शुक्रवार, १६ जानेवारी, २०१५

कॉंग्रेसला अडचणीत आणणाऱ्या सर्वांना जहागिऱ्या मिळाल्या आहेत. 

मनमोहनसिंग हे अर्थतज्ञ म्हणून देशाला आर्थिक दुरावस्थेतून बाहेर काढण्याकरिता नरसिंहराव मंत्रिमंडळात घेतले गेले होते. मणिशंकर हे परराष्ट्र खात्यात होते. तर शशी थरूर हे युनोत अंडर सेक्रेटरी होते व  युनोच्या महासचिव पदाची निवडणूकही त्यांनी लढविली होती.  यापैकी कुणीही नोकरीत असतांना भाजपाची प्रतिमा डागाळण्याचा उद्योग केला नाही. याउलट व्ही. के. सिंग , किरण बेदी व अन्य बऱ्याच मंडळींनी अण्णाच्या बुरख्याखाली  युपीए सरकारवर ताशेर ओढले. ही मंडळी भ्रष्ट्राचाराच्या विरोधात नव्हती हे स्पष्ट झाले. सत्यपालसिंगांनी नोकरीत असतांना आघाडी सरकार अडचणीत येईल यासाठी काय उद्योग केले याच्या सुरस कथा यथासमय बाहेर येतीलच. आघाडी सरकारच्या काळात एक माजी पोलिस महासंचालक (ते महाराष्ट पोलिस दलाचे प्रमुख होऊ शकले नाहीत) निवृत्त झाल्यानंतर व्रुत्तवाहिन्यावरिल चर्चासत्रात कोट टाय घालून उपस्थित राहायचे व आघाडी सरकारवर कोरडे ओढायचे. आता मुख्यमंत्र्याच्या घराजवळ दोन खून झाले त्यावर मात्र त्यांची काही प्रतिक्रिया नाही.
सह्याद्री वाहिनीवर (किंवा एकूणच दूरदर्शन मध्ये) वाजपेयींच्या काळात मोक्याच्या जागांवर " आपली " माणसे नेमल्या गेली. युपीए सरकार आल्यावर या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्या गेले. त्यामुळे विरोधी पक्ष सरकारवर काय आरोप करतो एव्हढेच सह्याद्रीवरून बातम्यांमध्ये दाखवले जायचे. त्यावर मंत्र्यांचे स्पष्टीकरण काय हे कधीच दाखवले गेले नाही. हा सर्व प्रकार पत्रकारितेच्या नियमाविरुद्ध होता. सह्याद्रीवरून " ऐका हो ऐका " हा सरकारचे वाभाडे करणारा कार्यक्रम बऱ्याच वर्षांपासून प्रकाशित होतो. मात्र १९९५ ते २००० या काळात युतीचे सरकार असतांना हा कार्यक्रम बंद होता. २०० साली पुन्हा सुरु झाला. आता पुन्हा बंद होईल किंवा बंद झालाही असेल. तेंव्हा उघडा डोळे पहा नीट.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: