यापूर्वी युती सरकारच्या काळात कार्यकर्त्यांना झुणका-भाकर केंद्रांद्वारे कमाईची सोय करून दिली होती. दोन रुपयात झुणका-भाकर. त्यावर एक रुपया सबसिडी त्यात जेवणारे कोण ? तर राजीव गांधी, नरसिंहराव, शरद पवार. फक्त यादी सादर करायची व अनुदान उचलायचे. बोलाचीच भाकर आणि बोलाचाच झुणका.
शनिवार, १४ मार्च, २०१५
शुक्रवार, १३ मार्च, २०१५
रविवार, ८ मार्च, २०१५
महिलांनो, ………
काल महिला दिन झाला. पण तुमची वाट खडतरच राहील असे दिसते आहे. १) प्रतिभाताईंच्या रूपाने एक महिला राष्ट्रपती होणार म्हणून काही मनुवाद्यांनी त्या निवडणुकीला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे स्वरूप आणून ठेवले होते व या निवडणुकीत त्या हमखास निवडून येण्याची शक्यता असुनही त्यांना या विजयाचा निर्भेळ आनंद मिळणार नाही याची काही नतद्रष्टांनी पुरेपूर काळजी घेतली. २) विजया वाड यांची विश्वज्ञानकोष मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली तेंव्हा त्या मुळी साहित्यिकच नाहीत असा कांगावा करण्यात आला होता. मात्र त्यांच्या कामाचा झपाटा एव्हढा की त्यांनी कोषाचे खंडा मागोमाग खंड प्रसिद्ध करण्याचा सपाटा लावला, व्हीसीडी प्रसिद्ध केल्यात, खंड ऑन लाईन उपलब्ध करून दिलेत, की जे काम शास्त्री-पंडितांना वर्षोन्वर्षे अध्यक्ष पदावर राहूनही जमले नव्हते. ३) स्टेट बँकेचे अध्यक्ष निवृत्त होण्यापूर्वीच काही महिने आधी त्यांचा उत्तराधिकारी जाहीर केल्या जातो जेणेकरून सांधेबदल सुरळीत व्हावा. मात्र या वेळेस सेवाज्येष्ठतेप्रमाणे अरुंधती भट्टाचार्य अध्यक्ष होण्याची शक्यता होती. त्यांच्या नेमणुकीसाठी मात्र बरीच खळखळ करण्यात आली व आधीचे अध्यक्ष निवृत्त झाल्यावरही काही महिने प्रभारी अध्यक्ष नेमून नंतरच अरुंधती भट्टाचार्य यांना नेमणूक देण्यात आली. त्यांनी मात्र अल्प कालावधीतच आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवून दिली. महिला दिनाच्या शुभेच्छा.शनिवार, ७ मार्च, २०१५
नागपुरात काही वर्षांपूर्वी एका गुंडाच्या छळाला कंटाळून वस्तीतील लोकांनी त्याला बदडून ठार केले व दीडशे लोकांचा जमाव ठाण्यावर जाउन प्रत्येक जण मीच अक्कू यादवला (गुंड ) ठार मारले असे सांगू लागला यात महिला बहुसंख्य होत्या. नुकताच त्या केसचा निकाल लागून कोर्टाने सगळ्याना निर्दोष सोडले. नागपुरातच काही महिन्यान्पुर्वी आणखी एका गुंडाच्या मागे जमाव लागला होता तो पोलिस ठाण्यात दडून बसला. त्याला आमच्या ताब्यात द्या म्हणून जमाव ठाण्यात ठिय्या देऊन बसला होता.
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.मी माझ्या (महापालिका व विद्यापीठ) असलेल्या (आठ लाख लोकसंख्या असलेल्या) अमरावती शहरात सर्वत्र गेली २५ वर्षांपासून सर्वांशी ( हो सर्वांशी ) फक्त मराठीतच बोलतो. .........तुम्ही ?आणि हो मला हिंदी समजत नाही किंवा मला हिंदी बोलत येत नाही हे सांगायला जी हिम्मत लागते ती तुमच्याकडे आहेना ?तर मग तुम्ही खरे मराठी आहात.
शुक्रवार, ६ मार्च, २०१५
अल्प किंमतीत विकत घेतलेल्या अत्यंत खडकाळ जमिनीत मेहनतीने व सयंमाने पेरलेल्या डाळींबाने चिखलीच्या गुप्ता परिवाराला यंदा कोट्यवधी रुपयाचे भरघोस उत्पन्न दिले आहे. या डाळिंबांची आखात आणि बांगलादेशात निर्यात होत आहेत. सतिश व जोत्स्ना गुप्ता परिवाराने डाळींब शेतीत हे जे यश प्राप्त केले आहे. ते विदर्भाच्या आत्महत्या ग्रस्त भागासाठी यशाची एक नवी दिशाच ठरावी असे आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली गावातील ज्योत्स्ना गुप्ता आणि त्यांचे पती सतिश गुप्ता यांनी ही किमया करून दाखवली आहे. सतिश गुप्ता चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष आहे. ज्योत्सनाताईंना शेतीची आवड होतीच पण फार माहिती नव्हती. सासरी त्यांना शेती कळायला लागली. सासरेबुवांमुळं शेतीतले बारकावे समजले. पती बँकेच्या कामात व्यस्त होते. मग त्यांनी स्वत: शेतीत उतरायचं ठरवलं.
dalimb
पती सतिश गुप्तांनी त्यांना २००० साली चिखली जवळ साडेसतरा एकर शेती घेऊन दिली. जमीन खडकाळ होती. त्यात काही वर्ष त्यांनी इतर पिकं घेतली, पण त्यात फार यश आलं नाही. शेवटी डाळिंब लावायचा निर्णय झाला. २००७ साली त्यांनी १२ एकरात भगवा जातीची डाळींब लागवड केली. घरच्या सधन असल्यानं यासाठी लागणारं सर्व भांडवल ज्योत्स्नाताईंना त्यांच्या पतीनं दिलं. ज्योत्सना गुप्ता यांनी दोन बाय दोनच्या खड्ड्यात डाळींबाची लागवड केली. त्याआधी प्रत्येक रोपाला १० किलो कोंबडीखत, ५० किलो शेणखत आणि निंबोळी भुकटी, ५०० ग्रॅम डीएपी, १०० ग्रॅम सुपर फॉस्फेट , १०० ग्रॅम 4-8 आणि १०० ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट टाकलं. त्यानंतर आठ बाय १२ फूट अंतरावर रोपांची लागवड केली. दोन वर्षांनी त्यांनी पहिली छाटणी केली. सेंद्रीय खतांवर जास्त भर दिला. लागवडीनंतर २६ महिन्यांनी उत्पादनाला सुरुवात झाली. झाडं मजबूत व्हावीत म्हणून पहिल्या वर्षी त्यांनी फारसं उत्पादन घेतलं नाही. प्रति झाड २० ते २५ किलो फळं घेतली. सुरुवातीला व्यवस्थापनासाठी ज्योत्सना ताईंना अनेक अडचणी आल्या. त्यावर मात करत त्यांनी बाग जगवली.
एकरी ४०० झाडं याप्रमाणे १२ एकरात चार हजार ८०० झाडं आहेत. य़ोग्य खत आणि फवारणीच्या नियोजनामुळे प्रत्येक फळ ५०० ग्रॅम पेक्षा जास्त वजनाचं आहे. सध्या प्रत्येक झाडाला साठ किलोंपर्यंत फळं लागलेय. दर्जा चांगला असल्यामुळे ज्योत्सना गुप्तांना डाळिंब निर्यात करणं शक्य झालं. यंदा पहिल्यांदाच त्या आपल्या बागेतली डाळिंब निर्यात करत आहे, लागवडीनंतर हेच त्यांचं खरं उत्पादन आहे. आखाती देश आणि बांगलादेशात त्यांच्या डाळिंबाला मागणी आहे. व्यापाऱ्यांना त्यांनी
प्रति किलो ६० रुपये दरानी फळं विकलीय. त्यानंतर व्यापारी डाळिंबाची निर्यात करणार आहे. प्रति झाड ३६०० रुपये त्यांना उत्पन्न मिळणार आहे. म्हणजेच १२ एकरातून त्यांना साधारण एक कोटी ७२ लाख रुपये उत्पन्न मिळणार आहेत. प्रति झाड व्यवस्थापनासाठी त्यांना ८०० रुपये असा ३८ लाख रुपये उत्पादन खर्च आला. हा खर्च वजा करता यंदा त्यांना एक कोटी ३५ लाखांपर्यंत उत्पन्न मिळणार आहे.
ठिबक, खतं आणि पाणी व्यवस्थापन, वातावरणातील बदलानुसार फवारणीचं नियोजन ज्योत्स्नाताईं करतात. त्यांना कीड-रोगांबद्दल माहीती नसल्यास त्या तज्ञांचा सल्ला घेतात. याच प्रकारे त्यांनी आपली बाग जपलीय. आणि विदर्भाच्या खडकाळ जमिनीत एकरी ११ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न घेऊन दाखवलं. महिलांना व्यवस्थापन चांगलं जमते.
ज्योत्स्नाताईही आपलं व्यवस्थापन कौशल्य शेतीत वापरलं. म्हणूनच त्यांनी आपल्या घरच्या नियोजनासोबतच शेतीचंही चांगलं नियोजन केलं आणि इतर महिलांसमोर एक आदर्श निर्माण करुन दिला.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली गावातील ज्योत्स्ना गुप्ता आणि त्यांचे पती सतिश गुप्ता यांनी ही किमया करून दाखवली आहे. सतिश गुप्ता चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष आहे. ज्योत्सनाताईंना शेतीची आवड होतीच पण फार माहिती नव्हती. सासरी त्यांना शेती कळायला लागली. सासरेबुवांमुळं शेतीतले बारकावे समजले. पती बँकेच्या कामात व्यस्त होते. मग त्यांनी स्वत: शेतीत उतरायचं ठरवलं.
dalimb
पती सतिश गुप्तांनी त्यांना २००० साली चिखली जवळ साडेसतरा एकर शेती घेऊन दिली. जमीन खडकाळ होती. त्यात काही वर्ष त्यांनी इतर पिकं घेतली, पण त्यात फार यश आलं नाही. शेवटी डाळिंब लावायचा निर्णय झाला. २००७ साली त्यांनी १२ एकरात भगवा जातीची डाळींब लागवड केली. घरच्या सधन असल्यानं यासाठी लागणारं सर्व भांडवल ज्योत्स्नाताईंना त्यांच्या पतीनं दिलं. ज्योत्सना गुप्ता यांनी दोन बाय दोनच्या खड्ड्यात डाळींबाची लागवड केली. त्याआधी प्रत्येक रोपाला १० किलो कोंबडीखत, ५० किलो शेणखत आणि निंबोळी भुकटी, ५०० ग्रॅम डीएपी, १०० ग्रॅम सुपर फॉस्फेट , १०० ग्रॅम 4-8 आणि १०० ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट टाकलं. त्यानंतर आठ बाय १२ फूट अंतरावर रोपांची लागवड केली. दोन वर्षांनी त्यांनी पहिली छाटणी केली. सेंद्रीय खतांवर जास्त भर दिला. लागवडीनंतर २६ महिन्यांनी उत्पादनाला सुरुवात झाली. झाडं मजबूत व्हावीत म्हणून पहिल्या वर्षी त्यांनी फारसं उत्पादन घेतलं नाही. प्रति झाड २० ते २५ किलो फळं घेतली. सुरुवातीला व्यवस्थापनासाठी ज्योत्सना ताईंना अनेक अडचणी आल्या. त्यावर मात करत त्यांनी बाग जगवली.
एकरी ४०० झाडं याप्रमाणे १२ एकरात चार हजार ८०० झाडं आहेत. य़ोग्य खत आणि फवारणीच्या नियोजनामुळे प्रत्येक फळ ५०० ग्रॅम पेक्षा जास्त वजनाचं आहे. सध्या प्रत्येक झाडाला साठ किलोंपर्यंत फळं लागलेय. दर्जा चांगला असल्यामुळे ज्योत्सना गुप्तांना डाळिंब निर्यात करणं शक्य झालं. यंदा पहिल्यांदाच त्या आपल्या बागेतली डाळिंब निर्यात करत आहे, लागवडीनंतर हेच त्यांचं खरं उत्पादन आहे. आखाती देश आणि बांगलादेशात त्यांच्या डाळिंबाला मागणी आहे. व्यापाऱ्यांना त्यांनी
प्रति किलो ६० रुपये दरानी फळं विकलीय. त्यानंतर व्यापारी डाळिंबाची निर्यात करणार आहे. प्रति झाड ३६०० रुपये त्यांना उत्पन्न मिळणार आहे. म्हणजेच १२ एकरातून त्यांना साधारण एक कोटी ७२ लाख रुपये उत्पन्न मिळणार आहेत. प्रति झाड व्यवस्थापनासाठी त्यांना ८०० रुपये असा ३८ लाख रुपये उत्पादन खर्च आला. हा खर्च वजा करता यंदा त्यांना एक कोटी ३५ लाखांपर्यंत उत्पन्न मिळणार आहे.
ठिबक, खतं आणि पाणी व्यवस्थापन, वातावरणातील बदलानुसार फवारणीचं नियोजन ज्योत्स्नाताईं करतात. त्यांना कीड-रोगांबद्दल माहीती नसल्यास त्या तज्ञांचा सल्ला घेतात. याच प्रकारे त्यांनी आपली बाग जपलीय. आणि विदर्भाच्या खडकाळ जमिनीत एकरी ११ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न घेऊन दाखवलं. महिलांना व्यवस्थापन चांगलं जमते.
ज्योत्स्नाताईही आपलं व्यवस्थापन कौशल्य शेतीत वापरलं. म्हणूनच त्यांनी आपल्या घरच्या नियोजनासोबतच शेतीचंही चांगलं नियोजन केलं आणि इतर महिलांसमोर एक आदर्श निर्माण करुन दिला.
बुधवार, ४ मार्च, २०१५
जनसंघ नावाचा एक पक्ष १९७७ साली विसर्जित झाला होत. जनता पक्षात सामील होण्यासाठी, जनतेची सेवा करण्यासाठी. मात्र तीन वर्षाच्या आताच त्याने पुन्हा नवा अवतार घेतला, भारतीय जनता पक्ष या नावाने. कॉंग्रेस नेत्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यावर १९४७ साली कॉंग्रेस विसर्जित करून पुन्हा तीच मंडळी १९५० साली जेंव्हा घटना लागू झाली (२६ जानेवारी) म्हणजे तीन वर्षाच्या आत किंवा तत्पूर्वी एकत्र येउन पुन्हा नाव बदलून १९५२ सालच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांना सामोरी गेली असती तर लोकांनी भरघोस मतांनी त्यांना निवडून दिले नसते काय ? कारण लोकांना माहित असते बाटली जरी नवी असली तरी आतले लोणचे मुरलेले आहे. त्यामुळे कॉंग्रेस विसर्जित केली किंवा नाही याने काय फरक पडतो. अहो, वीणा पाटलांनी केसरी टुर्स सोडून वीणा वर्ल्ड नावाची कंपनी काढली तरी त्यांच्या क्षमतेवर जुने ग्राहक विश्वास दाखवणारच. कारण केसरी टूर्समध्ये असतांना ती कंपनी चालवण्यामागे डोके कुणाचे आहे हे ग्राहक जाणून होतेच. शामाप्रसाद मुखर्जींनी पक्ष फार वर्षांपूर्वी काढला पण जनसंघाचे स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग शुन्य. मग नाव बदलले असते तरी लोक नेहरू, पटेल, पंत, मौलाना आझाद यांच्याच मागे राहिले असते.
मंगळवार, ३ मार्च, २०१५
तुर्कस्तान या मुस्लिम देशाच्या संसदेत मागील आठवड्यात खासादारान्मध्ये मारामारी झाली. एक महिन्यापूर्वी नेपाळ या हिंदू राष्ट्राच्या संसदेत बारा खासदारांची डोकी फुटली. भारत या सेक्युलर देशाच्या संसदेत फक्त गदारोळ होतो. मुस्लीम किंवा हिंदू देशातील संसदेप्रमाणे मारामारी अजूनपर्यंत झाली नाही. सेक्युलर असण्याचा हा फायदा आहे काय ?
विशाल भारतीय महासंघाची शक्यता !
आणखी काही वर्षांनी पाकिस्तान किंवा बांगलादेश स्वत:हून भारतात विलीन होतील. कारण झालेले विभाजन अनैसर्गिक आहे. एक सारखी संस्कृती असलेल्या भूभागांचे विभाजन जास्त दिवस टिकत नाही असाच ईतिहास आहे. या तिन्ही देशातील जनता धर्मांधांच्या कट्टरतेला कंटाळेल व जनमताचा रेटा एव्हढा वाढेल की त्याचे पर्यावसान एकत्रीकरणाकडे वाटचाल करण्याकडे होईल. विशेष म्हणजे कट्टरतेची वाटचाल तिन्ही देशात अगदी समांतर अशी चालू आहे. दोन जर्मनी एक झाले. दोन विएतनामही एक झाले.युरोपमध्ये दोन डझनाहून जास्त देशांनी एकत्र येउन युरोपिअन महासंघ स्थापन केला. तसेच भारत, पाकिस्तान, बांगलादेश एकत्र येतील. सोबत नेपाळ, भुतान, ब्रम्हदेश ,श्रीलंका हे सुद्धा आम्हाला तुमच्यात घ्या अशी विनवणी करतील व एक विशाल भारतीय महासंघ अस्तित्वात येईल असे वाटते. अर्थात भाजप सत्तेत नसला तरच हे शक्य होईल. अतिरेकी राष्ट्रवादामुळे जर्मनीची शकले झाली होती. एव्हढेच नव्हे तर बर्लिन शहराचेही दोन तुकडे झाले होते. सत्तर वर्षापूर्वी जर अतिरेकी राष्ट्रवादामुळे हे होऊ शकले तर आता तर त्याची शक्यता जास्तच वाढली आहे. कारण इतक्या वर्षांमध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. जग खूप जवळ आले आहे. थोड्याशाही फुंकरीने कुणाच्या अस्मितेला केंव्हा आणि कसे घुमारे फुटतील हे सांगता येत नाही. तरी पण सध्या काही लोकाना आवडत असलेली कट्टरता लोकांच्या मनातून हळूहळू उतरत जाईल. व सहयोगाचे वातावरण निर्माण होईल. कट्टर मार्गी आपले प्रयत्न सुरूच ठेवतील. तरी पण जर सध्यासारखे धसमुसळे सरकार जर सत्तेत नसेल व भारतात एखाद्या समंजस पक्षाची राजवट थोड्या दीर्घ लालावधीसाठी सत्तेवर असले तर एक बृहद भारतीय महासंघ अस्तित्वात येण्याची प्रबळ शक्यता आहे.
राजेंद्र कडू
शेतकरी संघटनेचा आद्य संस्थापक श्रीकृष्ण. कृष्णाच्या बालपणी गोकुळात दुधदुभते भरपूर होते मात्र ते बाळगोपाळाना खायला मिळत नव्हते तर संपूर्ण दुध मथुरेला जायचे. तेथे कंसाच्या राण्या दुधाने आंघोळी करायच्या. म्हणून बाळगोपाळाना चोरून दही दुध खावे लागायचे. कृष्ण आणि त्याचे सवंगडी मथुरेला दुभत घेऊन जाणाऱ्या गौळणीनची वाट अडवून दुध दही लोणी खायचे. प्रत्येक तमाश्याच्या सुरवातीला हा प्रसंग असतो. गणगौळणीनेच तमाशाची सुरवात होते.
सोमवार, २ मार्च, २०१५
परशुरामाने एकवीसवेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली असे म्हणतात. म्हणजे त्या आधी २० वेळा तसा प्रयत्न करुनही तो यशस्वी झाला नाही असे यावरून सिध्द होते. आणि एकविसाव्या वेळी प्रयत्न करूनही तो यशस्वी झाल्याचे दिसत नाही. कारण अजूनही क्षत्रीय मराठा, क्षत्रिय राजपूत, क्षत्रिय किरात अशा जाती पोटजातीचे लोक अस्तित्वात आहेत असे दिसतात. म्हणजे परशुरामाचा हा सर्व खटाटोप अयशस्वी झालेला दिसतो. हे सर्व "विक्रम आणि वेताळ" या कथेतल्या सारखे वाटते. विक्रम पुन्हा पुन्हा वेताळाला झाडावरून काढायचा आणि त्याचे मौन भंग झाले की वेताळ पुन्हा झाडाला जाउन लोंबकळायचा. विक्रमाच्या या खटाटोपात आपला एक फायदा मात्र झाला. मुलांवर चांगले संस्कार करणाऱ्या बोधकथा जन्माला आल्या व त्यावर पिढ्यांपिढ्या पोसल्या गेल्या. परशुरामाचा हा उपक्रम मात्र याबाबतीत भाकड ठरला. तेंव्हा हिंसा सर्वत्र वर्ज्य. हिटलरही असाच तोंडघशी पडला होता. संपूर्ण ज्यू जमातीचा नायनाट करायचे त्याने ठरविले होते. त्यासाठी जर्मनीत त्याने छळ छावण्या उभारल्या होत्या. ज्यूंना एकगठ्ठा मारण्यासाठी मोठ मोठी ग्यास चेम्बर्स उभारली होती लाखो ज्यू मारलेही. मात्र ज्यू जमात नष्ट झाली नाही. उलट कुठलाही देश नसणाऱ्या ज्यूंना स्वतंत्र देश (इस्त्रायल) मिळाला. अमेरिकेततर ज्यू लॉबी प्रबळ आहे, त्यांना विचारल्याशिवाय कुठलाही मोठा निर्णय घेतल्या जात नाही, असे म्हणतात. हिटलराला मात्र स्वत:वर गोळी झाडून घ्यावी लागली. तेंव्हा पुन्हा एकदा म्हणावेसे वाटते, हिंसा सर्वत्र वर्ज्य.
रविवार, १ मार्च, २०१५
त्यांच्या (गडकरी) वैयक्तिक सहलीबद्दल कोणी काही बोलायचे कारण नाही. या पाहुणचाराला
प्रचलित कायद्यानुसार भ्रष्टाचारही म्हणता येणार नाही; पण एक गोष्ट नक्की
की, ते 'पूर्ती' प्रकरणातील कथित अवाजवी प्रकारांचा बभ्रा झाल्यानंतर
पायउतार झालेले अध्यक्ष होते. त्या वेळेला पायाभूत सुविधा क्षेत्रातील एका
कंपनीचे व त्यांचे संबंध असल्याचा आरोप झाला होता. त्याचबरोबर ते भाजपचे
ज्येष्ठ नेतेही होते. त्या सुमारास देशातील वातावरण असे होते की, एखादे
शेंबडे पोरही लवकरच होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप व मित्रपक्षांचे सरकार
येणार हे समजून होते. तसे नसते तर खुद्द गडकरींनीच आयकर अधिकाऱ्यांना 'आमचे
सरकार आल्यावर तुम्हाला वाचवण्यास कोणी चिदम्बरम वा सोनिया गांधी असणार
नाहीत..' असा बालिश दम मुजोरपणाने दिला नसता. हे लिहावयाचा उद्देश हाच
की, गडकरींनी कितीही वेड पांघरून पेडगावला जायचा प्रयत्न केला तरी ज्या
वेळेस त्यांनी हा पाहुणचार स्वीकारला त्या वेळेस ते येऊ घातलेल्या सरकारात
एक वजनदार मंत्री असणार हे जे सर्वाना कळत होते, ते रुईयांना समजत नव्हते,
असे म्हणणे वेडेपणाचे ठरेल. गडकरी यांनी म्हटले आहे की, त्यांचे आमचे
गेल्या २५ वर्षांचे संबंध आहेत व ते आमचे मुंबईत अनेक वर्षांचे शेजारी
आहेत. पण गंमत अशी की, एस्सार समूहाच्या अध्यक्षांच्या कार्यालयातून
नौकेच्या कप्तानाला पाठवण्यात आलेल्या ई-मेलमध्ये या 'शेजारधर्माचा' उल्लेख
नसून त्यात गडकरी हे भाजपचे माजी अध्यक्ष आहेत, असा उल्लेख आहे.-अॅड. विजय त्र्यंबक गोखले, डोंबिवली(लोकसत्ता)
मी आणि काॅ. गोविंद पानसरे दोघेही कोल्हापूरचे; पण आमची तशी खास मैत्री
नव्हती. आमच्या दोघांचे एक काॅमन मित्र होते. ते म्हणजे, िनवृत्त
न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील. काॅ. पानसरे यांनी कोळसे-पाटील
यांच्याकडे एकदा निवृत्त पोलिस अिधकारी डॉ. धनराज वंजारी यांच्या पुस्तकाचा
िवषय काढला. त्यावर कोळसे-पाटील यांनी त्यांना 'हू िकल्ड करकरे?' हे माझे
पुस्तकही अवश्य वाचा, असे सांिगतले.
"हू िकल्ड करकरे?alt39 वाचून काॅ. पानसरे यांनी मला फोन केला. २६/११ हल्ल्याची अंधारी बाजू उजेडात आणल्याबद्दल धन्यवादही िदले. पुढे आमचा परिचय वाढत गेला. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा फोन आला. म्हणाले, 'हू िकल्ड करकरे? या तुमच्या पुस्तकावर आपल्याला एक कार्यक्रम ठेवायचा आहे.' ३० िडसेंबर तारीख मुक्रर झाली. कार्यक्रमाचे ठिकाण ठरले, दसरा चौकातले शाहू स्मारक. काॅ. पानसरे यांच्या कामाची पद्धत नियोजनबद्ध होती. आमच्या परिसंवादाची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. वर्तमानपत्रांत तशा बातम्या आल्या. कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आमदार आहेत, िशवसेनेचे राजेश क्षीरसागर. त्यांनी या कार्यक्रमाविरुद्ध दंड थोपटले. परिसंवाद उधळवून लावण्याचा इशारा िदला. पण, काॅ. पानसरे काही बधले नाहीत. कार्यक्रमाला दोन िदवस िशल्लक होते. परत हिंदुत्ववादी संघटनांनी उचल खाल्ली. या परिसंवादाला परवानगी देऊ नका, अशी या संघटनांनी मागणी केली. पोलिस म्हणाले, परवानगी आम्ही नाकारू शकत नाही. कारण 'हू किल्ड करकरे?' पुस्तकावर बंदी नाही. शेवटी, संपूर्ण कार्यक्रमाचे िव्हडिओ रेकाॅर्डिंग करायची अट घालण्यात आली. शाहू स्मारकात कार्यक्रमादिवशी तोबा गर्दी उसळली. बाहेर दोनशे खुर्च्या आिण दोन स्क्रीन लावावे लागले. २६/११च्या मुंबई हल्ल्याची मी माझी थेअरी सांगितली. न्यूज चॅनेलचे फुटेजही स्क्रीनवर दाखवण्यात आले. लोकांचा प्रतिसाद उत्तम होता. काॅ. पानसरे यांचे व्याख्यान खणखणीत झाले. २००८मध्ये नािशक िजल्ह्यातील मालेगाव येथे झालेल्या बाॅम्बस्फोटात अभिनव भारत संघटना कशी गुंतली होती, त्याचा मी सविस्तर खुलासा केला. त्या िदवशी 'हू िकल्ड करकरे?' आिण '२६/११ प्रोब, व्हाय ज्युडिशियरी अल्सो फेल्ड?' या माझ्या दोन्ही पुस्तकांची धडाक्यात िवक्री झाली. त्या िदवशी काही गोपनीय दस्तऐवजांच्या झेराॅक्स आम्ही िवक्रीस ठेवल्या होत्या. काय होत्या त्या? Àपानपाहा | ||||
एक म्हणजे, मालेगाव बाॅम्बस्फोटप्रकरणी एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी अिभनव भारत, अखिल भारतीय िवद्यार्थी परिषदेच्या आठ कार्यकर्त्यांवर दाखल केलेले चार्जशीट. दुसरे म्हणजे, फरिदाबाद येथे झालेल्या अभिनव भारत संघटनेच्या बैठकीचा वृत्तांत ज्यामध्ये बाॅम्बस्फोट कटाची माहिती होती. तिसरे म्हणजे, मुंबईवरील २६/११ हल्ल्याची 'आयबी'(गुप्तचर िवभाग)ला कशी माहिती होती, त्याबाबत केंद्राने नेमलेल्या समितीच्या िरपोर्टबाबतच्या बातम्यांची कात्रणे होती. ही सारी कात्रणं जमलेल्या श्रोत्यांनी विकत घेतली. काॅ. पानसरे यांना कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल हायसे वाटले. त्यानंतर असाच कार्यक्रम पुण्यात राष्ट्र सेवादलाच्या मंडळींनी ठेवला होता. १२ जानेवारी रोजी तो होणार होता. कार्यक्रम पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. चार िदवसांवर कार्यक्रम असताना अचानक निरोप आला, महत्त्वाच्या बैठकीमुळे १२ जानेवारीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. नंतरची तारीख तुम्हाला कळवण्यात येईल. १४ जानेवारीला मला काॅ. पानसरे यांचा फोन आला, पुण्याचा कार्यक्रम कसा झाला म्हणून. मी म्हणालो, कार्यक्रम ऐन वेळी रद्द केला. त्यांनी ओळखले. ते म्हणाले, समाजवाद्यांनी ऐन वेळी कच खाल्ली म्हणायची. पुण्याचा कार्यक्रम रद्द झाल्याचे काॅ. पानसरे यांच्या मनास फार लागले. नंतर त्यांनी मला फोन केला. म्हणाले, 'मुश्रीफ, काळजी करू नका. मी एक कार्यक्रमच आखलाय. भगव्या दहशतवादावर आता राज्यभर मी दीडशे व्याख्याने देण्याचे ठरवले आहे. भाकप या आमच्या पार्टीलाही तसे सांिगतले आहेच, पण पार्टी बैठकीत तसा ठरावसुद्धा मंजूर करून घेतला आहे.' त्यांच्या दीडशे व्याखानांपैकी अद्याप एकही झालेले नव्हते, तोवरच त्यांच्यावर गोळीबार झाल्याची बातमी ऐकावी लागली. 'हू किल्ड करकरे?'वरील परिसंवादामुळे पूर्ण डिसेंबर महिना कोल्हापुरात धुसफूस होती. वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने छापले जात होते. हे सारे 'आयबी'च्या नजरेतून कसे काय सुटले? हा पोलिस अिधकारी म्हणून मला पडलेला प्रश्न आहे. पोलिस खात्यातील प्रदीर्घ अनुभवामुळे माझा असा ठाम दावा आहे की, 'आयबी'ला काॅ. पानसरे यांच्या जिवाला धोका असल्याची चांगलीच कल्पना असावी. त्यांनी तसे राज्याच्या गृह विभागाला नक्कीच कळवलेसुद्धा असणार. जर कळवले नसेल, तर का कळवले नाही, हे जनतेला कळायला हवे. कळवले असेल, तर त्यावर काहीच उपाययोजना का झाली नाही, हेसुद्धा पुढे यायला हवे. मुंबईवरील २६/११ हल्ल्याची 'आयबी'ला कल्पना होती. नुसती कल्पना नव्हती, तर अतिरेक्यांच्या प्रत्येक टप्प्याची माहिती होती. एवढा पाॅवरफुल गुप्तचर विभाग डाॅ. दाभोलकर आिण काॅ. पानसरेप्रकरणी इतका हतबल का झाला? आयबी आिण हिंदुत्ववादी संघटना यांची कशी िमलीभगत आहे, यािवषयी मी अनेकदा बोललो आहे. तोच धागा मला काॅ. पानसरेप्रकरणी िदसतो आहे. काॅ. पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारीला हल्ला झाला. त्याच िदवशी भाकपच्या िदल्ली कार्यालयाने प्रेसनोट काढली आहे. त्यातही हिंदुत्ववादी शक्तींवरच संशय व्यक्त झालेला िदसतो. कॉ. पानसरे वाचले असते, तर मारेकरी कळले असते. खरं तर काॅ. पानसरे यांची हत्या हा एका व्यापक राजकीय कटाचा भाग आहे. त्यांच्या हत्येचा संबंध कोल्हापूरच्या टोल आंदोलनाशी जोडणे हा मला बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न वाटतो. त्यापेक्षा 'िशवाजी कोण होता?' या विषयावरची त्यांची व्याख्याने आिण 'अभिनव भारत' या संघटनांचे कारनामे उघड करण्यासंदर्भात त्यांनी केलेला दीडशे व्याख्यानांचा 'संकल्प' या मुद्द्यांभोवती तपास का केंद्रित केला जात नाही? हा या क्षणी मला पडलेला प्रश्न आहे. शब्दांकन- अशोक अडसूळ दिव्यमराठीच्या सप्तरंग पुरवणीच्या दिनांक ०१/०३/२०१५ च्या अन्हातिल लेख | ||||
मी माझ्या (महापालिका व विद्यापीठ) असलेल्या (आठ लाख लोकसंख्या असलेल्या) अमरावती शहरात सर्वत्र गेली २५ वर्षांपासून सर्वांशी ( हो सर्वांशी ) फक्त मराठीतच बोलतो. .........तुम्ही ?आणि हो मला हिंदी समजत नाही किंवा मला हिंदी बोलत येत नाही हे सांगायला जी हिम्मत लागते ती तुमच्याकडे आहेना ? तर मग तुम्ही खरे मराठी आहात
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)

