शुक्रवार, ३१ जुलै, २०१५

तामिळनाडू मध्ये तामीळ न समजत/ न बोलता येता तुम्ही प्रदीर्घ काळ राहू शकत नाही किंवा तेथे तुम्ही स्थाईक होऊ शकत नाही. (आय टी वाले व हाय प्रोफ़ाइल मंडळी सोडून, कारण त्यांचा स्थानिक मंडळीशी फारसा संबंध येत नाही). दक्षिणेतील ईतर राज्ये, पश्चिम बंगाल व ईशान्येकडील  राज्ये (ओडिशा सुद्धा) येथे सुद्धा हीच परिस्थिती आहे. अगदी आपला 'सख्खा' शेजारी असलेल्या गुजरातमध्येही हिंदीवर काम भागवून घेऊ असा विचार करत असाल तर तो तुमचा गैरसमज आहे . फक्त महाराष्ट्रातच मराठी न समजता/ न बोलता येता पिढ्यांपिढ्या राहता येते.  जय महाराष्ट्र.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: