हे फक्त महाराष्ट्रातच घडू शकते.
नुकत्याच कॉंग्रेसच्या मेळाव्यात एका अतीउत्साही कार्यकर्त्याने हवेत चाकू फिरवून आपला आनंद व्यक्त केला. अमरावती पोलिसांनी तत्परेतेने त्या युवकास अटक करून कोर्टासमोर हजार केले. असे फक्त महाराष्ट्रातच घडू शकते. आपण पाहतो की उत्तर प्रदेश, बिहारमध्ये आनंद किंवा जल्लोष व्यक्त करावयाचा असला की उत्साही कार्यकर्ते हवेत गोळीबार करतात. मिरवणूक काढायची असली की त्यातसुद्धा हवेत बन्दुकीच्या फैरी झाडल्या पाहिजेत असा जणू अलिखित नियमच असतो. यात आनंद प्रदर्शन करायाचे असते की जन सामान्यांवर दहशत बसावी हा उद्देश असतो हे ते कार्यकर्तेच जाणो. महाराष्ट्रात मात्र हा प्रकार खपवून घेतल्या जाणार नाही हे अमरावती पोलिसांनी दखावुन दिले आहे. केवळ फटाके फोडून आनंद व्यक्त करण्याची मुभाच आमचेकडे आहे.
महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था चांगली असल्यामुळे परप्रान्तीयांनासुद्धा या गोष्टीचे आकर्षण आहे व रोजगारासाठी स्थलांतर करतांना महाराष्ट्राला प्राधान्य देण्यात येते. त्यामुळे परप्रांतीयांचे लोंढे महाराष्ट्रात येत असतात. भारतात जरी लोकशाही असली तरी काही प्रांतांमध्ये अजूनही सरंजामशाही अस्तित्वात आहे. भारतीयांचा जसा अमेरिकेकडे ओढा आहे, तसाच इतर प्रांतातील लोकांना महाराष्ट्रातील खुल्या वातावरणाची ओढ आहे. यामुळे सोयीसुविधांवर ताण पडतो. परंतु इतरांनी इकडे येऊ नये म्हणून येथे "जंगल राज" निर्माण होऊ द्यावे असे म्हणता येणार नाही. अमरावती पोलिसांचे अभिनन्दन.
राजेंद्र कडू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा