बुधवार, २९ ऑक्टोबर, २०१४

काळ्या पैशाचा कंडू  

स्विस बँकेतून काळ्या पैशाची पोती आणण्याची जी भाषा केली जात आहे तीच हास्यास्पद आणि अत्यंत बालिश आहे. खरा काळा पैसा जर कोठे असेल तर तो या देशी जमिनींच्या व्यवहारांत दडलेला आहे.  
काळ्या पैशावरील चर्चा हा या देशातील बहुसंख्यांना जडलेला एक प्रकारचा अर्थमानसिक आजार असून दरिद्रीनारायणांनी भरलेल्या या देशात काळ्या पैशावर बोलणे हा अनेकांचा रिकामटेकडा उद्योग बनलेला आहे. मुदलात देशात अनेकांना किमान पैसा मिळवण्याची मारामार असताना ही काळ्या पैशावरील चर्चेची हौस बुभुक्षितांना मानसिक समाधान देणारी असते. काळा पैसा, परदेशी बँक खाती, तेथील गुप्तता आणि धनाढय़ांची तेथील खात्यात असलेली कथित रक्कम या बाबत भलेभलेदेखील कल्पनाविलासात आनंद मानत असतात. या कल्पनाविलासात सोमवारी नरेंद्र मोदी सरकारने आणखी एका अध्यायाची भर घातली. परदेशातील बँकांत खाती असलेल्या तिघांची नावे सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात उघड केली गेली. जे काही घडले त्यावरून सरकारदेखील या प्रकरणास किती गांभीर्याने घेते हे दिसून आले असून सगळा भर भरीव काही करण्यापेक्षा जनसामान्यांच्या कुतूहलशमनार्थच सुरू असल्याचा निष्कर्ष काढला गेल्यास गैर ठरणार नाही. गेली सहा वर्षे या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून ही तीन खाती म्हणजे या समितीच्या प्रयत्नांना आलेले यश असल्याचे सांगितले जाते. त्यावर विश्वास ठेवल्यास या साऱ्यातील फोलपणा जाणवावा. तसा तो आल्यास जाणवणारी बाब म्हणजे सगळाच्या सगळा कथित काळा पैसा भारतात आणला गेला तरी देशाच्या अर्थव्यवस्थेत एक पैचाही फरक पडणार नाही.(सविस्तर अग्रलेख वाचण्याकरिता भेट द्या www.loksatta.com ला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: