राजा शुद्धोदनाने जी चूक केली तीच तुम्ही करताय. गौतमापासून त्याने मृत्यू, वार्धक्य, आजारपण लपवून ठेवलं आणि अचानक ह्या गोष्टी माहित झाल्यावर गौतमाला धक्का बसून तो सैरभैर झाला. मुलाने पुढे जातीभेद पाळू नये म्हणून त्याला आपली जातच न सांगणे हा उपाय नव्हे. उलट हा सर्व प्रकार त्याला व्यवस्थित समजाउन सांगून त्याचे प्रबोधन करणे हाच खरा उपाय आहे. त्याला जातीभेद मानायला किंवा न मानायला शिकवू नका. जातीभेद काय आहे हे जाणून घ्यायला शिकवा. जातीभेद मानू नको हे सांगणारे तुम्ही एकटेच असाल. पण घराबाहेर पडल्यावर जातिभेद मानलाच पाहिजे हे शिकविणारे त्याला शंभर भेटतील. तेंव्हा …….
बुधवार, ६ मे, २०१५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा