मी आणि काॅ. गोविंद पानसरे दोघेही कोल्हापूरचे; पण आमची तशी खास मैत्री
नव्हती. आमच्या दोघांचे एक काॅमन मित्र होते. ते म्हणजे, िनवृत्त
न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील. काॅ. पानसरे यांनी कोळसे-पाटील
यांच्याकडे एकदा निवृत्त पोलिस अिधकारी डॉ. धनराज वंजारी यांच्या पुस्तकाचा
िवषय काढला. त्यावर कोळसे-पाटील यांनी त्यांना 'हू िकल्ड करकरे?' हे माझे
पुस्तकही अवश्य वाचा, असे सांिगतले.
"हू िकल्ड करकरे?alt39 वाचून काॅ. पानसरे यांनी मला फोन केला. २६/११ हल्ल्याची अंधारी बाजू उजेडात आणल्याबद्दल धन्यवादही िदले. पुढे आमचा परिचय वाढत गेला. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा फोन आला. म्हणाले, 'हू िकल्ड करकरे? या तुमच्या पुस्तकावर आपल्याला एक कार्यक्रम ठेवायचा आहे.' ३० िडसेंबर तारीख मुक्रर झाली. कार्यक्रमाचे ठिकाण ठरले, दसरा चौकातले शाहू स्मारक. काॅ. पानसरे यांच्या कामाची पद्धत नियोजनबद्ध होती. आमच्या परिसंवादाची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. वर्तमानपत्रांत तशा बातम्या आल्या. कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आमदार आहेत, िशवसेनेचे राजेश क्षीरसागर. त्यांनी या कार्यक्रमाविरुद्ध दंड थोपटले. परिसंवाद उधळवून लावण्याचा इशारा िदला. पण, काॅ. पानसरे काही बधले नाहीत. कार्यक्रमाला दोन िदवस िशल्लक होते. परत हिंदुत्ववादी संघटनांनी उचल खाल्ली. या परिसंवादाला परवानगी देऊ नका, अशी या संघटनांनी मागणी केली. पोलिस म्हणाले, परवानगी आम्ही नाकारू शकत नाही. कारण 'हू किल्ड करकरे?' पुस्तकावर बंदी नाही. शेवटी, संपूर्ण कार्यक्रमाचे िव्हडिओ रेकाॅर्डिंग करायची अट घालण्यात आली. शाहू स्मारकात कार्यक्रमादिवशी तोबा गर्दी उसळली. बाहेर दोनशे खुर्च्या आिण दोन स्क्रीन लावावे लागले. २६/११च्या मुंबई हल्ल्याची मी माझी थेअरी सांगितली. न्यूज चॅनेलचे फुटेजही स्क्रीनवर दाखवण्यात आले. लोकांचा प्रतिसाद उत्तम होता. काॅ. पानसरे यांचे व्याख्यान खणखणीत झाले. २००८मध्ये नािशक िजल्ह्यातील मालेगाव येथे झालेल्या बाॅम्बस्फोटात अभिनव भारत संघटना कशी गुंतली होती, त्याचा मी सविस्तर खुलासा केला. त्या िदवशी 'हू िकल्ड करकरे?' आिण '२६/११ प्रोब, व्हाय ज्युडिशियरी अल्सो फेल्ड?' या माझ्या दोन्ही पुस्तकांची धडाक्यात िवक्री झाली. त्या िदवशी काही गोपनीय दस्तऐवजांच्या झेराॅक्स आम्ही िवक्रीस ठेवल्या होत्या. काय होत्या त्या? Àपानपाहा | ||||
एक म्हणजे, मालेगाव बाॅम्बस्फोटप्रकरणी एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी अिभनव भारत, अखिल भारतीय िवद्यार्थी परिषदेच्या आठ कार्यकर्त्यांवर दाखल केलेले चार्जशीट. दुसरे म्हणजे, फरिदाबाद येथे झालेल्या अभिनव भारत संघटनेच्या बैठकीचा वृत्तांत ज्यामध्ये बाॅम्बस्फोट कटाची माहिती होती. तिसरे म्हणजे, मुंबईवरील २६/११ हल्ल्याची 'आयबी'(गुप्तचर िवभाग)ला कशी माहिती होती, त्याबाबत केंद्राने नेमलेल्या समितीच्या िरपोर्टबाबतच्या बातम्यांची कात्रणे होती. ही सारी कात्रणं जमलेल्या श्रोत्यांनी विकत घेतली. काॅ. पानसरे यांना कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल हायसे वाटले. त्यानंतर असाच कार्यक्रम पुण्यात राष्ट्र सेवादलाच्या मंडळींनी ठेवला होता. १२ जानेवारी रोजी तो होणार होता. कार्यक्रम पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. चार िदवसांवर कार्यक्रम असताना अचानक निरोप आला, महत्त्वाच्या बैठकीमुळे १२ जानेवारीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. नंतरची तारीख तुम्हाला कळवण्यात येईल. १४ जानेवारीला मला काॅ. पानसरे यांचा फोन आला, पुण्याचा कार्यक्रम कसा झाला म्हणून. मी म्हणालो, कार्यक्रम ऐन वेळी रद्द केला. त्यांनी ओळखले. ते म्हणाले, समाजवाद्यांनी ऐन वेळी कच खाल्ली म्हणायची. पुण्याचा कार्यक्रम रद्द झाल्याचे काॅ. पानसरे यांच्या मनास फार लागले. नंतर त्यांनी मला फोन केला. म्हणाले, 'मुश्रीफ, काळजी करू नका. मी एक कार्यक्रमच आखलाय. भगव्या दहशतवादावर आता राज्यभर मी दीडशे व्याख्याने देण्याचे ठरवले आहे. भाकप या आमच्या पार्टीलाही तसे सांिगतले आहेच, पण पार्टी बैठकीत तसा ठरावसुद्धा मंजूर करून घेतला आहे.' त्यांच्या दीडशे व्याखानांपैकी अद्याप एकही झालेले नव्हते, तोवरच त्यांच्यावर गोळीबार झाल्याची बातमी ऐकावी लागली. 'हू किल्ड करकरे?'वरील परिसंवादामुळे पूर्ण डिसेंबर महिना कोल्हापुरात धुसफूस होती. वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने छापले जात होते. हे सारे 'आयबी'च्या नजरेतून कसे काय सुटले? हा पोलिस अिधकारी म्हणून मला पडलेला प्रश्न आहे. पोलिस खात्यातील प्रदीर्घ अनुभवामुळे माझा असा ठाम दावा आहे की, 'आयबी'ला काॅ. पानसरे यांच्या जिवाला धोका असल्याची चांगलीच कल्पना असावी. त्यांनी तसे राज्याच्या गृह विभागाला नक्कीच कळवलेसुद्धा असणार. जर कळवले नसेल, तर का कळवले नाही, हे जनतेला कळायला हवे. कळवले असेल, तर त्यावर काहीच उपाययोजना का झाली नाही, हेसुद्धा पुढे यायला हवे. मुंबईवरील २६/११ हल्ल्याची 'आयबी'ला कल्पना होती. नुसती कल्पना नव्हती, तर अतिरेक्यांच्या प्रत्येक टप्प्याची माहिती होती. एवढा पाॅवरफुल गुप्तचर विभाग डाॅ. दाभोलकर आिण काॅ. पानसरेप्रकरणी इतका हतबल का झाला? आयबी आिण हिंदुत्ववादी संघटना यांची कशी िमलीभगत आहे, यािवषयी मी अनेकदा बोललो आहे. तोच धागा मला काॅ. पानसरेप्रकरणी िदसतो आहे. काॅ. पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारीला हल्ला झाला. त्याच िदवशी भाकपच्या िदल्ली कार्यालयाने प्रेसनोट काढली आहे. त्यातही हिंदुत्ववादी शक्तींवरच संशय व्यक्त झालेला िदसतो. कॉ. पानसरे वाचले असते, तर मारेकरी कळले असते. खरं तर काॅ. पानसरे यांची हत्या हा एका व्यापक राजकीय कटाचा भाग आहे. त्यांच्या हत्येचा संबंध कोल्हापूरच्या टोल आंदोलनाशी जोडणे हा मला बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न वाटतो. त्यापेक्षा 'िशवाजी कोण होता?' या विषयावरची त्यांची व्याख्याने आिण 'अभिनव भारत' या संघटनांचे कारनामे उघड करण्यासंदर्भात त्यांनी केलेला दीडशे व्याख्यानांचा 'संकल्प' या मुद्द्यांभोवती तपास का केंद्रित केला जात नाही? हा या क्षणी मला पडलेला प्रश्न आहे. शब्दांकन- अशोक अडसूळ दिव्यमराठीच्या सप्तरंग पुरवणीच्या दिनांक ०१/०३/२०१५ च्या अन्हातिल लेख | ||||
रविवार, १ मार्च, २०१५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा