नाटक/चित्रपटातील एखाद्या पात्राची जात कोणती दाखवावी, ….……
कोणते पात्र चुणचुणीत (स्मार्ट) दाखवावे व कोणते पात्र येरेगबाळे याचे लेखक/दिग्दर्शकाला पूर्ण स्वातंत्र्य असते. अर्थात बहुतेक लेखक/दिग्दर्शक याचा तारतम्याने वापर करतात व विषयाची हाताळणी अशी करतात की कुणाला ते बोचू नये. संजय खान या हिंदीतील नट/निर्माता/दिग्दर्शक असणाऱ्या गृहस्थाने टिपू सुलतान ही मालिका बनवली होती. त्यात बहुतेक हिंदू राजे/संस्थानिक हे अक्कलशून्य असल्याचे दाखविले होते. संजय खान यानेच आणखी एक मालिका बनविली होती, 'द ग्रेट मराठा'. मालिका प्रदर्शित होण्यापूर्वी असे वाटले होते की ती बहुधा शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असेल. मात्र मालिका सदाशिवभाऊ पेशवे यांच्या जीवनावर आधारित होती. बर याचा जाब विचारायचीही सोय नाही. उलट असा सवाल तोंडावर फेकला गेला असता की, "सदाशिवभाऊ ग्रेट नव्हते काय ?". शेवटी लेखक/दिग्दर्शकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचे हेच खरे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा