या शहिदांच्या विधवा माफ करतील काय ?
नमो आपल्या निवडणूक भाषणात आवर्जून शहिदांच्या विधवांचा उल्लेख करत असतात. अर्थात शहीद म्हणजे जे सैनिक कॉंग्रेसच्या कार्यकाळात जे जवान शहीद झाले ते. सर्व सामान्य जनतेची स्मृती अल्प असते. मला मात्र १९९९ चा घटनाक्रम चांगलाच आठवतो.
२४ डिसेंबरला काठमांडू विमानतळावरून उडालेले इंडिअन एअर लाईन्स चे विमान अपहरण करून काबूलला नेण्यात आले होते. प्रवाशांच्या सुटकेसाठी अतिरेक्यांनी भारताच्या तुरुंगात असलेल्या तीन अतिरेक्यांना सोडण्याची मागणी केली. प्रवाश्यांच्या नातेवाईकांनी दिल्लीत निदर्शने करून अतिरेक्यांना सोडून देऊन त्यांच्या नातेवाईकांना सोडवून आणण्याची मागणी केली.
२४ डिसेंबरला काठमांडू विमानतळावरून उडालेले इंडिअन एअर लाईन्स चे विमान अपहरण करून काबूलला नेण्यात आले होते. प्रवाशांच्या सुटकेसाठी अतिरेक्यांनी भारताच्या तुरुंगात असलेल्या तीन अतिरेक्यांना सोडण्याची मागणी केली. प्रवाश्यांच्या नातेवाईकांनी दिल्लीत निदर्शने करून अतिरेक्यांना सोडून देऊन त्यांच्या नातेवाईकांना सोडवून आणण्याची मागणी केली.
मात्र याला प्रत्युत्तर म्हणून अतिरेक्यांना पकडतांना शहीद झालेल्या जवानांच्या विधवांनी सुद्धा दिल्लीत निदर्शने केली व आमच्या नवऱ्यांनी अतिरेक्यांना पकडतांना आपले प्राण गमावले आहेत त्यामुळे अतिरेक्यांना मुळीच सोडू नये, असे करणे म्हणजे त्यांच्या हौतात्म्याचा अपमान होईल अशी मागणी केली.
तरीही तेंव्हाच्या भाजप सरकारने तीन अतिरेक्यांना सोडले व सन्मानपूर्वक काबूलला पोहोचवून दिले. प्रवाश्यांचे प्राण वाचविण्यासाठी वाजपेयी सरकारने शहिदांच्या विधवांची मागणी फेटाळून लावली.
२००४ साली झालेल्या निवडणुकींच्या प्रचारामध्ये कॉंग्रेस पक्षाने कुठेही "शहिदांच्या विधवा तुम्हाला माफ करणार नाहीत असे म्हटले नाही ". कारण अशा गोष्टींचे भांडवल करायचे नसते एवढा विवेक कॉंग्रेस पक्षाजवळ शाबूत आहे असे दिसते. नमोला मात्र कुठल्याही गोष्टीचा विवेक बाळगायचे कारण नाही. पंतप्रधानपदाची खुर्ची त्यांना अहोरात्र खुणावत आहे.
त्यानंतर वाजपेयींच्याच कारकिर्दीत२००१ साली १७ एप्रिल रोजी बांगला देश सैनिकांनी आमच्या १६ जवानांचे अपहरण करून त्यांना हालहाल करून ठार मारले. आणि परत वाजपेयींच्याच कारकिर्दीत २००१ साली अतिरेक्यांनी १७ डिसेंबर रोजी देशाचा मानबिंदू असलेल्या संसदेवर हल्ला केला (त्यात आमचे ६ जवान शहीद झाले. ) त्याचेही कॉंग्रेस पक्षाने निवडणूक प्रचारात भांडवल केले नाही. कारण कॉंग्रेसने निवडणुका जिंकण्यासाठी देशाचा एकोपा पणाला लावावा असा विचार केलेला दिसत नाही.
नमो मात्र सर्रास शहीद आणि त्यांच्या विधवांना राजकारणात ओढताहेत. भाजपमधील जेष्ठ मंडळी अडगळीत पडली आहे व नमोच्या बेफाम वागण्याला लगाम घालणारा कुणी उरला नाही त्यामुळे नमोचा वारू चौखूर उधळतो आहे.
राजेंद्र कडू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा