हुकुमशहीकडे वाटचाल करायची आहे ? मग संसद, निवडणूक आयोग, राज्यपाल, न्यायालये यांचा उपहास करा. कारण हुकुमाशाहांच्या मते या संस्था विकासाच्या मार्गातील अडथळे आहेत. नमोने निवडणूक आयोगाला आव्हान देऊन त्या दिशेने वाटचाल सुरु केलेली दिसते. गुजरातचे राज्यपाल त्यांच्या डोळ्यात काट्यासारखे सलत आहेत. कारण ते केंद्र सरकारने नेमलेले आहेत. मोदी सत्तेवर आल्यानंतर बहुधा राज्य सरकारेच राज्यपाल नेमायला सुरुवात करतील. मोदींना हवा असलेला लोकपाल नेमायला गुजरातचे राज्यपाल तयार नाहीत. केवढी ही राज्यपालांची मनमानी ? त्यामुळे विकास कामांना केवढा अडथळा होत आहे.
राजेंद्र कडू
राजेंद्र कडू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा