मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०१४

या मिडियाचे काय करायचे ….  

सतत गुजराती अस्मितेचा नारा ऐकून पुढचा पंतप्रधान जर गुजराती नसला तर गुर्जर बंधुंमध्ये जे नैराश्य पसरेल व जी उद्विग्नता येईल त्यामुळे मला काळजी वाटायला लागली आहे. नवीन पंतप्रधानाला  ते देशाचा पंतप्रधान म्हणून कबुल करतील काय, आणि भारताचे बिगर गुजराती पंतप्रधान न्यूयॉर्कला गेलेत तर त्यांचे ते मन:पूर्वक स्वागत करतील काय की त्यांना काळे झेंडे दाखवतील ? असे प्रश्न आतापासून मला भेडसवायला लागले आहेत कारण यावेळेसच्या पंतप्रधानांच्या स्वागताची जय्यत तयारी न्यूयॉर्क मधील गुर्जर बंधू करत आहेत अशा बातम्या मिडीयाने मोठ्या प्रमाणावर दिल्या होत्या. एखाद्या गोष्टीचा किती उदोउदो करायचा याचे भान मिडीयाला नाही हे यावरून स्पष्ट झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: