|
क्रांतिकारक भगतसिंग यांच्यासोबत शहीद
झालेले सुखदेव यांना सारा देश ओळखत असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मात्र त्यांना ओळखत नाहीत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भगतसिंग
यांच्याच छायाचित्राखाली सुखदेव असे नाव चिकटवलेल्या प्रतिमेला बुधवारी
मुख्यमंत्र्यांनी आदरांजली वाहिली. तसेच या प्रतिमांसाेबत छायाचित्रेही
काढू घेतली. दरम्यान, चूक लक्षात अाल्याने अडचणीत अालेल्या
मुख्यमंत्र्यांनी नंतर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची घोषणा करून या
वादातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला.(सविस्तर बातमी आजच्या दिव्यमराठीमध्ये पान पाचवर) |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा