मंगळवार, १८ मार्च, २०१४

केजरीवाल, मोदी आणि मिडिया  

 मोदींना गुजरातेतून दिल्लीत आणून स्थिरस्थावर करण्यात आणि त्यांना देशव्यापी लोकप्रियता मिळवून देण्यात मीडियाचा कमालीचा हात आहे. गंमत अशी की, एकेकाळी सरकारी दूरदर्शनवरून काँग्रेसच्या नेत्यांच्याच छब्या तिन्हीत्रिकाळ दिसत. आपल्यातले सुजाण बुद्धिजीवी त्याला नाके मुरडत. आता खासगी वाहिन्यांची भरमार झाली म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्याचा कळस गाठला गेला, असे कोणाला वाटेल. पण प्रत्यक्षात अजूनही सर्व वाहिन्यांवरून चोवीस तास कोण्या एकाचीच छबी सदैव दिसत राहते.
सध्या तो मान मोदींचा आहे. सतत असे ज्याचे छबीदर्शन घडवायचे, त्याची सदैव केवळ तारीफच होत राहील हे पाहायचे, असे तंत्रही या नव्या मीडियाने विकसित केले आहे. त्यामुळे रामलीला मैदानातील आंदोलनामुळे दिल्लीतील वाहतुकीची कोंडी किंवा लोकांची गैरसोय होत असेल तरी तिच्या बातम्या करायच्या नाहीत, असे मीडिया ठरवून टाकतो. मध्यंतरी मोदी मुंबईत आले असताना विमानतळाजवळ संध्याकाळच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली. पण त्याविषयी एकही बातमी कोणी दिली नाही. सध्या मोदींच्या विरोधातल्या बातम्यांना मीडियात थारा मिळू द्यायचा नाही, असे खरोखरच धोरण ठरले आहे की काय, असा संशय त्यामुळे तयार होतो. ( राजेंद्र साठे यांचा संपूर्ण लेख दिव्य मराठीच्या दिनांक १७/०३/२०१४ च्या अंकात वाचता येईल. संकेत स्थळ www.epaperdivyamarathi.bhaskar.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: