फ्रांसमध्ये जाणारे फ्रेंच शिकून जातात काय ? कारण जगातील फक्त अर्धा डझन देशांमध्येच ईंग्रजी बोलली जाते. तामिळनाडूमध्ये जाणारे तामिळ शिकून जातात काय ? आमचे पूर्वज हजारो वर्षांपासून जगन्नाथ पुरी (ओडिशा), रामेश्वरम (तामिळनाडू), द्वारका (गुजरात), बद्री-केदारनाथ येथे तीर्थयात्रेला जात होते ते काय ते त्या त्या प्रांताची भाषा शिकून ? ज्याला परप्रांतात/विदेशात जायचे आहे तो त्याचे पाहून घेईन. त्यासाठी राष्ट्रभाषेची मुळीच गरज नाही. आमची मुले चेन्नई, हैदराबाद, बंगलोर येथे गेली कित्येक वर्षांपासून नोकऱ्या करताहेत. या प्रांतात हिंदी अभावानेच बोलली जाते. तरीही आमच्या मुलांचे काहीही अडले नाही. दोन वेगवेगळ्या प्रांतातील लोक भेटल्यावर हिंदी बोलतही असतील. प्रश्न महाराष्ट्रात जे दहा पिढ्यांपासून राहतात त्यांचा आहे. पाहुणा दोन दिवसाचा असतो. दहा पिढ्यापासून राहणारा पाहुणा नसतो. दोन दिवसाचा पाहुणा असला तर भरपूर पाहुणचार केला जातो. पाहुणा महिनाभर राहिला तर कुणी जेवायलाही विचारणार नाही. कायमच्या पाहुण्याची सोय पाहण्याची गरज नाही.
शनिवार, २९ ऑगस्ट, २०१५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा