शुक्रवार, ८ एप्रिल, २०१६

सबुरीचे फळ गोड असते

गुजरातचे माजी पोलिस महानिरीक्षक वंजारा यांची कोर्टाने मागेच सुटका केली व आता त्यांच्यावर असलेली गुजरात प्रवेशाची बंदीसुद्धा हटविण्यात आली. त्यांचे गुजरातमध्ये 'शानदार' स्वागत करण्यात आले. वंजारा यांनी सबुरी ठेवली म्हणून त्यांना हे स्वातंत्र्याचे दिवस पहायला मिळाले. मध्ये सहा/सात वर्षे तुरुंगात काढल्या मुळे त्यांचा संयम ढळला होता. त्यांनी राज्यपालांना पत्र लिहून आपली व्यथा कळविली होती. "ज्यांना मी देव मानत होतो त्यांच्यामुळे मी आज तुरुंगात आहे. त्यांना माझी काहीच काळजी नाही",  अशा प्रकारचा मजकूरही त्या पत्रात होता. अर्थात आता ते बाहेर आहेत. त्यामुळे ते कोणाला देव मानत होते व ती व्यक्ती खरोखरच 'देव' होती की 'दानव' हे सत्य कधीच बाहेर येणार नाही हे नक्की.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: