शनिवार, १ मार्च, २०१४

ब्रिटनमधील इमारतीवर  'स्वस्तिक' कोरल्याने वाद…………… 

लोकसत्ता दिनांक ०१/०३/२०१४ च्या अंकात विविधा या पृष्ठावर प्रसिध्द झालेली बातमी 

 स्वस्तिक हे चिन्ह हिंदू धर्मीयांमध्ये शुभ मानले जाते. मात्र जर्मनीचा हुकूमशहा हिटलरच्या 'नाझीड' संघटनेने या चिन्हाचा वापर केल्याने युरोपमधील बहुतेक देशांमध्ये या चिन्हाकडे वाईट नजरेनेच पाहिले जाते. लंडनमधील एका इमारतीच्या भिंतीवर स्वस्तिक चिन्ह कोरल्याने वाद निर्माण झाला आहे. स्वस्तिक हे शांततेचे चिन्ह असून हिटलरने स्वार्थी हेतूने या चिन्हाचा गैरवापर केला, असे तेथील हिंदू धर्मीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे या इमारतीवरील हे चिन्ह काढून टाकण्यात यावे, असे त्यांचे म्हणणे आहे.
एसेक्समधील 'चेल्म्सफोर्ड कंट्री हॉल' या इमारतीवर हे चिन्ह कोरण्यात आले आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वीची ही इमारत असून त्यावर स्वस्तिक चिन्ह कोरलेले होते. मात्र या परिसरातील हिंदू धर्मीयांनी तीव्र नाराजी व्यक्त करून हे चिन्ह काढून टाकण्याची मागणी केली. ''हिटलरने स्वस्तिक या चिन्हाचा गैरवापर केला. नाझी संघटनेचे हे मूळ चिन्ह नाही. त्यामुळे या चिन्हाचा वापर हिटलरचा इतिहास जागवण्यासाठी करू नये. ते शांततेचे प्रतीक असल्याने या इमारतीवरील हे चिन्ह तात्काळ हटवण्यात यावे,'' अशी मागणी हिंदू धर्मीयांनी केली आहे.
स्वस्तिक हे शुभ चिन्ह असून, बुद्धिमत्ता आणि शांततेचे प्रतीक आहे. 'नाझी' संघटनेने स्वार्थी हेतूने या चिन्हाचा गैरवापर केला. त्यामुळे हिटलरशाहीचा इतिहास जागवण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जाऊ नये. त्याला हिंदू धर्मीयांचा कायम विरोध राहील.
- अनिल भानोत, संचालक, इंग्लंडमधील हिंदू आयोग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: