशे उपपुराण उपनिषदांचा सखोल अभ्यास केला. वारकरी संप्रदाय टिकून राहण्यासाठी त्यांनी अडगाव येथे वारकरी प्रशिक्षण केंद्र उघडले तसेच संताच्या कार्याला उजाळा देण्यासाठी सखोल संशोधन करून दाखले मिळवून शासनाला दखल घेण्यास भाग पाडले. पंढरीचे विठ्ठल मंदिर केवळ वारकऱ्यांचे आहे. बडवेशाही नको म्हणून सत्तर पाने माहिती नाडकर्णी कमिशनकडे पाठवून पंढरी मुक्त केली. दत्त घाटाच्या पंढरपूर चार पायऱ्या वाहून गेल्या असत्या लहान अधिकाऱ्यापासून ते राष्ट्रपतीपर्यंत अर्ज करून महाराजांमुळे दत्तघाट पायऱ्यांचे बांधकाम झाले. आळंदी येथील सिद्धबेट काही प्रवृत्तींनी बळकवण्याचा प्रयत्न केला. परंतु, महाराजांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत एेतिहासिक पुरावे देऊन सिद्धबेट मुक्त केले. हे कार्य अविरत सुरू असताना संत वासुदेव महाराज आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे गेले असता तेथील संत गजानन महाराज यांच्या मठात त्यांनी जुलै २००९ रोजी रात्री १० वाजता देहत्याग केला. महाराजांचे कार्य अविरत सुरू रहावे याकरिता महाराजांच्या आशिर्वादाने अकोटातील दर्यापूर मार्गावर श्री क्षेत्र श्रद्धासागर याठिकाणी संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेची निर्मिती वारकरी भवन अध्यात्मिक सामाजिक सेवा केंद्र उभारण्यात आले आहे. अध्यात्म अॅड. सुभाष हिंगणकर, अकोटमो. ९८८११६३३३८ |