त्यांच्या नैतिकतेचा फुगा आधीच फुटला होता …
तेजपालप्रकरणी भाजपचे माजी
अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, तहलकाने काही
वर्षांपूर्वी जे स्टिंग ऑपरेशन करून बंगारूंनी स्वीकारलेल्या लाचेची
चित्रफीत जाहीर केली होती व आपण नतिकतेचे रखवालदार आहोत, असा दावा केला
होता तो खोटा आहे आणि ताज्या प्रकरणामुळे तेजपाल यांचा व पर्यायाने
तहलकाचासुद्धा नैतिकतेचा बुरखा फाटलेला आहे\.
मात्र बंगारू लक्ष्मण हे
विसरतात की, तहलकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशमुळे बंगारू यांना कोर्टाने चार
वर्षांची शिक्षा सुनावली व त्यांनी या शिक्षेला दिलेले आव्हान फेटाळले
गेलेले आहे. एवढेच नव्हे तर आपण वयोवृद्ध असल्यामुळे आपल्याला या शिक्षेतून
सूट मिळावी असाही अर्ज केला होता, तोही फेटाळला गेला\. म्हणजेच संरक्षण
खात्यातील काही काम मिळवून देण्यासाठी बंगारूंनी तेव्हा लाच स्वीकारली होती
यावर शिक्कामोर्तब झालेले आहे व त्यामुळे बंगारू यांचा व ते ज्या स्वच्छ
पक्षाचे अध्यक्ष होते या दोघांच्याही नैतिकतेचा बुरखा काही वर्षांपूर्वीचा
फाटला होता हे स्पष्ट आहे\.
तेजपालप्रकरणी संबंधित व्यक्तीला
कायद्यानुसार व्हायची ती शिक्षा होईलच पण त्यामुळे बंगारू व त्यांच्या
स्वच्छ पक्षाच्या फाटलेल्या नैतिकतेच्या बुरख्याला ठिगळ कसे काय लागणार
आहे\. तेजपाल दोषी म्हणजे बंगारू व त्यांचा स्वच्छ पक्ष निर्दोष असे समीकरण
मांडता येईल काय? असे असेल तर मग बीजगणितातील समीकरणाची व्याख्याच बदलावी
लगेल\.
राजेंद्र कडू , अमरावती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा