गुजरातमध्ये आबादीआबाद , गुरे मात्र महाराष्ट्रात ………………
गुजरातमध्ये सर्वत्र आबादीआबाद असल्याचे ढोल बडविल्या जात असतात . मोदींच्या भाषणातूनही गुजरातच्या समृद्धीचे पोवाडे गायल्या जात असतात. मात्र दरवर्षी गुजरातमधील काठेवाडी मंडळी आपली गुरे ढोरे घेऊन विदर्भात येत असतात. त्यांचे गुरांचे हे कळप विदर्भातील शेतीची नासधूस तर करत असतात शिवाय विदर्भातील राखीव जंगलेही फस्त करत असतात. शेतात गुरे चारल्याबद्दल शेतकरी व काठेवाडी यांच्या मध्ये बर्याच ठिकाणी संघर्ष उदभवून कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्नही निर्माण झालेले आहेत. काठेवाडींची दादागीरीही बऱ्याच ठिकाणी पहावयास मिळते. अमरावती जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये काठेवाडींना प्रवेशबंदी घातल्या गेली आहे. ही काठेवाडी काही ठिकाणी कायमची स्थायिक झाली असून त्यांची नावे मतदार यादीत आली आहेत. त्यामुळे त्यांना नाराज करण्याचे धार्ष्ट्य स्थानिक पुढारी दाखवू शकत नाहीत. आणि यांचा पशुपालनाचा व्यवसाय विदर्भातील जंगलांच्या भरवश्यावर सुखाने चालू आहे. गुजरात मध्ये एवढी समृद्धी असतांना या काठेवाडींना विदर्भात का यावे लागते. मोदींना विनंती की कृपया त्यांच्या मंडळींना सन्मानाने गुजरात मध्ये घेऊन जावे कारण त्यांच्यामुळे गुजरातच्या समृद्धीची खिल्ली उडविल्या जात आहे.
राजेंद्र कडू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा