दुसऱ्या सुब्रमण्यमला मोदी टाळू शकले नाहीत.
गोपाल सुब्रमणयम यांना मोदींनी सुप्रीम कोर्टाचे जज होऊ दिले नाही कारण गुजरातमध्ये उच्चपदस्थांशी संबंधित खटल्यात ते न्यायालय मित्र (अमिचूस चुरी) म्हणून काम पाहत होते. तसेच दुसरे एक अरविंद सुब्रमण्यम हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ असूनही त्यांनी मोदी सरकारच्या कामगिरीवर टीका केली म्हणून अर्थ मंत्रालयाने त्यंच्या नावाची प्रमुख आर्थिक सल्लागार पदासाठी नेमणूक करण्याची शिफारस करूनही मोदी त्यासाठी राजी नव्हते व अर्थ मंत्रालयाला आणखी काही नावे सुचविण्यास मोदींनी सांगितले होते. शेवटी अरविंद सुब्रम्ण्यम यांचे नाणे खणखणीत असल्यामुळे झक मारून त्यांच्या नावाला मोदींना संमती द्यावी लागली. आता पाहूया मोदी आणि सुब्रमणयम यांचे किती दिवस पटते ते. जेंव्हा तज्ञ मंडळी राज्यकर्त्यांना आवडत नाहीत तेंव्हा जनतेचे " बुरे दिन " आले हे समजून जावे. सुब्रमण्यम यांनी आपणहून राजीनामा द्यावा अशी परिस्थिती मोदी केंव्हा निर्माण करतात ते पाहूया.राजेंद्र कडू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा