भारतात दुसरा 'रामशास्त्री' केंव्हा जन्म घेणार ? .........
"दिग्गज खेळाडू किंवा सेलिब्रिटीज यांना अशी शिक्षा झाल्याची अनेक उदाहरणे
विविध देशांमध्ये आहेत; पण भारतात मात्र याबाबत उलट स्थिती आहे. मेस्सीची
करचुकवेगिरीच्या आरोपातून सुटका झाली नाही; पण भारतात मात्र कर चुकवून
फेरारी कार देशात आणल्यानंतर त्याला कर सवलत देण्यासाठी त्या वेळच्या भाजप
सरकारच्या नेत्यांना घाई झाली होती. प्रिस्टोरियसने खून केल्यानंतर जवळपास
साडेतीन वर्षांनीच त्याला सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली. भारतात
मात्र असले खटले वर्षानुवर्षे चालतात. २००२ मध्ये हिट अँड रन खटल्यात आरोपी
असलेल्या सलमान खानची अजून सुनावणी चालूच आहे. करचुकवेगिरीचे आरोप असलेली
अनेक बडी मंडळी देशात आहेत; परंतु ते कधी तुरुंगात गेल्याचे दिसत नाही.
त्यांच्यावरील खटल्यांचा निकाल न्यायालयात लवकर लागत नाही. कधी कधी
न्यायालयदेखील अशा लोकांसाठी विशेष सौम्यभाव स्वीकारते की काय, ते सलमान
वरच्या खटल्याच्या सुनावणीतून वाटते. लोकशाहीमध्ये सर्व माणसे समान असतात;
पण काही माणसे अिधक समान असतात, असे म्हटले जाते. याचा पुरेपूर अनुभव
भारतात पदोपदी येतो. सलमानला जसा खटला लांबवता आला तसा एखाद्या सामान्य
माणसाला तो कधीच लांबवता येणार नाही. त्यामुळे परदेशात दिसणारी
न्यायनिष्ठूरता ही भारतात कधी दिसेल हे कोणीही सांगू शकणार नाही, हेही
तितकेच खरे."(दिव्यमराठीच्या आजच्या अग्रलेखातून)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा