प्रकाश बुरटे
burte.burte @ gmail.com | ||
मुख्यमंत्री मोदी यांनी दंगली रोखल्या असत्या तर किमान हजारभर लोकांचे प्राण वाचले असते.
| ||
'हे येते कोठून?'
| ||
बाबरी मशिदीच्या जागी 'मंदिर वही बनायेंगे' हा नारा देऊन मशीद उद्ध्वस्त
करणे, त्यामुळे घडलेल्या दंगलींची जबाबदारी टाळणे आणि गोध्रा हत्याकांडाचा
बदला घेणार्या दंगलींना सर्मथन मिळेल अशी वक्तव्य करणे, या चुकांची भाजपने
अजूनही स्पष्ट कबुली दिलेली नाही.
| ||
घटना समितीप्रमुख डॉ. आंबेडकरांच्या स्मृतिदिनाचा मुहूर्त साधून 1992 मध्ये लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वाखाली बाबरी मशीद उद्ध्वस्त केली. या घटनेने अडवाणी 'व्यथित' झाले; परंतु सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेचे भाजपला सत्तेच्या रूपाने फळ मिळाले. अडवाणींनी मिळालेले उपपंतप्रधानपद र्शद्धेने स्वीकारले. तरुण नरेंद्र मोदींसाठी हा राजकीय धडा होता. साबरमती एक्स्प्रेसच्या एका डब्याला गुजरातेतील गोध्रा या स्थानकावर आग लावली किंवा लागली, आणि त्यात 59 कारसेवक जळून खाक झाले. मुहूर्त होता, 2002 मधील 27 फेब्रुवारीचा. गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये दंगली 'उसळल्या'. मुख्यमंत्री मोदी यांनी दंगली रोखल्या असत्या तर किमान हजारभर लोकांचे प्राण वाचले असते. मोदींच्या प्रशासकीय कौशल्याचे अनेक जण चाहते झाले असते. परंतु मोदींच्या ग्रामोफोनची पिन 'अँक्शनला रिअँक्शन असतेच असते' या न्यूटनच्या गतिविषयक नियमात अडकून राहिली. संदर्भ चुकीचा असला तरी त्यामुळे दंगलखोरांचे फावले. 'पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी राजधर्माचे पालन करण्याचा उपदेश मोदींना केला.' या दंगलींनीदेखील सत्तेचे फळ मोदींच्या उपरण्यात अलगद टाकले. गोध्राच्या निमित्ताने दंगली होऊन आता एक तप उलटले आहे. अमेरिकेतील जॉर्ज बुश युग संपले आहे. मुस्लिमांना लक्ष्य करण्याचे जागतिक वातावरण तुलनेने निवळले आहे. पंतप्रधान होण्याची स्वप्ने पडू लागल्यापासून मोदींच्या तोंडी आता विकासाची भाषा आहे, राममंदिराची नाही. हे हृदय परिवर्तन आहे का, तपासले पाहिजे. मोदींचे मतपरिवर्तन होऊ शकत नाही, काय? नथुराम गोडसेमध्ये हृदयपरिवर्तनाची आशा गांधीजी बाळगून नव्हते का? युद्धे करून साम्राज्य वाढविणार्या राजा अशोकामध्ये कलिंग युद्धानंतर नव्हते का झाले परिवर्तन? स्वत:मध्ये सुधारणा करण्याचा व्यक्तीचा हक्क कोणी कसा हिरावून घेऊ शकतो? मोदी बदलले आहेत, तर पुन:पुन्हा त्यांचा भूतकाळ का उकरून काढता? इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या शीख दंगलीत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचे चारित्र्य काय वेगळे होते? असे काही प्रo्न मोदींच्या बाजूने नक्कीच केले जाऊ शकतात. एकेक प्रo्नाचा विचार केला पाहिजे. विचारातील परिवर्तन स्पष्टपणे मांडण्याचा एक वस्तुपाठ गांधींनी घालून दिला होता. गांधींनी स्वत:च्या आयुष्याकडे सतत एक प्रयोग म्हणून तटस्थपणे पाहिले. त्यातूनच स्वत:च्या चुका आणि र्मयादा स्पष्टपणे कबूल करण्याचा अपवादात्मक पारदर्शीपणा गांधींना प्राप्त झाला असावा. गांधींची ही कृती निखळ विचारातील परिवर्तनाचे उदाहरण आहे. कधीमात्र चुकीच्या विचाराला अनुसरून गुन्हा घडतो. तेही उदाहरण पाहू या. गांधींचे विचार न पटणारी नथुराम गोडसे यांच्यासारखी अनेक मंडळी तेव्हा असतील. त्यांनी नाना मार्गांनी गांधींना विरोध करणे समजू शकते; परंतु व्यक्तीला ठार करून तिचे विचार संपविणे हे असंस्कृत वर्तन झाले. गांधी हत्या हा या प्रकारचा लोकशाहीविरोधी गुन्हा आहे. गोडसेंना फाशीची शिक्षा झाल्याने त्यांच्यात होऊ शकणार्या परिवर्तनाची शक्यता संपविली गेली. उलट, देहांताच्या शिक्षेची तरतूद रद्द करून तिच्याऐवजी जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असले पाहिजे. असहिष्णू विचारांमुळे खुनासारखा गुन्हा घडतो, तेव्हा विचारातील परिवर्तनाची स्पष्ट कबुली देऊन शिक्षेतून सुटका होण्याची अपेक्षा गैर आहे. घडल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी आणि नंतर गांधीजींप्रमाणे परिवर्तनाची स्पष्ट आणि नि:संदिग्ध कबुली द्यावी. गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलींना आवर घालण्याचे आटोकाट प्रयत्न मोदींनी केले नाहीत. उलट दंगलींचे सर्मथन होईल, अशी वक्तव्ये केली. स्वत:च्याच मंत्रिमंडळातील हिरेन पंड्या या गृहमंत्र्याचा गूढ परिस्थितीत खून झाला. डॉ. माया कोडनानी यांना 'त्यांचा राजकीय बळी दिला गेला' असे वाटले. हे लक्षात घेता मोदींच्या हातून हिंदू-मुस्लिम दुफळी माजविण्याच्या विचारांच्या आधारे कृती घडली होती, असे म्हणावे लागते. तरीही केल्या गुन्ह्याची शिक्षा भोगून चुकांची स्पष्ट कबुली देण्याचा मोदींनादेखील जरूर हक्क आहे. बाबरी मशिदीच्या जागी 'मंदिर वही बनायेंगे' हा नारा देऊन मशीद उद्ध्वस्त करणे, त्यामुळे घडलेल्या दंगलींची जबाबदारी टाळणे आणि गोध्रा हत्याकांडाचा बदला घेणार्या दंगलींना सर्मथन मिळेल अशी वक्तव्ये करणे, या चुकांची भाजपने अजूनही स्पष्ट कबुली दिलेली नाही. उलट त्यातून मिळालेल्या सत्ता उपभोगल्या आहेत. या चुकांची कबुली देत नाही, तोवर भाजप आणि मोदींच्या परिवर्तनाच्या हक्काची भाषा फसवी ठरते. कदाचित म्हणूनच मोदींच्या संदर्भातही लागू पडणारी तेंडुलकरांच्या लेखातील पुढील वाक्य मनात घर करून राहतात : 'स्वत:विषयीचा हा चिरेबंदी आत्मविश्वास, गोंधळाचे प्रo्न आणि तडजोडी आल्या की, एक साधे आणि सोपे नीतिशास्त्र लढवून सद्सद्विवेकबुद्धीची टोचणी मिटवण्याची ही विलक्षण रीत, सत्ता राबवण्यासाठी उपयोगी येणारी ही- चुकीची का असेना पण- स्वच्छ विचारपद्धती आणि रात्रीचा दिवस करण्याची अमाप एनर्जी- हे सर्व कोठून येते?' उत्तर माहीत असले तरी मोदी ते देणार नाहीत. याची कारणे सजग, सद्सद्विवेकबुद्धी जागृत असणार्या भारतीय नागरिकांनाच शोधावी लागतील. | ||
बुधवार, १४ मे, २०१४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा